Mototanya Died : रशियाची सर्वांत सुंदर बाईक रायडर अशी ख्याती असलेल्या तात्याना ओझोलिना या ३३ वर्षीय मोटोब्लॉगरचं २५ जुलै रोजी अपघाती निधन झालं. मोटोतान्या म्हणून तिची ओळख होती.सोशल मीडियावर तिचे ८० लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. परंतु, दुचाकीवरील तिचं नियंत्रण सुटलं आणि तिची दुचाकी ट्रकला धडकली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

६ मार्च १९८६ मध्ये रशियातील ओम्क्स येथे तिचा जन्म झाला होता. त्यानंतर ती मॉस्कोला गेल अन् तिथं तिची संपूर्ण जीवनशैलीच बदलली. ती अर्थशास्त्रज्ञ म्हणून आधी उदयला आली. परंतु, मोटारसायकलीच आवड तिला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तिने बाईक रायडिंगलाही सुरुवात केली अन् तिची ख्याती जगभर पसरत गेली. २०१४ मध्ये तिने लाल कावासाकी ZX6R २०४ मध्ये घेतली. या दुचाकीबरोबरचे तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर ती प्रसिद्ध होऊ लागली.

हेही वाचा >> कारगिल युद्धातील महिला योद्धा! पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांनी कसा राखला होता जखमी सैनिकांचा गड?

ब्रेन विथ ब्युटी असणारी तात्याना तिच्या बेधडक स्टंटमुळे चर्चेत राहु लागली. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. ग्लॅमरस पण धाडसी असं तिचं व्यक्तिमत्व होतं. बाईक रायडिंगसह तिच्या स्टायलिंगचीही चर्चा होऊ लागली. तिच्या स्टायलिंगसाठीही तिला फॉलो करू लागले.

परंतु, २५ जुलै रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुर्कीतील एका मोटारसायकल अपघातात तिला प्राण गमवावे लागले. मुग्ला आणि बोडरम दरम्यान तिची BMW S1000RR चालवत असताना सहकारी दुचाकीस्वाराच्या धडकेने तिचं नियंत्रण सुटलं अन् ती ट्रकवर आदळली. अपघातानंतर तिला वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघातात दुसरा दुचाकीस्वर जखमी झाला असून तिसरा दुचाकीस्वार बचावला आहे.

रशियाची सर्वांत सुंदर बाईक रायडर (फोटो – Tanechka Ozolina/Facebook)

तात्यानाचा प्रेरणादीय पोस्ट्स

तात्यानाच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यावर्गाने हळहळ व्यक्त केली. परंतु, तिच्या प्रेरणादायी पोस्ट्स सतत तिच्या फॉलोअर्ससाठी ऊर्जा देणाऱ्या राहणार आहेत. तात्यानाच्या पश्चात तिचा १३ वर्षांचा मुलगा व्हेव्होलॉड आहे. तोही तिच्यासारखाच धाडसी असल्याचं म्हटलं जातं.

तातान्या मिळाले अनेक पुरस्कार

तात्याना एक प्रसिद्ध मोटोब्लॉगर होती. तिला २०२३ मध्ये मोटोब्लॉगर ऑफ दि इयर आणि ट्र्व्हल ब्लॉगर ऑफ दि इयर हे पुरस्कार देण्यात आले होते.