Reliance Company Female Employees : आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स (Reliance Company ) कंपनीने आर्थिक वर्ष (FY24) २०२३-२०२४ साठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या आर्थिक वर्षात विविध व्यवसायांसाठी तब्बल एक लाख ७१ हजार ११६ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रिलायन्स जीओची एकूण कर्मचारी संख्या जवळपास ३ लाख ४८ हजार एवढी झाली आहे, असे कंपनीने बुधवारी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच आश्चर्याची गोष्ट अशी की, रिलायन्स (Reliance) समूहातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५३.९ टक्के कर्मचारी ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत तर२१.४ टक्के महिला कर्मचारी आहेत. रिलायन्स जिओने सांगितले की, मागील वर्षापासून प्रसूती रजा घेणाऱ्या एकूण ९८ महिला कर्मचारी चालू आर्थिक वर्षात पुन्हा एकदा सामील झाल्या आहेत.

रिलायन्सची ((Reliance) एकूण कर्मचारी संख्या ३ लाख ४७ हजारपैकी, ७४ हजार ३१७ फक्त महिला आहेत. तसेच नवीन वर्षात कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या महिलांपैकी, ४१ हजार ४२ महिला आहेत. हा आकडा पाहता मानवी भांडवलामधील गुंतवणुकीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये (FY23) कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख ८९ हजार ४१४ होती,

हेही वाचा…Preeti Sudan: माजी IAS अधिकारी प्रीती सुदान आहेत तरी कोण? UPSC च्या नव्या अध्यक्षपदी का झाली निवड? संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा आहे अनुभव

२८.८० दशलक्ष व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाते :

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने २८.८० दशलक्ष व्यक्तींना एका तासापेक्षा जास्त वेळ प्रशिक्षण दिले होते, तर मिशन कुरुक्षेत्र (Mission Kurukshetra) अंतर्गत एकूण २ हजार ७२६ नवीन कल्पना सादर केल्या होत्या. कल्पना, व्यवसाय सादर करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी हा अंतर्गत उपक्रम राबवला होता. कंपनीचे १ हजार ७२३ अपंग कर्मचारी आहेत, जे बहुतेक रिलायन्स रिटेलमध्ये गुंतलेले आहेत; ज्यांना खाद्यपदार्थ, किराणा सामान, कपडे, पादत्राणे आणि इतर खेळण्यांसह विविध सेवा पुरवल्या जातात.

एवढ्या महिलांनी घेतला मॅटर्निटी लिव्हचा फायदा :

या कालावधीत सहा हजार ४१४ कर्मचारी पॅटर्निटी लिव्हवर गेले आहेत. पॅटर्निटी लिव्ह ही पॅटर्नल लिव्ह, पितृत्व रजा किंवा पालकत्व रजा अशा विविध नावांनी ओळखली जाते. पॅटर्नल लिव्ह ही वडिलांना मुलांच्या जन्मानंतर किंवा एखादे मूल दत्तक घेतल्यावर दिली जाते. तर मॅटर्निटी लिव्ह (प्रसूती रजा) ८११ महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये एकूण ओव्हरऑल voluntary सेपरेशन (Overall voluntary separations) एक लाख ४३ हजारांच्या तुलनेत कमी नोंदवले गेले आहेत.

रिलायन्सने अर्थ वर्ष २०२४ मध्ये केली ११५ इंटर्नची नियुक्ती :

सध्या एक लाख १४ हजार ९४८ कर्मचारी LinkedIn द्वारे शिकत आहेत, तर ६८ हजार ३५ कर्मचारी Coursera द्वारे स्वत:चे कौशल्य वाढवत आहेत. RIL ने स्पेक्ट्रम 8.0, RIL च्या वार्षिक शिक्षण आणि विकास महोत्सवाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजनदेखील केले होते; ज्यामध्ये सर्व सत्रांमध्ये १९ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी अहवालात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात, रिलायन्सने (Reliance)१०० हून अधिक शैक्षणिकांमधून एकूण ५४४ प्रशिक्षणार्थी आणि ११५ इंटर्न ऑनबोर्ड केले आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani reliance company total of 98 employees availing maternity leave from the previous year have also joined back in the current financial year chdc asp