वसंताच्या आगमनाला मुंबई सारख्या महानगरात टॅबूबियचा फुलोत्सव निरखता येतो. सध्या ही झाडं जानेवारीत फुलली आहेत. इस्टर्न एक्सप्रेस हायवेला ओळीने उभे असलेले हे वृक्ष जेव्हा फुलतात तेव्हा आपण नक्की आपल्या शहरातच आहोत असा प्रश्न पडतो. अगदी स्वप्नातील दृश्य असावं अशी ओळीने फुललेली झाडं, अल्लद गळून पडणारी फुलं आणि झाडाखाली पसरलेला फुलांचा गालीचा म्हणजे मोठीच बहार.

बहरांच्या उत्सवाचा पुढचा टप्पा म्हणजे कॉफी फुलांचा बहर. कुर्ग हा मुळात अतिशय निसर्गरम्य असा परिसर. कुर्गमध्ये तिथल्या पोषक वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर कॉफी पिकवली जाते. कॉफीचा एकंदर जीवन प्रवास बघितला तर तिला फुलं येण्याचा काळ हा यातील सर्वात सुंदर काळ असतो. अगदी थोडा काळ म्हणजे साधारण दोन-चार दिवस टिकणाऱ्या या फुलांना निरखणं हा एक वेगळाच आनंद असतो.

women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Walmik Karad Pimpri Chinchwad connection Municipal Corporation notice property tax
वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड, महानगरपालिकेने बजावली नोटीस
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका

हेही वाचा : पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते

फेब्रुवारी – मार्च महिन्यात हा पुष्पोत्सव आपण पाहू शकतो. एरवी कॉफीचे झाड हे एखाद्या नेहमीच्या झाडासारखं दिसणारं झाड. काहीशी अडूळशासारखी रूंद पानं असलेलं, पण जेव्हा याला इवलाल्या कळ्या येतात तेव्हा याचा नूरच बदलून जातो. जाईच्या कळ्यांसारखा दिसणाऱ्या कळ्या उमलल्या की बघत रहावं एवढ्या सुंदर दिसतात. विलक्षण सुगंधी अशी ही पांढरी शुभ्र फुलं दिसतातही जाई सारखीच. परंतु कॉफीचं कुळ आणि जाईचं कुळ हे वेगवेगळं आहे. एक्झोराला येणारी घोसासारखीच फुलं कॉफीलाही येतात. फरक फक्त एवढाच की कॉफीची फुलं ही फांदीवर ओळीने लागतात. एक्झोरासारखी बेचक्यात तयार होत नाहीत. ओळीने फुलत गेलेले ते छोटे शुभ्र घोस म्हणजे जणू काही निसर्गाने विणलेला गर्द असा गजराचं. ही शुभ्र फुलं जाई सारखी नाजूक मात्र नसतात. उलट बुचाच्या म्हणजेच आपल्या गगनजाईच्या फुलांसारखी पाकळ्यांची रचना असलेली असतात. भारतात केरळ, कुर्ग, चिकमंगळूर इथे मोठ्या प्रमाणात कॉफी पिकवली जाते. कुर्गला मुख्यत्वे अरेबिया जातीची लागवड होते.

लांबच लांब पसरलेले कॉफीचे विस्तीर्ण मळे, त्यावर लगडलेली पांढरी शुभ्र फुलं पाहत या मळ्यांतून फिरणं हे विलक्षण आनंददायी असतं. काही दिवसच चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद मात्र चिरकाल टिकणारा असतो. अरेबिया आणि रोबस्टा हे कॉफीचे दोन मुख्य प्रकार. पण या प्रकारातील कॉफीच्या फुलांची रचना लक्षात घेतली तर मोठी गंमत वाटेल. मुळात कॉफी ही सपुष्प कुळात मोडणारी वनस्पती. नर आणि मादी अशी वेगवेगळी फुलं नसलेली. कॉफीमध्ये नर घटक आणि मादी घटक एकाच फुलात असतात. पण अरेबिया आणि रोबस्टा या दोन मुख्य जातींमध्ये त्यांच्या फुलांच्या या रचनेत किंचित फरक असतो. तो फरक मोठा मजेदार आहे. तो जाणून घेतला तर निसर्ग किती अंगाने आपली कमाल दाखवतो ते सहजी कळून येईल. अरेबिका जातीच्या फुलांना परागीभवनासाठी वाऱ्या व्यतिरिक्त इतर माध्यमांची फारशी गरज नसते. कारण त्यांच्या पुंकेसरांची रचनाच तशी असते. या उलट रोबस्टा जातीच्या फुलांचे परागीभवन हे किटकांच्या सहाय्याने होते.

हेही वाचा : आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

मंद जाईच्या सुगंधाच्या साथीने कॉफी मळ्यातून फिरत फिरत, पांढऱ्या फुलांचा तो सोहळा बघताना, मधासाठी लगबगीने उडणाऱ्या मधमाश्या आणि इतर किटक निरखणं यांसारखा आनंद नाही. एकदा तरी प्रत्येकाने हा सोहळा अनुभवावा असाच.

विविध फुलांच्या बहरांची माहिती घेताना सहाजिकच तुम्हाला वाटेल की अरे, हे सगळे सोहळे अनुभवायला कुठे ना कुठे लांब जावं लागेल, तर असं मात्र मुळीच नाही.

वसंताच्या आगमनाला मुंबई सारख्या महानगरात टॅबूबियचा फुलोत्सव निरखता येतो. सध्या ही झाडं जानेवारीत फुलली आहेत. इस्टर्न एक्सप्रेस हायवेला ओळीने उभे असलेले हे वृक्ष जेव्हा फुलतात तेव्हा आपण नक्की आपल्या शहरातच आहोत असा प्रश्न पडतो. अगदी स्वप्नातील दृश्य असावं अशी ओळीने फुललेली झाडं, अल्लद गळून पडणारी फुलं आणि झाडाखाली पसरलेला फुलांचा गालीचा म्हणजे मोठीच बहार.

याच दिवसांत फुलणारी सातवण, तिचे भरगच्च फुलांचे घोस, सोबत बोगनवेलीची कागदी फुलं. किती म्हणून वर्णन करावं. निसर्ग आपल्या सौंदर्याची ठायी ठायी साक्ष देतं असतो. अगदी निगुतीने जर आखणी केली तर संपूर्ण वर्षभर आपण कुठला ना कुठला पुष्पोत्सव अनुभवू शकतो. फक्त आपल्यापाशी तेवढा वेळ, उसंत आणि सौंदर्यदृष्टी मात्र हवी.
mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader