All About Mumbai Influencer Aanvi Kamdar : सध्या सोशल मीडिया अग्रस्थानी आहे. या सोशल मीडियाचा उपयोग करून अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंतचे अनेक जण त्यांच्या कन्टेन्टद्वारे जीवनावर प्रकाश टाकत असतात. अशा प्रकारे देशभरातील इन्फ्ल्युएन्सरनी जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांचे रील्स म्हणजे नवनवीन रेसिपी, लहान मुलांसाठी टिप्स, मजेशीर व भावूक संदेश देणारे व्हिडीओ, पिकनिकसाठी एखादे नवीन ठिकाण एक्स्प्लोर करण्यात त्यांची मदत होते. पण, आता हेच रील्स आता या इन्फ्ल्युएन्सरसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कालच २६ वर्षीय तरुणी अन्वी कामदार हिचा रील शूट करताना दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं? कोण होती इन्फ्ल्युएन्सर अन्वी कामदार? ती कुठे राहायची? ती कोणते कन्टेन्ट बनविण्यासाठी प्रसिद्ध होती? याबद्दल अधिक जाणून घेऊ.

मुंबईस्थित इन्स्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्ल्युएन्सर अन्वी कामदार (Influencer Aanvi Kamdar) फक्त २६ वर्षांची होती. तिला निसर्गसौंदर्याचा आनंद तिला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. त्या दृष्टीनं ती महाराष्ट्रातल्या रायगडाजवळील कुंभे धबधबा एक्स्प्लोर करण्यासाठी तिच्या सात मैत्रिणींबरोर सहलीला गेली. पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात येथे अनेक पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून ती या धबधब्याची माहिती अनेक युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी रील शूट करीत होती. पण, तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. कुंभे धबधब्याजवळ रील शूट करताना ती एका खोल दरीत कोसळली. सहा तासांच्या बचावकार्यानंतर अन्वीला घाटातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र, खोल दरीत पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. दोरीच्या साह्यानं जवळपास २०० ते २५० फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आलं. तिला जखमी स्थितीत माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं; पण दुर्दैवानं उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

हेही वाचा…Malala Yousafzai: तालिबानी बंदूकधाऱ्याने डोक्यात झाडली गोळी अन् बदललं आयुष्य; जाणून घ्या ‘मलाला दिवसा’निमित्त प्रेरणादायी गोष्ट

अन्वी कामदारबद्दलच्या पाच विशेष गोष्टी खालीलप्रमाणे :

१. अन्वी कामदार ही व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होती आणि तिनं आयटी/टेक्नॉलॉजी सल्लागार कंपनी डेलॉइटमध्येही काम केलं होतं.
२. सोशल मीडियाची इन्फ्ल्युएन्सर म्हणून ओळखली जाणाऱ्या अन्वीला तिच्या चाहत्यांबरोबर तिचे अनुभव शेअर करण्याची आवड होती.
३. मान्सून टुरिझमसाठी ती प्रसिद्ध होती हे तिच्या पोस्टवरून स्पष्ट दिसते आहे.
४. अन्वीचे इन्स्टाग्रामवर २,५६,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
५. तिनं इन्स्टाग्राम बायोमध्ये स्वतःचं वर्णन ट्रॅव्हल डिटेक्टिव्ह म्हणून केलं आहे.

रील्स शूट करण्याचा नादात अनेक जण भान विसरून जातात. अशीच दुर्घटना दुर्दैवानं अन्वीबरोबर घडली आहे आणि रील शूट करताना तिचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. रील्स शूट करताना स्वतःची काळजी घेणं, इतरांना आपल्यामुळे त्रास न होणं या गोष्टी प्रत्येक इन्फ्ल्युएन्सरनं ध्यानीमनी ठेवायला हव्यात हे या प्रसंगातून स्पष्ट होत आहे.