वनिता पाटील

दरवर्षी पाऊस आला, की तुंबणारे रस्ते आणि खड्ड्यांमधला प्रवास हे प्राक्तन ठरलेलं. आर. जे. मलिष्काची ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय…’ आणि ‘उरात होते धडधड, जेव्हा बारिश चालू झाली’ ही गाणी म्हणजे मुंबईकरांच्या याच त्रासाला मिळालेली मोकळी वाट. यंदाही याच हालातून जाणाऱ्या मुंबईकरांसाठी आर. जे. मलिष्काच्या उरात कधी होणार धडधड ?

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

नेहमी येणारा पावसाळा आला की मुंबईकर कुठल्या तरी कप्प्यात ठेवून दिलेली छत्री काढतात, खूप पाऊस पडला, लोकल ट्रेन बंद पडल्या आणि घरी येणं अशक्य असेल ऑफिसजवळ कुणाकडे राहण्याची सोय होऊ शकते याचा विचार करून ठेवतात…

… आणि हो, ‘मुंबई की रानी’ आर. जे. मलिष्काच्या पावसावरच्या गाण्याची वाट बघायला लागतात.

पूर्वी म्हणे पहिला पाऊस आला की कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक पाऊसकविता प्रसिद्ध व्हायची. खरं तर तसं काही मलिष्का आणि पाऊस वगैरे नातं नाहीये. पण पावसात होणाऱ्या गैरसोयींमुळे मुंबईकरांचे जे काही हाल होतात, त्यावर २०१७ मध्ये मुंबईकरांचे पावसाळ्यातले हाल सुरू झाल्यावर, मलिष्काने ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय…’ हे ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय…’ च्या चालीवर गाणं सादर केलं आणि भलतंच झालं.

‘बीएमसी’ने हे गाणं व्यक्तिगत पातळीवर घेतलं, बीएमसी जिच्या ताब्यात होती, त्या शिवसेनेने मलिष्काविरोधात ‘आवाज’ उठवला आणि मलिष्काचं गाणं रातोरात देशभर पोहोचलं. एरवी जे गाणं फक्त तिच्या मुंबईकर फॅन्सनी ऐकलं असतं आणि आपले हाल कसे नीट मांडले आहेत, अशा गप्पा मारल्या असत्या आणि ते सगळं तिथंच संपलं असतं, ते गाणं ज्यांचा काही संबंध नाही अशा सगळ्यांनी ऐकलं, मलिष्काला धमक्यांचे फोनबिन गेले. तिला वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठिंबाही दिला गेला. तिच्या घरात डेंगूच्या अळ्या सापडल्या म्हणून मुंबई महापालिकेने कारवाई वगैरे केली. पण मलिष्काला कशाला फरक पडतोय?

मलिष्का ही मलिष्का आहे. मुंबईकरांची अगदी लाडकी आर. जे. कारने प्रवास करा, लोकलच्या गर्दीत असा किंवा आपापल्या घरी बसा, अनेक मुंबईकरांची मॉर्निंग या चुलबुल्या, बडबड्या मलिष्कामुळे एकदम गुड्ड मॉर्निंग होऊन जाते. ‘मॉर्निंग नंबर वन विथ मलिष्का’ हा तिचा शो तिच्या त्या बिनधास्त ॲटिट्यूडमुळे लोकांना सकाळी सकाळी खळखळून हसायला लावतोच, पण तिच्या संवेदनशीलतेमुळे थोडं थांबून विचार करायलाही लावतो. तिची ती टिपिकल बम्बय्या भाषा, तिचं मुंबई शहरावरचं प्रेम, रेडिओ या माध्यमाची तिला असलेली अचूक जाण…

मलिष्का हे रसायनच वेगळं आहे. आपल्या लोकप्रियतेचा लोकांच्या प्रश्नांसाठी उपयोग करून घ्यायचा याचं तिला इतकं अचूक भान आहे की त्यातूनच तिचं ते ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय…’ हे गाणं जन्माला आलं होतं. ते गाणं वादग्रस्त ठरल्यानंतर मलिष्काने पाऊस आला की त्याच्या अडचणी गाण्यातून मांडायचा चंग बांधला. त्यातूनच पुढच्याच वर्षी पावसामुळे, खड्ड्यांमुळे मुंबईकर बेजार झाल्यावर तिचं पावसावरचं नवं गाणं आलं…

‘उरात होते धडधड, जेव्हा बारिश चालू झाली

आणि कुछ घंटो में आख्खा मुंबई पाण्याखाली आली

कुठे रस्त्यांची लागली वाट

ट्रॅफिकमध्ये झाली दिन की रात

गेली गेली गेली आमची मुंबई

खड्ड्यात गेली, खड्ड्यात गेली’

हे गाणं ‘झिंगाट’ गाण्याच्या तालावर होतं. अर्थात मलिष्काचं गाणं हे नुसतं ऐकायचं नसतं, तर ते दृश्य असतं. म्हणजे ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना घेऊन तिने त्या गाण्यावर तिच्या ऑफिसमध्ये केलेलं नृत्यही असतं. ‘बारिश सुरू झाली आणि कुछ मिनिटों में आख्खा मुंबई पाण्याखाली आली’ या गाण्यातही तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी नृत्य केलं होतं.

आदल्या वर्षीच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे दुसऱ्या वर्षीचं हे तिचं गाणंही चांगलंच गाजलं. पण त्यानंतर आता चार वर्षे झाली. त्यातली दोन वर्षं तर करोनाची होती, ती सोडून देऊया. पण दरवर्षी मुंबई पाऊस येतो आहे. मुंबई तुंबते आहे. मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पडताहेत. त्यांच्यामुळे ट्रॅफिक जॅम होतो आहे. लोक घरातून निघून ऑफिसमध्ये पोहोचल्यावर किंवा ऑफिसमधून निघून घरी पोहोचल्यावर या सगळ्या त्रासाची चर्चा करताहेत.

पण अजून मलिष्काचं गाणं काही येईना झालं आहे. आजकाल मुंबईकरांना रोज भोगाव्या लागणाऱ्या समस्यांमुळे मलिष्काच्या उरात धडधड होत नाहीये की काय?