जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नये. ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. ही म्हण तंतोतंत लागू होते ती NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या क्रिती अग्रवालला. क्रितीने आपल्या मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण केली आहे. मात्र, नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यापर्यंतचा तिचा प्रवास म्हणावा तेवढा सोप्पा नव्हता. सलग दोनदा या परीक्षेत अपयश मिळाल्यानंतरही क्रितीने खचून न जाता आपले प्रयत्न सुरुच ठेवले अन् तिसऱ्या प्रयत्नात तिने NEET परीक्षा उत्तीर्ण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- जागतिक दर्जाची टेनिसपटू ते अनेक कंपन्यांची ब्रॅण्ड अम्बॅसिडर, सानिया मिर्झाची संपत्ती माहितीय का?

क्रितीने नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिवस-रात्र खूप घेतली. परीक्षादरम्यान तिने फेसबूक, ट्वीटरसारख्या सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. एवढंच नाही तर तिने व्हॉट्सअॅपही बंद केले होते. तसेच तिने मित्र-मैत्रीणीबरोबर गप्पा मारणेही जवळपास बंद केले होते. क्रितीने पहिल्या दिवसापासूनच परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली. क्रिती भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये थोडी कच्ची होती. त्यामुळे ती दररोज भौतिकशास्त्राच्या प्रश्नांचा सराव करत होती. तिने वर्षभरातील भौतिकशास्त्राच्या सर्व चाचण्या दिल्या होत्या.

हेही वाचा- वडीलांची साथ अन् संकटांवर मात! धावपटू नित्या रामराजचा संघर्षमय प्रवास

कोचिंग क्लासला जातानाही प्रवासात क्रिती आभ्यास करायची. लोकल ट्रेन असो अथवा बस प्रत्येक ठिकाणी क्रिती आभ्यासच करताना दिसायची. क्रितीच्या या परिश्रमाला तिच्या आई-वडिलांचीही मोठी साथ लाभली. क्रितीच्या आई-वडिलांनी तिला परीक्षेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर मोठा पाठिंबा दिला.

हेही वाचा- ‘राष्ट्रीय युवक पुरस्कारा’नं गौरव झालेली विधी पळसापुरे

क्रितीने यूपीसीपीएमटी परीक्षा दिली होती, पण या परीक्षेत तिला चांगले गुण मिळवता आले नाहीत. या परीक्षेत तिला १९०० वा रँक मिळाला परिणामी तिची निवड झाली नाही. यानंतर क्रितीकडे दोन पर्याय होते: एकतर बीएससी करायची किंवा प्रयत्न सोडून द्यायचे. पण डॉक्टर बनण्याचे स्वप्न क्रितीला गप्प बसून देईना. क्रितीने २०१३ व २०१४ साली नीटची परीक्षा दिली होती. मात्र, या परीक्षेत तिला यश मिळवता आले नाही. तिने आपल्या कोचिंग क्लासच्या सरांशी या समस्येबद्दल चर्चा केली आणि तिसऱ्यांदा पुन्हा नीट परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. वर्षभर जीव तोडून आभ्यास केल्यानंतर क्रितीने नीट परीक्षेत ऑल इंडिया १०८४ वा रॅंक मिळवला व डॉक्ट बनण्याच्या स्वप्नाची पहिला टप्पा पार केला.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet success story kriti agarwal passion to become a doctor studied bus stand railway platform dpj