रसिका शिंदे

करोनाच्या संकटानंतर आता दोन वर्षांनी नवरात्रीत पुन्हा देवीपूजनाचा उत्साह दिसणार आहे. सार्वजनिक गरबा-दांडियाच्या निमित्तानं ‘ए हालो…’चे बोलही कानावर पडतील. करोनाच्या काळात स्त्रियांना हवा तसा साजशृंगार करता आला नाही आणि त्याची कसर या वर्षी सगळ्याच सण, उत्सवांत भरुन काढली जात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्रियांसाठी जॅकपॉटच! नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसणं, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालणं, सुंदर तयार होणं, हे याच वेळी मनसोक्त करायला मिळतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गृहिणींना आणि ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांना घरातली कामं आटपून काही वेळ का होईना पण गरबा खेळायला जाण्याचा योगही या वर्षी पुन्हा येणार.

Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
raigad beaches crowded with tourists
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस

गरबा-दांडिया मूळचा आपला नसला, तरी अनेकांना एकत्र आणून आनंद घेण्याची संधी देणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गरब्याची गाणी वाजायला लागली की आपोआप पावलं थरकू लागतात. मुंबईत बोरीवली, चेंबूर, घाटकोपर, गोरेगाव या ठिकाणी अनेक मोठमोठे गरब्याचे कार्यक्रम होतात. दरदिवशी कॉलेजची मुलंमुली वेगवेगळ्या गरब्यांना जात मनसोक्त नाचतात.

सण म्हटलं की नवनवीन फॅशन ट्रेन्डस् आले. जसा काळ बदलत जातो तशी फॅशनची व्याख्याही बदलत जाते. या नवरात्रीत आपली परंपरा जपत कोणती फॅशन आपण करु शकतो, त्यावर कोणते दागिने घालू शकतो जाणून घेऊयात…

लेहेंगा आणि स्कर्टस् ना द्या नवा लूक
या नवरात्रीत आपल्या परंपरेला धक्का न देता ‘इंडो-वेस्टर्न’ कपडे तुम्ही परिधान करु शकता. नवरात्र म्हणजे फक्त चनिया-चोळी किंवा घागरा-चोळी इतपतच सीमीत न राहाता तुम्ही क्रॉप टॉप, डिझायनर ब्लाऊज, शर्ट आणि त्याखाली लेहेंगा किंवा स्कर्ट असा वेश परिधान करु शकता. तसंच कॉटनच्या साड्या, पैठणी साड्यांचे चुडीदार ड्रेस अशा पद्धतीचे कपडेही घालू शकता.

ऑक्सिडाईज्ड दागिन्यांना पसंती
सध्या ऑक्सिडाईज्ड दागिन्यांना बाजारात जास्त मागणी आहे. सोन्याचे दागिने घालण्यापेक्षा स्त्रिया व मुली हलक्या वजनाच्या परंतु आकर्षक अशा कानातल्यांना किंवा दागिन्यांना पसंती देत आहेत. सध्या बाजारात इमिटेशन ज्वेलरीलाही स्त्रियांची पसंती आहे. याच दागिन्यांवर शोभतील असे कपडे स्त्रिया परिधान करतात. इतकंच नाही, तर कपड्यांना ‘मिसमॅच’ करणारी ज्वेलरीदेखील सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

कमरपट्ट्याची नवी फॅशन
सध्या बाजारात कमरपट्ट्याची फॅशन ट्रेन्डमध्ये आहे. याच कमरपट्ट्याचा वापर करत तुम्ही आकर्षक लूक तयार करू शकता. प्लेन, खड्यांचे किंवा विविध रंगांचे फॅब्रिकचे कमरपट्टे शर्ट आणि स्कर्ट किंवा चनिया-चोळीवर घालता येतील.

भडक रंगाचे कपडे आणि कमीत कमी दागिने
रात्री गरबा खेळायला जाताना शक्यतो भडक रंगाचे कपडे घाला. असे कपडे रात्रीच्या वेळी अधिक सुंदर दिसतात. लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी असे भडक रंगाचे कपडे घालून त्यावर फक्त गळ्यात चोकर आणि हातात बांगड्याही तुम्ही घालू शकता. अथवा कानात मोठे कानातले आणि हातात बांगड्या असाही लूक तुम्ही करु शकता.

‘या नवरात्रीत फॅशन उद्योगाला चांगलीच भरारी मिळणार आहे. करोनाच्या काळात सर्वच उद्योगधंद्यांवर परिणाम झाला होता. प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. पण हे वर्ष बाजारातल्या प्रत्येक विक्रेत्यासाठी, दुकानदारांसाठी नफ्याचं ठरत आहे. फॅशन ट्रेंड्समध्ये ग्राहक सण-उत्सवांत नवनव्या कपड्यांची फॅशन करण्यापेक्षा कोणत्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्टेबल राहू याकडे लक्ष देताना दिसत आहेत.’– श्वेता शिंदे, सेलिब्रिटी स्टायलिस्ट

Story img Loader