दलदलीच्या जमिनीवर वाढणारा रामबाण माझ्या फार आवडीचा होता. पूर्वी इमारतीचं जंगल इतकं पसरलं नव्हतं, तेव्हा यांची प्रजा सुखेनैव नांदत होती. लांब दांड्याला लागलेली त्याची गडद तपकीरी कणसं तोडून आणण्यासाठी मी सदैव तयार असे. थोडसं खरचटलं, कापलं, लागलं की आजी एखादं कणीस मोडून त्याचा छोटा तुकडा हातावर रगडून जखमेवर चोळायची. जादू व्हावी तशी या रामबाणाने जखम लगेच बरी व्हायची.

कमळाचा प्रयोग यशस्वी झाला आणि मग अधिक उत्साहाने मी पाण्यात लावता येतील अशा सगळ्या वनस्पतींचा शोध सुरू केला. थोडक्यात पाण्यातील बाग करण्याच्या प्रयत्नाला लागले. जमिनीवर लावता येतील इतकीच अनेक झाडं पाण्यातसुद्धा लावता येतात. रंगांचं, फुलांचं वैविध्य जसं जमिनीवर लावता येणाऱ्या वनस्पतींमधे आढळतं, तितकंच ते पाणवनस्पतींमध्येही आढळतं. बरं, त्यातही किती प्रकार सांगावे. पाण्यालगत वाढणारे, पाण्याखाली वाढणारे. पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारे तर पृष्ठभागापासून बऱ्याच उंचीवर वाढणारे. बाग लावताना जशी आपण विविध प्रकारची रचना करतो अगदी तशाच विविध वनस्पतींचे पर्याय पाणवनस्पतींममध्येही उपलब्ध असतात.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

हेही वाचा: स्त्री आरोग्य: उपवास करताय? करा, पण आरोग्य सांभाळून…

बदलापूरच्या नर्सरीत मला एक अनोखी वनस्पती मिळाली. कर्दळीच्या पानासारखी काहीशी तिची पानं होती. तिला येणारं फूलसुद्धा अगदी वेगळंच होतं. कमळाशी किंवा कुमुद फुलांशी ते अजिबातच मिळतंजुळतं नव्हतं. अतिशय गडद असा रंग, पाचच पाकळ्या- त्याही देखण्या. मला यात पिवळा आणि कुंकवासारखा लाल असे दोन रंग मिळाले. ते निगुतीने वाढवले. आता माझ्या प्रयोगासाठी मी नवीन मोठा परिघ असलेलं फायबर ग्लासचं छोटं कुंड म्हणता येतील असे घटक आणले. हे फारच टिकावू आणि हलक्या रंगात उपलब्ध होते.

एकाच कुंडात मातीचे कमी अधिक उंचीचे थर तयार करून अनेक वनस्पती लावता येण्याची सोय झाली होती. प्रयोगांना अधिक वाव मिळत होता. थायलंडमध्ये गेले असताना एकाच कुंडात अनेक वनस्पती लावून केलेली रचना पाहिली होती. किती प्रकार होते त्यात. पाण्यात बुडालेली हायड्रिला होती, त्याचवेळी रामबाणाची म्हणजेच आपलं पाणकणीस ज्याला इंग्रजीत टायफा म्हणतात, तेही तिथं दिमाखात डोलत होतं.

दलदलीच्या जमिनीवर वाढणारा रामबाण माझ्या फार आवडीचा होता. पूर्वी इमारतीचं जंगल इतकं पसरलं नव्हतं, तेव्हा यांची प्रजा सुखेनैव नांदत होती. लांब दांड्याला लागलेली त्याची गडद तपकीरी कणसं तोडून आणण्यासाठी मी सदैव तयार असे. थोडसं खरचटलं, कापलं, लागलं की आजी एखादं कणीस मोडून त्याचा छोटा तुकडा हातावर रगडून जखमेवर चोळायची. जादू व्हावी तशी या रामबाणाने जखम लगेच बरी व्हायची. सोफरामायसीन, बिटाडाईन अशी महागडी क्रीम काय करतील अशी कमाल हा रामाचा बाण करायचा.

हेही वाचा: मुलांना वाढवताना नक्की काय चुकतंय?

थायलंडमध्ये तो मला दिसला आणि मी हरखूनच गेले. मार्शी प्लांटस् किती कल्पकतेने लावली होती त्यांनी. यातलं मला आपलं काँग्रेस ग्रासही दिसलं. आपल्या पानांचं मोठं मोठे पंखे पसरून ते दिमाखात उभं होतं. जपानी पुष्परचनेत जशी उंची आणि खोली यांचा मेळ साधत पुष्प रचना केली जाते तद्वतच ती रचना होती- जी कमालीची सुंदर होती. खुळावल्यासारख्या या पाणवनस्पतींचे प्रयोग निरखत अनेक बागा, हॉटेल, घरांची अंगणं, मंदिरातील परिसर यांचा शोध घेत हिंडत होते.

हे सगळे प्रयोग आपणही करून बघायचे हे तेव्हाच निश्चित केलं होतं. आता मी कमळ आणि कुमुदिनी यांचा वेगळा विभाग केला आणि माझ्या पाणवनस्पतींच्या प्रयोगासाठी वेगळी कुंड आणि वेगळी जागा राखून ठेवली. यात जय जापोनिका म्हणजेच पाणमोगरा लावला, पाणकणीस, हायड्रीला, डक वीड, शिंगाडा अशा एकमेकाला पूरक अशा वनस्पती लावल्या. हायड्रिला हा पाण्याखाली वाढणार होता, तर डकवीड पाण्यालगत. पाणकणीस पाण्यापासून उंच तर शिंगाड्याची वेल पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी होती. साधी माती, कंपोस्ट, सुकलेलं शेणखत यांचा एकत्र गारा करून या सगळ्या वनस्पती लावून घेतल्या. शेवाळाचा बंदोबस्त इथेही करायचा होताच, कारण सूर्यप्रकाश जसं जसा मिळेल तसतसं शेवाळं हे वाढणार होतं.

योग्य ती काळजी घेत या सगळ्यांना एका कुंडात लावून घेतलं. दुसरीकडे एका छोट्या आकर्षक मातीच्या सुरेख पसरट कुंडीत पानभोपळीची एक जात लावली. हिची हृदयाकार नाजूक पानं फुलांइतकीच सुंदर होती. यात एका जातीला सुरेख सघन अशा पांढऱ्या पाकळ्या होत्या, तर दुसरीला नाजूकशी झालर होती.

हेही वाचा: Loan For Women Entrepreneurs : बँक कर्ज नको, सरकारी योजना माहीत नाहीत; महिला उद्योजकांना कुठून मिळतं भांडवल? सर्वेक्षणातून बाब उघड!

कुठलीही देखभाल न करावी लागता या दोन्ही जाती सुखेनैव वाढत होत्या. बागेला एक वेगळा रंग आणि नूर आला होता. अजूनही अनेक प्रयोग करायचे होते.

आज या लेखात ही सगळी माहिती देत असताना वनस्पतींची शास्त्रीय नावं मी दिली नाहीएत, पण जर कोणाला ती जाणून घ्यायची असतील तर पुढील लेखात ती आवर्जून देईन. शिवाय एखाद्या वनस्पतींची अधिक माहिती हवी असेल तर ही ती देता येईल. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्या पर्यंत जरूर पोहचवा म्हणजे त्या त्या गोष्टींचा समावेश लेखात करता येईल.

mythreye.kjkelkar@gmail.com