सध्या उन्हाळा सुरू आहे.उन्हाचा कडाका वाढतोय. पावसाला अजून महिना दीड महिना तरी अवकाश आहे. अशावेळी आपण लावलेली छोटीशी बाग किंवा आपलं किचन गार्डन हिरवंगार राखायचं तर कोणती काळजी घ्यायची ते पाहूया. शिवाय येणाऱ्या पावसाळ्यात उपयोगी होतील अशा भाज्या, फुलझाडं, इतर उपयुक्त वनस्पती कशा लावायच्या ते या लेखात समजून घेऊ.

गुलाब आपल्या सगळ्यांनाच आवडतो. कलमी गुलाबाची रोपं नर्सरीत सहज मिळतात. त्यांची सुंदर फुलं पाहिली की आपल्याला मोह पडतोच. जर आपल्याकडे भरपूर जागा असेल, मोठी गच्ची असेल तर असे विविध गुलाब आपण लावून बागेची शोभा वाढवू शकतो, पण अगदी थोडी जागा, पर्यावरणाचे भान आणि नैसर्गिक गोष्टींची ओढ असेल तर मात्र कलमी गुलाबापेक्षा गावठी गुलाबाची निवड करा.असुटीत गावाला गेलात,अथंड हवेच्या ठिकाणी गेलात तर जरा शोध घ्या. गावठी गुलाबाचं एखादं रोपं सहजी मिळून जाईल. या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना फार सुंदर वास असतो. ही थोडी नाजूक, कमी वेळ टवटवीत राहणारी अशी असतात. नीट खत-पाणी केलं तर भरपूर संख्येने फुलतात. यांच्या वासाने बाग सुंगधांत नहाते. फुलपाखरं मुख्य म्हणजे मधमाशा बागेत यायला लागतात.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

आणखी वाचा-निवडणुकीच्या गर्दीतली सामान्य ‘ती’!

सकाळी फुललेली यांची ताजी फुलं सकाळ प्रसन्न करतात. दुपारी उन्हाने ती थोडी मलूल होतात. साधारण दुसऱ्या दिवशी यांच्या पाकळ्या सैल होतात आणि त्या पडायला लागतात. अशावेळी त्या गोळा करायच्या, भोवती कबुतरांचा जास्त वावर असेल तर हलक्या धुवून घ्यायच्या. कोरड्या करायच्या आणि स्वच्छ काचेच्या बरणीत पाकळ्या आणि खडीसाखरेचा एक आड एक थर लावत गुलकंद करायला ठेवायचा. सुरुवातीला एखादं फूल मिळेल, काही हरकत नाही. पाकळ्या निगुतीने गोळा करायच्या. जसजशी फुलं मिळतील तसतशी त्यात ती घालून खडीसाखर घालत राहायचं. बरणीचं तोंड कपड्याने बांधायचं आणि बरणी उन्हात ठेवायची. महिना दीड महिन्यात उत्तम गुलकंद तयार होतो.

पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास हा घरगुती गुलकंद वर्षभर करता येतो. पावसाळ्यात मात्र थोडी काळजी घ्यावी लागते. त्यावेळी फुलं मात्र भरपूर उमलतात. मग त्यांचा वापर गुलाब जल किंवा शिजवून केलेल्या गुलकंदात करता येतोच. गुलकंद तयार करता करता मी कमळकंदाचाही प्रयोग केला. मला कमळं आणि कुमुदिनीची फुलं फार आवडतात. इतकी की कुमुदिनी आणि कमळाच्या पुष्कळ जाती मी लावल्या. कमळांबद्दल एका स्वतंत्र लेखात सविस्तर लिहीनच. सध्या बघूया कमळकंद, गुलकंदाप्रमाणेच कमळाच्या पाकळ्यांचा कमळकंद बनवता येतो. आरोग्यासाठी याचे फायदेही पुष्कळ आहेत.

आणखी वाचा-बाबांनी विकली भाजी, आईनं ठेवलं सोनं गहाण; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या स्वातीची प्रेरणादायी गोष्ट पाहा

पावसाळ्यात वाढावी म्हणून आवर्जून लावायची ती हळद. एकदा पाऊस सुरू झाला की हळदीला धुमारे फुटतात. ती रसरसून वाढते. हळदीची फुलंही मोहक दिसतात. हळदीचे ते फुलोरे मला भिमाशंकरच्या जंगलाची आठवण करून देतात. हळदीच्या पानांचा वापर श्रावण- भाद्रपदात पातोळे, मोदक, निवगऱ्या वाफवताना होतो. या पदार्थांना येणारा हळदीचा मंद सुगंध सणाचा आनंद द्विगुणित करतो. एखाद्यावेळी हळदीचं पान भात शिजवताना घालूनही पाहा, फार सुरेख चव आणि गंध येतो. हा सगळा आनंद हवा असेल तर आत्ता उन्हाळ्यात हळद लावायला हवीच.

अळू आणि रताळं यांचे कंद पेरण्याची हिच योग्य वेळ आहे. फुलझाडांमधे सोनटक्क्ययाचे कंद मिळवून लावाले, म्हणजे एकदा पाऊस सुरू झाला की ही सगळी मंडळी जोमाने वाढतात. बाग हिरव्यागार पानांसोबत फुलांनीही सजते. ग्रीष्माच्या सरत्या काळात वरूणाचं दान स्विकारायला तयार होते.

mythreye.kjkelkar@gmail.com