नवीन वर्षांची जशी दिनदर्शिका असते तशी ही आपली पुष्प बहराची, फुलांच्या मोहोत्सवाची दिनदर्शिका आहे- जी आपण जाणून घेतोय. मागील लेखांत काही फुलांच्या उत्सवांची माहिती घेतली. आता वळू या शरद ऋतूतील बहरांकडे. यातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे साकुरा. खरं तर साकुरा किंवा चेरी ब्लॉसम हा जपान मधील उत्सव. मोठ्या संख्येने पर्यटक यावेळी जपानला भेट देतात. चेरीच्या सुंदर, नाजूक, गुलाबी फुलांचा आनंद घेत बागा बागांमधून सहलीला जातात. हे दिवस खरंच मनोहारी असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जपानमध्ये हा उत्सव एप्रिल महिन्यात सुरू होतो. एकदा तरी अवश्य भेट द्यावीच असा हा उत्सव असतो. अवघा जपान या फुलांच्या लहरींवर जणू झुलत असतो. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होत असतात. कपड्यांपासून, क्रोकरीपर्यंत सगळीकडे साकुरा. खाण्यापिण्याचे पदार्थ, जपानी नाजूक छत्र्यांवरील नक्षीकाम, अनेक हस्तकलेच्या वस्तू सगळ्यांवर साकुराची फुलं बहरल्या सारखी असतात, पण ज्यांना जपानला जाणं जमणार नाही त्यांनी मुळीच नाराज व्हायची गरज नाही. भारत सरकारने जपानच्याच पद्धतीने मेघालयाची राजधानी शिलॉंग इथे हा मोहोत्सव भरवायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-वीणा साहुमुडे… शेतकरी आईबापाचं पांग फेडले, गावाचं नावही मोठं केलं…

आसाममध्ये अनेक ठिकाणी चेरीची झाडं फुलतात. त्याला अनुसरून बागांमधे, तळ्याच्या काठी, डोंगरांवर मुद्दाम चेरीची लागवड केली गेली. अतिशय कल्पकतेने केलेल्या या आखाणीचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. मेघालयात नोव्हेंबरच्या मध्यावर आता चेरी ब्लॉसम चा उत्सव साजरा होतो. यावेळी वातावरण अतिशय आल्हाददायक असते. मुळात आसामचं सौंदर्य वर्णनातीत आहे त्यात या चेरी वृक्षांच्या बहराने अधिकच निखार येतो. शहरातील बागा या दिवसांत सुंदर गुलाबी फुलांनी सजून जातात. छोटेमोठे सारे वृक्ष अगदी फुलाफुली बहरलेले असतात. सकाळच्या मंद वाऱ्याच्या साथीने, कोवळ्या उन्हाच्या संगतीत वर्डस लेकची सहल किंवा शिलॉंग मधील बागेत मारलेला फेरफटका एक अतीव प्रसन्नता देणारा असतो.

शिलॉंगमध्ये साधारण आठवडाभर चेरी ब्लॉसम मोहोत्सव भरवला जातो. या दरम्यान विविध गाण्याचे, नृत्याचे कार्यक्रम चेरीच्या वृक्षांच्या सोबतीने पार पडतात. छोट्या सहली, खाद्यजत्रा, प्रदर्शनं यांमधून आसामच्या संस्कृतीची ओळख तर करून दिली जातेच, पण हे सगळं साजरं होतं ते मात्र या चेरीच्या फुलांच्या सोबतीने.

मेघालयात फिरताना शहरी भागात मुद्दाम लागवड करून वाढविलेले चेरीचे वृक्ष तर दिसतीलच, पण शहराबाहेरसुद्धा टेकड्यांवर, रस्त्याच्या कडेला, डोंगरमाथ्यावर चेरीच्या फुलांनी बहरलेली झाडं दिसतात. हिरव्यागार कुरणांच्या मधे फुललेलं ते गुलाबी सौंदर्य, डोंगरमाथ्यावरील गच्च हिरवाईत, इतर रंगाच्या फुलांमधून डोकावणारा हा गुलाबी बहर पाहणं हे एक वेगळंच सुख असतं… ठायी ठायी चित्र रेखलं असल्याचा भासच जणू होतो. हे चेरीचे वृक्ष फक्त आणि फक्त फुलांसाठी प्रसिद्ध आहेत, सौंदर्यासाठी लावले जातात. आपण खातो ती चेरीची फळं या झाडांची नसतात. यांच्या फुलांना सुवास ही नसतो. असतं ते फक्त एक कोवळं, नाजूक रूप जे आपल्याला अगदी मोहून टाकतं.

आणखी वाचा-वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!

अशा या सौंदर्यपूर्ण सहलीची आखणी करणार असाल तर चेरी ब्लॉसमच्या नेमक्या तारखा आणि कार्यक्रमाची रूपरेखा तुम्हाला आंतरजालाच्या मदतीने मिळवता येईल. तेव्हा या वर्षी दिवाळीनंतर आसामची सहल नक्की करून या बहराचा आनंद घ्यायला अजिबातच विसरू नका. आसामचा चेरी ब्लॉसम किंवा काश्मीरमधील ट्युलिप गार्डनबद्दल मी भरभरून लिहिलंय, पण एक सांगू, निसर्ग आपल्याही नकळत असे अनेक मोहोत्सव आपल्या अवतीभवती भरवत असतो. आपल्या जगण्याच्या वेगामुळे आपलं त्याकडे लक्षच जात नाही. प्रत्येक ऋतूबदलानंतर निसर्गाचं सौंदर्यही बदलत असतं. आपण आपल्याच व्यापात इतके गुंतलेलो असतो की ते बदल आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत.

माझा एक अनुभव सांगते. एकदा चिपळूण जवळच्या एका छोट्या गावात मी काही कामानिमित्त गेले होते. तिथे एका साध्याशा पत्र्याच्या घरामागे तिळाच्या( कॉसमॉस ) फुलांचं गच्च रानं माजलं होतं. झेंडूच्या पानांसारखी कातरलेली हिरवी नाजूक पानं असलेली ती झाडं नाजूकशा फुलांनी भरून गेली होती. पिवळा, लाल, गुलाबी, पांढरा असे विविध रंग तिथे पसरले होते. मध्यभागी इवल्या पिवळा गोल आणि सभोवती नाजूक पाकळ्या असलेली इवली फुलं त्या दुर्लक्षित जागेची सुंदरता शतपटीने वाढवत होती. मी खुळावल्यासारखी ते पाहात राहिले. वाटलं, ही अशी देखणी रूपं किती सहजपणे आपल्या सभोवती पसरलेली असतात, दोष असला तर तो आपला असतो. आपण ती निरखायला विसरतो. त्यावेळी ठरवलं बागा, मोहोत्सव, प्रदर्शन यातील फुलांचा आस्वाद तर जरूर घ्यायचाच, पण ठायी ठायी पसरलेले हे मूकसौंदर्यसुद्धा न्याहाळत राहायचं.

अशाच अजून काही ठिकाणांबद्दल आणि बहरांबद्दल जाणून घेऊया पुढच्या लेखात… तोवर तुम्हीसुद्धा तुमच्या अवतीभोवती असं काही निरखता येतंय का याचा जरूर शोध घ्या.

mythreye.kjkelkar@gmail.com