वॉटर गार्डन तयार करताना कुमुदिनींबरोबरच अनेक आकर्षक वनस्पती माहीत झाल्या. काहींची माहिती प्रदर्शनांतून मिळाली तर काही वनस्पती अभ्यासक्रमात होत्या, फक्त त्या जोपासल्या नव्हत्या एवढंच. वॉटर गार्डन करण्यासाठी फक्त कुमुदिनी किंवा कमळं इतकेच पर्याय उपलब्ध नसतात, तर अनेक वनस्पती किंवा पाणवेली आहेत़- ज्या आपण छोट्या कुंड्यांमध्ये लावून एक सुंदर लँडस्केप तयार करू शकतो. हायड्रिला ही यातील एक वनस्पती जी पाण्याखाली वाढते लवकर पसरते आणि तळ्याला एक उत्फुल्ल हिरव्या रंगाची अनुभूती देते. या व्यतिरिक्त पिस्चिया(pistia) हीदेखील एक सुंदर वनस्पती आहे. हिला वॉटर कॅबेज किंवा वॉटर लेट्युस असंही नाव आहे. हिरवट पोपटी पानांचा फुलोरा असलेल्या या वनस्पतीच्या तळाला मुळांचा गुच्छ असतो. पाण्यावर तरंगणारा, सहज इकडून तिकडे हलवता येणारा. पिस्चिया फारच मोहक दिसतो. याची आणखी एक खासियत म्हणजे याला हवं तेव्हा बाजूला काढून पाणी स्वच्छही करू शकतो.

बीएससीला असताना आमच्या बांदोडकर महाविद्यालयातील बागेत सुरेख कुंड होते. यात भरपूर वॉटर कॅबेज लावले होते. एखाद्या फुललेल्या सुर्यफुलाएवढा परसरलेला यांच्या पानांचा पसारा पाहणं, कुडांच्या काठावर बसून यांना निरखणं हा त्यावेळी आमचा आवडता उद्योग असे. कुठेही सहज वाढणारे हे पिस्चिया लावायलाही अगदी सोपे आहेत. यांची वेगळी अशी देखभाल करावी लागत नाही. कुंडात मासे असतील तर पाणी न बदलता, कोणतंही खत न देता हे मस्त वाढतात. जर कधी दिवाणखान्यात शोभेसाठी एखादी पुष्परचना करायची असेल तर आकर्षक अशा पसरट बाऊलमध्ये किंवा एखाद्या आकर्षक पात्रात एक दोन पिस्चिया सोडले की झालं. ऊन, थंडी, पाऊस कोणत्याही हवामानात सुखेनैव वाढणारी अशी ही सुरेख वनस्पती आहे.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा
Kolhapur district hit by heavy unseasonal rain during night
अवकाळीचा फटका, कोल्हापुरात उस जमीनदोस्त

आणखी वाचा-बॅडमिंटन व्हाया क्रिकेट! नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कास्यपदक

थायलंडला गेले होते तेव्हा फिरताना तिथली अप्रतिम अशी मंदिरं त्यातील बुद्धाच्या मूर्ती, नक्षीकाम, मंदिरांचे वैविध्य पूर्ण कळस हे सगळं निरखत होतेचं, पण त्याबरोबरच तिथली पाणवनस्पतींनी सजलेली तळी ही आवर्जून बघितली. यात कमळं, कुमुदिनीबरोबरच पाणकणीस, हायड्रीला, पापायरस यांसारख्या वनस्पतीही होत्या. यांच्या आकारमाना प्रमाणे आणि यांच्या गुणधर्माप्रमाणे यांची लागवड केलेली होती. पापायरस हे आपल्या काँग्रेस गवतासारखं दिसणार रोपं. एका छोट्या कुंडीत लावून नेटकेपणाने या तळ्यात लावलेलं होतं. याच्या उंचीमुळे त्या जलीय रचनेला एक वेगळंच परिमाण मिळत होतं. तसंच एक पाणकर्दळीसारखं वाढणारं रोप म्हणजे थालिया (Thalia ). त्यानेही या जलरचनेला उंची आणि खोली या दोन्ही मितींचा आभास मिळत होता.

Japonica म्हणजेच पाणमोगरा, हीसुद्धा अशीच एक सुंदर वनस्पती आहे. हजारी मोगऱ्याच्या पाकळ्यांसारखी रचना असलेली यांची पांढरी शुभ्र फुलं पाण्याच्या वर येऊन डोलणाऱ्या फांद्यांना लगडलेली असतात. या फुलांना हलका सुवासही असतो. आपल्या तळ्यात पाण्यालगत वाढणाऱ्या वनस्पतींसोबत नुसता पाणमोगरा जरी लावला तरी फार सुंदर परिणाम साधता येतो.

बटन वॉटर लीली हीसुद्धा अशीच एक सुंदर कुमुदिनी. हिची इवलीशी फुलं खूपच मोहक दिसतात. छोट्या बाऊलमध्ये किंवा आकर्षक पात्रात थोड्या मातीत ही सुखाने वाढते. वेगळी काळजी न घेताही भरपूर फुलते. जागा बेताची आहे, पण वॉटर गार्डन करायचीची आहे तर ही बटन कुमुदिनी उत्तम पर्याय आहे.

आणखी वाचा-Karsen Kitchen : अंतराळात जाणारी सर्वांत तरुण महिला; २१ व्या वर्षी इतिहास रचणारी कार्सेन किचन कोण?

अनंत चतुर्दशीनंतर सरत्या पाऊस काळात कासच्या पठारावर फिरायला जाणं मला फार आवडतं. तिथलं विविधरंगी पुष्प वैभव बघताना अक्षरशः थक्क व्हायला होतं. चहुबाजूला झालेली रंगांची उधळण बघणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुखचं. या फुलांच्या सान्निध्यात दूरवर चालत जाण्याचा आनंद तर निराळाचं. गच्च पावसाळी वातावरण, सभोवती फुलंचफुलं, वर आभाळात ढगांचे विभ्रम, धुक्याची हलकी दुलई आणि लांबवर पसरलेला रस्ता…

या रस्त्यावरून चालत दूरवर गेल्यावर लागतं ते कुमुदिनीचं तळं. चांदण्यांसारखी उमललेली कुमुदिनीची फुलं म्हणजे दिवसाला पडलेलं रात्रीचं स्वप्नचं जणू. पुढच्या लेखात या कास पठारावरील पुष्पवैभवाची ओळख करून घेता घेता आपण इतरही पाणवनस्पती जाणून घेऊया.

mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader