वॉटर गार्डन तयार करताना कुमुदिनींबरोबरच अनेक आकर्षक वनस्पती माहीत झाल्या. काहींची माहिती प्रदर्शनांतून मिळाली तर काही वनस्पती अभ्यासक्रमात होत्या, फक्त त्या जोपासल्या नव्हत्या एवढंच. वॉटर गार्डन करण्यासाठी फक्त कुमुदिनी किंवा कमळं इतकेच पर्याय उपलब्ध नसतात, तर अनेक वनस्पती किंवा पाणवेली आहेत़- ज्या आपण छोट्या कुंड्यांमध्ये लावून एक सुंदर लँडस्केप तयार करू शकतो. हायड्रिला ही यातील एक वनस्पती जी पाण्याखाली वाढते लवकर पसरते आणि तळ्याला एक उत्फुल्ल हिरव्या रंगाची अनुभूती देते. या व्यतिरिक्त पिस्चिया(pistia) हीदेखील एक सुंदर वनस्पती आहे. हिला वॉटर कॅबेज किंवा वॉटर लेट्युस असंही नाव आहे. हिरवट पोपटी पानांचा फुलोरा असलेल्या या वनस्पतीच्या तळाला मुळांचा गुच्छ असतो. पाण्यावर तरंगणारा, सहज इकडून तिकडे हलवता येणारा. पिस्चिया फारच मोहक दिसतो. याची आणखी एक खासियत म्हणजे याला हवं तेव्हा बाजूला काढून पाणी स्वच्छही करू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा