कितीही छोटी बाग लावायची म्हटली तरी बऱ्यापैकी जागा हवी, पण पाण्यातली बाग करायची असेल तर मात्र अगदी कमीत कमी जागेत विविध प्रकार करू शकतो. अशी बाग तयार करताना कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग करता येईल याचा शोध घ्यायला लागल्यावर असं जाणवलं की, इथे अनेक नवे प्रयोग करायला वाव आहे. एरवी साफ दुर्लक्षिलेल्या किंवा ज्यांना टाकावू या सदरात टाकता येतील अशा अनेक गोष्टी आपण यासाठी वापरू शकतो. एखादी मातीची उरळी, तांब्याचं घंगाळं, चिनी मातीचा किंवा काचेचा पसरट बाऊल असं जे उपलब्ध असेल ते यासाठी कामी येतं… खास अशी काही खरेदी करावी लागत नाही. थोडी कल्पकता असली म्हणजे झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माझ्याकडे बोन्सायसाठी लागणारे चिनी मातीचे बेताचे खोलगट असे बाऊल होते. त्यात मी वेगवेगळे प्रयोग करून बाग तयार केली. ऋतूमानानुसार त्यात बदलही केले. या पाण्यातल्या बागेची गंमत अशी की, जेव्हा एखाद्या रचनेचा कंटाळा येतो त्यावेळी आपण ती रचना पूर्ण मोडून नवीन काही करू शकतो. यामुळे रचनेचं वैविध्य तर जपता येतंच, पण एक तजेलाही मिळतो. वॉटर गार्डन करायचं ठरवलं की सोप्यात सोपं म्हणजे नर्सरीमधून झाड आणणं. अर्थात पाण्यात वाढणारी झाडं सहजासहजी तिथेही मिळत नाहीत. यासाठीचा उपाय म्हणजे थोडं शोधकार्य करायचं.

आणखी वाचा-कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी झटणाऱ्या श्वेता गडाख

फर्न किंवा नेच्याच्या जाती गोळा करायच्या. सध्या पावसाळा नुकताच संपलाय, त्यामुळे अनेक प्रकारच्या, पाण्याच्या कडेला वाढणाऱ्या गवताच्या जाती, विहिरींच्या काठावर किंवा मग विहिरींच्या आतल्या बाजूला उगवलेली नेच्याची झाडं. भिंतीवर उगवणारं शेवाळ- ज्याला आम्ही ब्रोयोफाईटस् म्हणतो, यांचा वापर करता येतो.

जांभा दगडाचे तुकडे, साधे ओबडधोबड काळे दगड, विटा, लाकूड, फरशीचे तुकडे असं बरंच सामान वापरून आपली बाग तयार होऊ शकते. कोकणात गेलात तर जांभा दगड सहज मिळतो, कारण मुळात हा दगड तिथालाच आहे. सच्छिद्र अशा या दगडावर आपण एखादं झाड तारेनं बांधून थोडी माती लिंपून वाढवू शकतो. मग त्यासाठी रस्त्याकडेच एखादं वड-पिंपळाचं, जंगली चेरीच किंवा मग सातवणीच रोपं असं जे सहज मिळेल आणि आवडेल ते झाड निवडता येईल.

एकदा मी काळी हळद, कर्दळी आणि सोनचाफा अशी साधारण एकाच कुळातली, पानांची सारखीच ठेवण असलेली झाडं जांभा दगडावर तारेच्या सहाय्याने बांधून माती लिंपून लावली होती. काळ्या हळदीच्या पानावर सुरेखशी काळी रेघ होती. सोनचाफा आणि कर्दळीला मस्त फुलं येत होती. हे त्रिकूट उत्तम जमलं. एकाच वेळी पाण्यात वाढणारी आणि जमिनीवर फुलणारी अशी सगळी मंडळी एकाच अधिवासात नांदू लागली. वॉटर गार्डनसाठी वनस्पती नर्सरीतून किंवा मग अमेझॉन वरून मागवता येतात.

आणखी वाचा-‘तू कधीच जिमनॅस्ट होऊ शकत नाहीस’ ते ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट; जाणून घ्या दीपा कर्माकरबद्दल

वॉटर अरेलिया, मिनीचर पाम, अम्ब्रेला पाम, क्रेझी ग्रास, ब्राह्मी यासारखी रोपं कमी अधिक उंचीवर लावून सुंदर रचना करता येते. एखाद्या मोठ्या पसरट भांड्यात थोडी चिकट माती, वाळू, दगड यांचा एक पातळ थर करून त्यावर आपण रोपं लावून घ्यायची. उंचीनुसार त्यांची रचना करायची. सोबत मोठे ओबडधोबड दगड टेकू म्हणून लावायचे.विटा शेवाळाच्या तुकड्यांनी झाकायच्या. एवढं केलं तरी एक आगळं वेगळं लँडस्केप तयार होतं. कमीत कमी पाणी घालून हे जगवताही येतं. वॉटर फ्लोटर्स वापरायची असतील तर अझोला फर्न आणि वॉटर कॅबेज वापरता येईल.

फक्त या किंवा कोणत्याही रचनेत जलकुंभीचा वापर कधीही करू नका. कारण वॉटर हयासिंथ किंवा जलकुंभी ही वनस्पती अतिशय जलद वाढते. हिला निळसर फुलं येतात. त्या मोहात पडून आपण ती लावतो, पण पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानिकारक आहे. आजकाल या जल कुंभीच्या देठांना वेगवेगळे रंग लावून हिची कमळाची रोपं म्हणून विक्री करणारे लोकही मी पाहिले आहेत.

आणखी वाचा-मुंगी उडाली आकाशी… मुंग्यांच्या अभ्यासक नूतन कर्णिक!

पेपरस किंवा पेपर रीड या वनस्पती बद्दलही असच म्हणता येईल. ही सुद्धा झपाट्याने पसरते. अशा आक्रमक वनस्पतींचा वापर करताना सावधगिरी का बाळगायची तर आपण वेळोवेळी कटिंग केल्यावर टाकून दिलेल्या अवशेषांपासून यांची वाढ होत असते, त्यामुळे उपयोगापेक्षा उपद्रव वाढतो. शक्यतोवर आपल्या सभोवताली पाणथळ, ओलसर जागी वाढणाऱ्या वनस्पती निवडाव्यात म्हणजे पैसे तर वाचतातच, पण त्यांना वाढवण्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत.

mythreye.kjkelkar@gmail.com