मेथीचे दाणे ओळीने पेरल्यामुळे भाजी खुडणं सोपं होतं आणि दाणे जास्त पेरल्यामुळे वर वर उगवलेली मेथी खुडल्या नंतर दुसऱ्या थरातील दाण्यांचा मोड यायला जागा मिळते. त्यामुळे दोन-तीन दिवसाआड ताजी भाजी मिळत राहते. मेथीसारखेच मोहोरीचे दाणेही पेरले तर मोहरीचा पाला भाजीसाठी वापरता येतो. मोहरीची सुंदर पिवळी फुलं आपलं मन प्रसन्न करतातच, शिवाय शेंगा धरल्या की थोडीफार मोहरीही मिळते.
मागच्या लेखात आपण उन्हाळी फुलांची झाडं कशी लावायची ते पाहिलं होतं. या लेखात आपण रोजच्या वापरासाठी ताज्या पालेभाज्या कशा मिळवू शकू त्याबद्दल माहिती घेऊ या. आहारशास्त्रातनुसार आठवड्यातून एकदोनदा तरी पालेभाजी खाल्लीच पाहिजे. ही पालेभाजी जर आपण घरच्या घरी मिळवू शकलो तर दोन फायदे होतील. एक म्हणजे, निवडण्याची कटकट नाही आणि हवी तेव्हा ताजी भाजी उपलब्ध असेल.
हेही वाचा : सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू, अध्यक्षपदाबाबतही खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश
मग काय काय लावता येईल याचा विचार केला तर पहिल्यांदा आठवते ती मेथी. लावायला सोपी आणि गुणकारी. एखादी रोळी, चाळण, पुठ्याचा खोका, टोपली असं काहीही घेऊन त्यात माती भरायची. एव्हाना माती भरायची म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेलच. माती म्हणजे नर्सरीतील महागडी माती नव्हे, तर आपली माती म्हणजे वाळलेला पालापाचोळा, वाळलेली भाज्यांची देठे, साली, नारळाच्या शेंड्या आणि वाळका काडी कचरा एवढंच. या मातीत आपण लावणार आहोत आपल्या घरी उपलब्ध असलेले मेथीचे दाणे. आपण जे रोज फोडणीत वापरतो तेच. माती गच्च भरल्यानंतर तिला पाणी द्यायचं. मग दोन एक तासानंतर भिजलेल्या मातीत बोटाने थोडी खोल रेषा आखत ओळीने मेथी दाणे पेरायचे. पेरताना दाणे जरा बरेच घ्यायचे आणि अगदी सढळ हाताने पेरायचे. मग त्यावर माती घालून हलका दाब देत ते झाकून टाकायचे. सावकाश पाणी द्यायचं. झालं कामं. आता दोन दिवसातच इवले कोंब दिसायला लागतील. आपल्याला हवी तेवढ्या उंचीची भाजी वाढली की आपण सोयीनुसार ती खुडून घ्यायची. अगदीच बोटभर उंचीची भाजी असेल तर आमटी, पातळ भाजी किंवा कोशिंबिरीसाठी वापरू शकतो. थोडी वाढीला लागली की पानं मोठी होतात मग ती सुकी भाजी किंवा पराठे, ठेपल्यांसाठी वापरू शकतो. मेथीचे दाणे ओळीने पेरल्यामुळे भाजी खुडणं सोपं होतं आणि दाणे जास्त पेरल्यामुळे वर वर उगवलेली मेथी खुडल्या नंतर दुसऱ्या थरातील दाण्यांचा मोड यायला जागा मिळते. त्यामुळे दोन-तीन दिवसाआड ताजी भाजी मिळत राहते.
हेही वाचा : गौतम अदाणींच्या धाकट्या सुनेबद्दलची ‘ही’ माहिती वाचलीत? वडिलांचा हिऱ्यांचा व्यवसाय अन्…
मेथीसारखेच मोहोरीचे दाणेही पेरले तर मोहरीचा पाला भाजीसाठी वापरता येतो. मोहरीची सुंदर पिवळी फुलं आपलं मन प्रसन्न करतातच, शिवाय शेंगा धरल्या की थोडीफार मोहरीही मिळते.
आता तिसरी भाजी म्हणजे कांदा. बरेचवेळा आपल्या कांद्याच्या टोपलीत मोड आलेला एखादा कांदा सापडतोच. असे कांदे जर मातीत लावले तर ताजी कांद्याची पात मिळते. जितकी पात आपण कापून घेऊन तितके कांद्व्याला नव्याने धुमारे फुटतात. कांदापात ठरावीक अंतराने मिळत राहते. खाली मातीत कांद्याची संख्याही वाढीला लागते. याला सुरेख फुले येतात. गोल गुच्छासारखी पांढरी नाजूक फुले फार सुंदर दिसतात. फुलांमध्ये काळेशार बी धरतं ते म्हणजे कलोंजी. पंचफोरण किंवा पराठ्यात जी कलोंजी वापरतो ते हेच बी असतं. बी पासूनही आपण लागवड करूच शकतो. फक्त अशावेळी लगेच कांदापात उपलब्ध होत नाही. त्यासाठी बरांचं वेळ लागतो. लावायला सोपी अशी आणखी एक भाजी म्हणजे माठ. लाल माठ किंवा मग हिरवा माठ. यासाठी राजगिऱ्याचं बी पेरायचं किंवा मग नर्सरीतून बिया आणाल्यातरी चालतील. एकदा आपण माठ लावला की याला येणाऱ्या बिया पुढे सतत वापरू शकतो. दरवेळी बी विकत घ्यावं लागत नाही. हे एक वेडं पिकं आहे. एकदा माठ लावला की कालांतराने आपल्या सगळ्या कुंड्यांमध्ये माठाची इवली झाडं उगवलेली दिसतात.
हेही वाचा : स्त्री आरोग्य : थायरॉइडच्या समस्येमुळे वजन वाढतं का?
माठ चटकन वाढतो. जितकी पानं खुडावीत तेवढा बहरतो. माठाची कोवळी देठं भाजीला दाटपणा देतात. माठाचं बी पक्षांचं आवडत खाद्य, त्यामुळे माठ लावला की त्यांचे पाय आपल्या बागेकडे आपसूकच वळतात.
अळू आणि रताळूचा पाला कसा मिळवायचा ते आपण मागच्या लेखात पाहिलंय. अशाप्रकारे थोड्या श्रमात मेथी, मोहरी, माठ, अळू, रताळू,कांदा या सगळ्या भाज्या आपण सहजी मिळवू शकतो.
मग काय, करणार ना सुरुवात या सगळ्याची?
जरूर करा आणि मला आवर्जून तुमचे अनुभव कळवा. काही प्रश्न असतील तर आपण सोडवूच.
mythreye.kjkelkar@gmail.com