काही वेळा आपलीच मित्रमंडळी आपल्या मनाविरुद्ध वागायला भरीस पाडतात. त्यात फार नुकसान नसेल तर पुढे जायला हरकत नाही; पण तुमच्या तत्त्वाच्या, कम्फर्टच्या विरुद्ध असेल तर मात्र नाही म्हणायलाच हवं.

मैत्रिणींनो, जन्म झाल्यापासून आतापर्यंत तुमच्या आमच्यावर कधी तरी अशी वेळ येतेच ना, जेव्हा इच्छा नसूनही आपण काही गोष्टी करतो. जसं की, आतलं मन नको म्हणत असेल तरी कंपूच्या आग्रहाखातर रात्री उशिराचा मूव्ही बघायला गेलो आणि कुठल्या तरी अडचणीत सापडलो. गाडी बंद पडली किंवा ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं… कधी शॉर्टकट घ्यायचा म्हणून मैत्रिणींच्या जिद्दीमुळे एखाद्या एकलकोंड्या गल्लीतून गेलो आणि जीव भीतीने घाबराघुबरा झाला. काही अनर्थ जरी नाही झाला तरी त्या वेळी आपण असं धाडस न करता मनाचं ऐकायला हवं होतं, असं वाटत राहतं.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा… ‘ब्लॅक फेमिनिझम’ म्हणजे काय ? ‘एफजीएम’च्या घटना आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर का घडतात ?

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण मित्रमैत्रिणी किंवा घरातले सोडून इतर नातेवाईक यांच्या म्हणण्याला डावलता येत नाही म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतो. आपल्याला ते करताना अयोग्य, असुरक्षित वाटत असेल तर वेळीच ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे. आता प्रज्ञाचंच उदाहरण बघा ना. प्रज्ञा उच्च शिक्षणासाठी तिच्या शहरातून आणखी मोठ्या शहरात गेली. तिथे देशातील विविध भागांतील विद्यार्थी होते.

काही दिवसांतच त्यांचे वेगवेगळे गट बनले, मग रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, गाड्या फिरवत पिकनिकला जाणं सुरू झालं. तिची रूममेट म्हणाली, “प्रज्ञा, येतेस का आमच्या सोबत? लेट्स गो फॉर होल नाइट वॉक! आधी हुक्का क्लब, मग डिनर आणि त्यानंतर अहुजाच्या फ्लॅटवर चिल करू. नंतर रात्री वॉक करत करत फिरायचं. इथलं नाइट लाइफ बघ एकदा. खूप मज्जा येते.” ते सगळं ऐकून प्रज्ञा गांगरली. ग्रुपमध्ये एका मर्यादेत मजा करणं, ट्रिपला जाणं याला तिचा विरोध नव्हता; पण केवळ थ्रिल अनुभवायचं म्हणून कुठल्याही असुरक्षित वातावरणात जाण्याची तिची इच्छा नव्हती. तिनं जायला नकार दिला. “ चल गं. काही नाही होत. कसली मज्जा येते. तुला कळेल खऱ्या धम्मालचा अर्थ.” “ छे नको. एखाद्या पार्टीला जाऊ ते ठीक, संध्याकाळी जाऊ आणि वेळेत परतु, पूर्ण रात्रभर बाहेर भटकायचं असेल तर ते फक्त गणपतीच्या दिवसांत. जेव्हा संपूर्ण शहर जल्लोषात असतं तेव्हा. कधीही नाही येणार मी. तुम्ही जा.”

“एकच आयुष्य मिळतं प्रज्ञा. त्यात तुला फक्त चार भिंतींत राहायचं असेल तर सॉरी. उद्या मी आयशाच्या रूममध्ये शिफ्ट होईन. यू आर सो बोरिंग!” धाडकन दरवाजा आपटून ती बाहेर गेली. प्रज्ञाला वाईट वाटलं; पण आपण मनाला न पटणारी कृती केली नाही आणि नकार दिला याचं तिला समाधान वाटलं.

हेही वाचा… हजारो तैवानी स्त्रिया गोठवतायेत आपली स्त्रीबीजे

आसावरी एका नृत्यशाळेत हिपहॉप नृत्याचे धडे घेत होती. एक दिवस घरी जाताना तिथल्या सरांनी तिला रस्त्यात गाठलं. कारमधून घरापर्यंत सोडतो म्हणाले. तिचं घर त्याच मार्गावर असल्याने ती गाडीत बसली. सर म्हणाले, “पुढच्या गल्लीत माझा एक मित्र राहतो, दोन मिनिटांचं काम आहे ते करून येतो.” सरांनी गाडी त्या गल्लीत थांबवली. तिला ते फारसं आवडलं नाही, कारण आता उशीर होणार होता. ती खाली उतरणार इतक्यात सर आले. “आसावरी, कम. माझा मित्र जरा बाहेर गेलाय, तो येईपर्यंत थोडं थांबावं लागेल. इथे रस्त्यावर नको, आपण आत थांबू या.” तिला हे बिलकूल आवडलं नव्हतं; पण सरांना कसं नाही म्हणायचं म्हणून तिच्या मनात खळबळ सुरू झाली होती, मात्र धीर करून खाली उतरत ती म्हणाली, “माझ्या वडिलांचा फोन आला होता सर, ते मला घ्यायला निघाले आहेत. समोरच्या रोडवर आहेत.”

“पण मी सोडतो ना तुला,” तिचा हात धरत सर म्हणाले, तशी ती जोरात ओरडली, “नाही म्हणाले ना मी? मी जातेय.” तिचा आवाज ऐकून एक-दोन जण तिथे थांबले आणि सर वरमले. ती ताबडतोब तिथून घराकडे चालती झाली. आपण कुठल्या संकटाला आमंत्रण दिलं नाही. वेळीच सावध झालो याचा आनंद होता तिच्या मनात.

हेही वाचा… मासिक पाळीच्या सुट्टीविषयी बोलायला लागा…

रेणुका एका फायनान्स कंपनीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून नोकरी करत होती. अगदी सुरुवातीपासून तिचा पेहराव साधा; पण लक्ष वेधून घेणारा असायचा. ती स्टायलिश होती; पण फार तोकडे कपडे वापरणं तिला आवडायचं नाही. त्यांच्या कंपनीच्या एका पार्टीसाठी सगळ्यांनी ड्रेसकोड ठरवला. पुरुषांनी काळ्या रंगाचा कोट, टाय आणि स्त्रियांनी छोटा वनपिस ड्रेस आणि उंच टाचांच्या चपला घालायचा निर्णय झाला. रेणुकाने त्याला विरोध केला. “मी काळा वनपिस घालते, स्टिलेटोस शूजही घालीन; पण अपरा, मिनी ड्रेस मला जमणार नाही. तुम्ही शॉर्ट ड्रेस घाला, मी थोडा लांब घालेन.” या मुद्द्यावर सगळ्यांनी तिच्याशी वाद घातला. एकसारखे कपडे घालू, म्हणून खूप आग्रह केला. ती म्हणाली, “ज्या पोशाखात वावरायला मला अवघडल्यासारखं होईल तो पोशाख मी वापरणार नाही. मी तुम्हाला विरोध नाही करत, तो तुमचा चॉइस आहे. मला भरीस पाडू नका, नाही तर मी पार्टीला येणार नाही.” ती तिच्या म्हणण्यावर ठाम होती.

जिथे अनावश्यक तडजोड करण्याची गरजच नाही तिथे संपूर्ण निर्णय नक्कीच आपल्या मताने घ्यायला हवा. आपला कॉम्फर्ट, आपली मतं सोडून न पटणाऱ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. योग्य तिथे नकार देता आलाच पाहिजे. आजच्या आपल्या चुकीच्या निर्णयाने संकटात पडू अशी किंवा पुढे भविष्यात पश्चात्ताप होईल अशी कुठलीही बाब करण्याची गरजच नाही. समोरील व्यक्ती विनाकारण दबाव आणत असेल तर नाही म्हणता यायला हवं. “नो मीन्स नो” म्हणता आलं पाहिजे.

adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader