करोनामुळे लसीकरण हा शब्द आणि त्याचे फायदे, महत्त्व घराघरात पोहोचले आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरणाचा फायदा होतो. त्यामुळेच बाळ जन्माला आले की काही लशी आवर्जून दिल्या जातात. जन्मानंतरच्या काही वर्षांमध्ये आजार होऊ नयेत यासाठी या लशी असतात. बाळांना दिल्या जाणाऱ्या या लशींसदर्भात एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. नैसर्गिक प्रसूती म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरीने जन्म झालेल्या बाळांना लस दिल्यानंतर सिझरीयनने जन्म झालेल्या बाळांपेक्षा त्यांच्यातील अँटीबॉडीजची (Antibodies) संख्या अधिक असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. दोन प्रकारच्या आजारांवरील अँटीबॉडीजवर याचा परिणाम जाणवला आहे. फुफ्फुसांचा संसर्ग (Lungs Infection) आणि मेंदूज्वर (meningitis). दोन्ही विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजंतूंशी लढणाऱ्या अँटिबॉडीज नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात, असे संशोधनादरम्यान लक्षात आले.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात कुंडलीचे मोल?

What did you decide on the No November trend Chatura new
चतुरा: ‘नो नोव्हेंबर’ ट्रेंड मध्ये तुम्ही काय ठरवलं?
Womens Health Suffering from abdominal
स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?
nisargalipi Decorating glass garden
निसर्गलिपी : काचपात्रातील बाग सजवताना…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग , स्पार्ने हॉस्पीटल , ड्युक्ट्रेक्त युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि नेंदरलँडच्या सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण राष्ट्रीय संस्थेच्यावतीने हे संशोधन करण्यात आले. नेचर कम्युनिकेशन्समध्ये हा संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. स्कॉटलंडच्या चीफ सायंटिस्ट ऑफिस आणि नेंदरलँड्स ऑर्गनायझेशन फॉर सायंटिफिक रिसर्चकडून या संशोधनासाठी निधीपुरवठा करण्यात आला. जन्माला आल्यानंतर संसर्गजन्य आणि अन्य आजार होऊ नयेत यासाठी बाळांना काही लशी देणे आवश्यक असते. गर्भवती महिला आणि त्यांचे डॉक्टर यांच्यातील सी सेक्शन प्रसूतीबद्दल चर्चेत या माहितीचा उपयोग होईल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?

८ आणि १२ आठवड्यांच्या १२० बाळांना फुफ्फुसांचा संसर्ग आणि मेंदूज्वरावरील लशी देण्यात आल्या. या बाळांच्या आतड्यांतील सूक्ष्मजंतू आणि अँटीबॉडीजचे परस्पर संबंध या संशोधनाअंतर्गत तपासण्यात आले. आपल्या शरीरात मायक्रोब्स म्हणजेच सूक्ष्मजंतू असतात. एक वर्षाच्या आतील बाळांमध्ये त्यांचा विकास कसा होतो आणि ते लशींना कसा प्रतिसाद देतात हे शोधण्यासाठी १२ आणि १८ महिन्यांच्या बाळांच्या लाळेच्या नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. फुफ्फुसांच्या संसर्गाला रोखण्यासाठी देण्यात आलेल्या लसीमुळे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या बाळांमधील अँटीबॉडीज सी सेक्शनने (C Section) जन्माला आलेल्या बाळांपेक्षा दुप्पट असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. तसंच नैसर्गिक प्रसूतीतून जन्म झालेल्या ज्या बाळांना मातेचे दूध मिळाले त्यांच्यामध्ये अँटीबॉडीजची पातळी इतर मुलांपेक्षा ३.५ पट अधिक होती, असेही लक्षात आले.

आणखी वाचा : ‘किल द बिल’ची ओपोकू आहे तरी कोण ?

मेंदूज्वरावरील लस दिलेल्या ६६ बाळांच्या अँटीबॉडीजच्या पातळीचीही चाचणी करण्यात आली. नैसर्गिक प्रसूतीने जन्माला आलेल्या बाळांमध्ये या अँटीबॉडीज सी सेक्शनने जन्माला आलेल्या बाळांपेक्षा १.७ पटीने जास्त असल्याचे आढळून आले. जन्माच्या वेळेसच आपल्या आतड्यांमध्ये काही सूक्ष्मजंतू असतात, जे जन्मानंतरच्या काही काळात विकसित होतात. प्रसूती कोणत्या प्रकारे झाली आहे , स्तनपान आणि अँटीबायोटिक्सचा वापर यांचा त्यावर परिणाम होतो. अर्भकांच्या आतड्यांमध्ये असलेले सूक्ष्मजंतू आणि अँटीबॉडीजची पातळी यांच्यात स्पष्ट संबंध असल्याचे या संशोधकांच्या टीमला आढळून आले. बाळांमध्ये लहान वयातच असलेल्या या सूक्ष्मजंतूंचे लसीकरणामुळे मिळणाऱ्या अँटीबॉडीजमध्ये योगदान असते. तसेच लहान वयात होणाऱ्या काही संसर्गांपासून एक प्रकारचे संरक्षणही मिळते असा निष्कर्ष यावरून संशोधकांनी काढला आहे.
प्रसूती कोणत्या प्रकारे होणार आहे किंवा भविष्यात त्या बाळामध्ये विकसित होणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या आधारे लसीकरणाचे वेळापत्रक ठरविले जाऊ शकते असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : इन्सुलिनची शंभरी : रोमांचक शोधाची कहाणी

“आतड्यातील सूक्ष्मजंतू आणि बाळांचा लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद यामध्ये काहीतरी संबध नक्की आहे हे असे आम्हाला अपेक्षित होते. पण जन्मानंतरच्या काही आठवड्यांतच त्याचे इतके प्रभावी परिणाम होत असतील असे मात्र आम्हाला अजिबात वाटले नव्हते,” अशी प्रतिक्रिया ॲमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील पहिल्या लेखिका आणि मायक्रोबायोलॉजीच्या प्रशिक्षणार्अथी डॉ. एम्मा दे कॉफ यांनी व्यक्त केली. प्रसुतीचा प्रकार आणि लसीकरणामुळे मिळणारा प्रतिसाद यामध्ये काही फायदेशीर सूक्ष्मजंतू शोधून काढणे ही खरेच एक चांगली गोष्ट आहे, असे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमधील पेडियाट्रीक मेडिसिन्सचे प्रमुख प्रो. डेबी बॉगेर्ट यांनी म्हटले आहे. सी सेक्शनने जन्मलेल्या बाळांना जन्मानंतर लगेचच कदाचित हे सूक्ष्जंतू सप्लिमेंट म्हणून देता येऊ शकतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. यासाठी आईकडून बाळाकडे मल प्रत्यारोपण (faecal transplants) किंवा काही विशिष्ट प्रोबायटिक्सचा वापर करता येईल का याबाबतही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

(शब्दांकन: केतकी जोशी)