Gender Equality in Schwing Stetter : पुरुषांची मक्तेदारी मोडित काढत अनेक क्षेत्रांत महिलांनी सेवा बजावली आहे. बांधकाम उद्योगात वापरली जाणारी सिमेंट मिक्सरसारखी मोठी पिवळी यंत्रं चालवणं, त्यांची निगा राखणं पुरुषांची कामे होती. पण अशी मोठी यंत्रे बनवणाऱ्या श्विंग स्टेटर इंडिया कंपनीने आता मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी चेन्नई येथील पूनमल्ली येथे पहिलं संपूर्ण महिला सेवा केंद्र सुरू केले आहे. यामध्ये २० ते २५ वयोगटातील १७ कुशत्र महिला तंत्रज्ञ कार्यरत आहेत. या महिला तंत्रज्ञांकडून यंत्रांची दुरुस्ती केली जाते. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२०४७ पर्यंत ५० टक्के स्त्रियांना संधी देणार

ब्लू कॉलर नोकऱ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता रुजवली जात असताना आता विक्री आणि सेवांमध्येही असाच प्रयत्न सुरू असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. श्विंग स्टेटर इंडियाचे सीएमडी व्हि. जी. शक्तीकुमार म्हणाले की, “२०४७ पर्यंत सर्व विभागांमध्ये ५० टक्के स्त्रियांना संधी देणं आमचं लक्ष्य आहे. भारताच्या पायाभूत सुविधांना आकार देण्यासाठी महिला अभियंता आणि तंत्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणं गरजेचं आहे. त्या मार्गाचे आम्हाला नेतृत्व करायचे आहे.”

हेही वाचा >> CS परीक्षा उत्तीर्ण आहे “या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरची पत्नी! आता केक विकून कमावते कोटींमध्ये नफा, कोण आहे ती?

आतापर्यंत दोन मशिन्सची सर्व्हिस

नव्या सेवा केंद्रात सर्व महिला संघ काँक्रिट पंप आणि मिक्सरच्या श्रेणीची सेवा आणि दुरुस्ती करणार आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये इंजिनातील दोषांचे निवारण करणे आणि प्रतिबंधात्मक देखभाल करण्यापासून ते सर्वसमावेशक मशीन सर्व्हिसिंग देणे या सर्व गोष्टींचा समावेश असेल. सेवा केंद्राच्या उद्घाटनापासून तीन मशीन सर्व्हिस केल्या गेल्या आहेत. यामध्ये दोन सात क्युबिक मीटर ट्रान्झिट मिक्सर आणि एक पंप आहे.

कंपनी फॅक्टरी फ्लोअर ऑपरेशन्समध्ये महिलांची संखअया सातत्याने वाढत आहे. सिपोकट चेय्यर येथील आमच्या नवीन प्लांटने २०२१ मध्ये काम सुरू केले आणि आमच्या कारखान्याच्या असेंब्ली लाइनमध्ये महिलांची संख्या २८ टक्के आहे. तसंच, ७०टक्के तामिळनाडूमधील आहेत, तर उर्वरित केरळ, झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. सध्या वेल्डिंग, असेंब्ली लाईन, गुणवत्ता, सेवा आणि स्पेअर्स विभागात स्त्री पुरुष समानता दिसून येते.

हेही वाचा >> Who is Pinki Haryan : इच्छा तिथे मार्ग! भिक्षा मागणारी मुलगी बनली डॉक्टर, झोपडपट्टीत राहिलेल्या पिंकीची यशोगाथा तुम्हालाही देईल प्रेरणा!

महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

कारखान्यातील इतर कर्माऱ्यांप्रमाणे कंपनीतील महिलांना वसतिगृह आणि प्रवसासाठी बसची सेवा पुरुवली जाते. सेवा केंद्रात महिलांसाठी अनुकूल वातावरण तयार केले जाते. सॅनिटरी पॅड व्हेडिंग मिशनचीही सुविधा येथे उपलब्ध करून दिली जाते.