उडिसा राज्यातील मल्कानगिरी जिल्ह्यातील कोया आदिवासी जमातीतील जयंती बुरुदा या त्यांच्या कुटुंबातील नववं अपत्य. प्रचंड गरिबी, शिक्षणाचा अभाव, खाण्यापिण्याची आबाळं तसंच समाजातील विविध बंधनं ही आदिवासी समाजाच्या पाचवीलाच पूजलेलं. जयंती बुरुदा यांच्याबाबतीतही हीच कहाणी. लहानपणी हलाखीच्या परिस्थितीमुळे त्या आईसोबत जंगलात लाकूड गोळा करणं, गाईंना चरायला घेऊन जाणं, मोहाची फुलं तोडण्यास मदत करणं अशी कामं करीत असत… हे जगणं नित्याचंच हाेतं. पण त्यांच्या आयुष्यात एक दिवस असा आला की त्यांच्या जीवनाला, जगण्याला वेगळं वळण देऊन गेला.

त्याचं झालं असं की, एक दिवस दोन शिक्षक जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुला – मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करावं या हेतूनं त्यांच्या गावात आले. त्या शिक्षकांच्या बोलण्याचा जयंती यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्या शिक्षकांमुळे जयंती यांच्या मनात शिक्षणाबद्दल रुची निर्माण झाली. सुरुवातीला त्यांना घरातून विरोध देखील झाला, पण जयंती आपल्या मतावर ठाम राहिल्या आणि शेवटी घरच्यांनी देखील माघार घेऊन तिला शिक्षणासाठी पाठिंबा दिला. जयंती या त्यांच्या समाजातल्या दहावी बोर्ड परीक्षा पास होणाऱ्या पहिल्याच.

vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Cobra bite while performing a dance shocking video goes viral on social media
VIDEO: जिवाशी खेळ कशाला? विषारी सापासोबत डान्स अंगाशी आला; लाइव्ह स्टेजवरच महिलेला कोब्रा डसला
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती

हेही वाचा : निसर्गलिपी: ताजी ताजी भाजी…

पण संघर्ष इथेच थांबला नाही. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं होतं, पण पुन्हा घरातून वडिलांचा विरोध चालू झाला. वडिलांच्या विरोधाला न जुमानता त्या स्वत:च्या मतावर ठाम राहिल्या व पुढील शिक्षणासाठी स्वजबाबदारीवर मल्कानगिरी शहरात गेल्या. तिथे पुढील शिक्षण घेत असताना त्यांनी त्याभागातील झोपडपट्टीतील मजुरांच्या मुलांचे शिकवणीचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना समाजकार्याचीदेखील आवड निर्माण झाली व पुढे त्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी या स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या.

समाजकार्य करताना त्यांना विविध कार्यालयांना भेट देताना पुरुषीवर्चस्वाचा अनुभव आला. उच्च पदावर असणाऱ्या पुरुषीवर्चस्वाने एक महिला म्हणून त्यांच्या अडचणींना, प्रश्नांना, प्रतिसाद देण्यात नेहमी टाळाटाळ केली. आजच्या आधुनिक जगातदेखील होत असलेला लिंगभेदभाव पाहून त्यांना खूप राग अनावर होई.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू, अध्यक्षपदाबाबतही खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश

पण तरीही त्यांनी संयम राखून हे पुरुषीवर्चस्व मोडून काढण्यासाठी पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं असं ठरवलं. पत्रकार झाल्यावर हे लोक नक्कीच माझ्या प्रश्नांना, अडचणींना, विनंत्यांना प्रतिसाद देतील असं त्यांना मनोमन वाटत होतं. म्हणून त्यांनी केंद्रीय विद्यापीठ कोरापुट येथे पत्रकारितेचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर भुवनेश्वरमधील एका स्टुडिओमध्ये इंटर्नशिप करत असताना पत्रकार व चित्रपट निर्माता बिरेन दास यांच्याशी भेट झाली. बिरेन दास यांनी त्यांच्यातील गुण हेरून त्यांना कॅमेरा कसा हाताळायचा, मुलाखात कशी घ्यायची, चित्रपट एडिटिंगचे काम शिकविलं.

त्यानंतर जयंती यांना एका प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये नोकरी तर मिळालीच, पण आदिवासी समाजातील असल्यानं तिथेही त्यांना कमी लेखलं जाई, त्यांच्या कामाचं श्रेय त्यांना दिलं जात नसे. तरीही जयंती यांचा आत्मविश्वास जराही डगमगला नाही.

पण म्हणतात ना सगळेच दिवस सारखे नसतात. तसंच काहीसं जयंती यांच्याबाबतीतसुद्धा झालं. जयंती यांच्या मित्रमंडळींनी त्यांची मेहनत पाहून त्यांना आर्थिक सहाय्य तसंच इतर कोणतीही लागेल ती मदत करायला मदतीचा हात पुढे केला. २०१६ मध्ये पिकल जार मिडिया कंपनीच्या संस्थापक वासंती हरिप्रकाश यांच्याशी जयंती यांची भेट झाली. वासंती यांना आधीपासूनच उडिसामधील आदिवासी भागातील परिस्थितीची जाण होती. जयंती यांच्या संघर्षाने प्रभावित झालेल्या वासंती यांनी त्यांना नेटवर्क ऑफ वुमेन इन मिडिया (NWMI) या महिलांचा समूह असलेल्या प्रिंट, ब्रॉडकास्टचा भाग असलेल्या संस्थेत सहभागी करून घेतलं. त्याच वर्षी झालेल्या महिलांच्या एका अधिवेशनात वासंती यांनी आपल्या भाषणात जयंती यांच्या संघर्षाचा उल्लेख केला.

हेही वाचा : गौतम अदाणींच्या धाकट्या सुनेबद्दलची ‘ही’ माहिती वाचलीत? वडिलांचा हिऱ्यांचा व्यवसाय अन्…

२०१७ मध्ये एनडब्ल्यूएमआयतर्फे पत्रकारांसाठीची फेलोशिप त्यांना मिळाली. आर्थिक मदतीसोबतच त्यांना लॅपटॉप वगैरेही देण्यात आला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जयंती यांनी स्वतंत्रपणे ‘एल्डर सिस्टर’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्या आपल्या आदिवासी समाजात मासिक पाळीतील स्वच्छता आणि त्या काळात आरोग्याबाबत महिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत स्वत: आणि अन्य महिलांना सहभागी करून घेत जनजागृती शिबीर आयोेजित केलं. सोबत मल्कानगिरी जिल्ह्यात एकेठिकाणी रस्त्याच्या कडेला खुलं वाचनालय (Open liabrary) सुद्धा सुरू केलं. या वाचनाचा हेतू असा की, आसपासच्या गावातील मुलांना वाचनाची गोडी लागावी.

२०२३ मध्ये त्यांनी आदिवासी समुदायाला शिक्षित, सशक्त करण्यासाठी ‘जंगल राणी’ नावाचा एक नवीन उपक्रम चालू केला. यासाठी त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. भविष्यात त्यांना आदिवासी समाजासाठी स्वत:चं हक्काचं मीडिया हाऊस, स्वत:चं हक्काचं व्यासपीठ तयार करायचं आहे, जेणेकरून तिथे त्यांना आदिवासी समाजाच्या कथा, व्यथा निसंकोचपणे बिनधास्त मांडता येतील. यातून आम्ही आदिवासी असलो तरी आम्ही देखील समाजाचा मानवजातीचा एक भाग आहोत हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं आहे.

हेही वाचा : स्त्री आरोग्य : थायरॉइडच्या समस्येमुळे वजन वाढतं का?

जयंती या भारतीय स्कूल ऑफ बिझनेसची स्वतंत्र थिंक टँक असलेल्या भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसीच्या समन्वयक म्हणून काम करीत आहेत. यामध्ये त्या द कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स राइट्स (CFR) म्हणजे सामुदायिक वन संसाधन हक्कांबद्दल बोलतात. यामध्ये त्या आदिवासींचे हक्क, अधिकार, वनसंपतीचे संरक्षण, संवर्धन यांचं व्यवस्थापन तसेच आदिवासी समुदायाच्या विकासाच्या दृष्टीनं मूलभूत गरजा पूर्ण करण्याची भूमिका बजावत आहेत.

सध्या त्या आदिवासी सल्लागार परिषदेच्या सदस्या म्हणून समाजाचं नेतृत्व करत आहेत. त्याबरोबरीनं सामाजिक कार्यदेखील अविरत चालू आहे. आपल्याप्रमाणेच आपल्या समाजातील मुलांनादेखील शिक्षित करण्याच्या हेतूनं त्या त्यांच्या समाजातील काही मुलामुलींचं पालकत्व घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. जयंती या आज त्यांच्या समाजात कोणासाठी बहीण तर कोणासाठी आई झाल्या आहेत. त्यामुळेच आदिवासी समाजातील महिलेच्या असामान्य कर्तृत्वाची फोर्ब्स इंडियांनं दखल घेऊन जयंती बुरुडा यांची फोर्ब्स इंडिया वुमन पॉवर लिस्ट २०२४ मध्ये स्थान दिलं.