सध्या पार्टीचा सीझन (Party Season) आहे. घरी, मित्रमैत्रिणींकडे तर पार्ट्या असतातच, पण सध्याच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये ऑफिस पार्टी (Office Party) ही अनिवार्य गोष्ट आहे. एरवी ऑफिस ते घर असं सतत धावणाऱ्या स्त्रियांसाठी तर या ऑफिस पार्टी म्हणजे एक मोठं रिलॅक्सेशन असतं. ऑफिसमध्ये नेहमी काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी थोडंसं रिलॅक्स व्हावं, सणांचा आनंद एकत्र घ्यावा, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण असावं… असा या पार्टीमागचा हेतू असतो.

महत्त्वाचं म्हणजे, ऑफिस पार्टीला जायचं टाळू नका. एखादा दिवस घर, नवरा, मुलंबाळं, स्वयंपाक असं काही काळ तरी बाजूला ठेवून अशा पार्टींमध्ये अवश्य सहभागी व्हा. ऑफिस पार्टीमुळे (Office Party) तुमची तुमच्या सहकाऱ्यांबरोबर ओळख होते, त्यांच्याशी तुम्ही मिक्स होता. तुमचा बॉस किंवा अन्य वरिष्ठ, सहकारी यांच्याशी कामाव्यतिरिक्त एक वेगळ्या प्रकारे संवाद होऊ शकतो. रोजच्या कामाच्या धबडग्यात अनेक मैत्रिणींना आपल्या सहकाऱ्यांशी बोलायला वेळ मिळत नाही. किंवा काही जणींची प्रतिमा अगदी गंभीर अशी निर्माण झालेली असते. या पार्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सहकारी किंवा ज्युनिअर्सशी सहजपणे संवाद साधू शकता. मात्र एरवीच्या पार्ट्यांपेक्षा या पार्ट्या अर्थातच थोड्याशा वेगळ्या असतात. ऑफिससारखं वातावरण नसलं तरी त्या काहीशा फॉर्मल नक्कीच असतात. या पार्टीसाठी काही एटीकेट्स असतात. त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. या अगदी साध्या-सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर ऑफिस पार्टीजचा तुम्हीही आनंद घेऊ शकाल.

In Diwali Uncle burst fire crackers on his head viral video on social media
“काका ऑन फायर”, फटाका पेटवला अन् चक्क डोक्यावरच ठेवला, काकांबरोबर पुढे काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Bigg Boss gave these big power to Chahat Pandey
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”
Bigg Boss 18
‘वीकेंड का वार’मध्ये घरातील सदस्यांना बसणार शॉक; ‘बिग बॉस १८’मध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगणची एन्ट्री
Viral Video Of Village
‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO
pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
Mindhunter Dark Narcos Aranyak webseries netflix
या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा

आहारवेद : मासिक पाळीतील वेदनांवर गुणकारी केळफूल

कपड्यांकडे विशेष लक्ष द्या (Outfit)

ऑफिस पार्टी इन्फॉर्मल असली तरी तिथे कसेही कपडे घालून जाणं योग्य नाही. तुम्हाला कम्फर्टेबल (Comfortable Outfit) वाटेल आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही अवघड वाटणार असे कपडे घाला. अति शॉर्ट स्कर्ट, वनपीस किंवा खूप अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणं टाळा. एरवीच्या पार्टीला तुम्ही घालता त्यापेक्षा विचार करून थोडे सोबर कपडे ऑफिसच्या पार्टीला घाला.

सगळ्यांना घेऊन जाऊ नका

ऑफिस पार्टी ही फक्त ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठीच असते. जर निमंत्रण असेल तरच तुमच्या जोडीदाराला घेऊन जा. त्यामुळे पार्टीच्या आधी सोबत कुणाला न्यायची परवानगी आहे का याची माहिती करून घ्या. पार्टीमध्ये तुमची लहान मुलं किंवा जोडीदाराला घेऊन जाऊ नका. तुमच्याबरोबर अनाहुतासारखं आल्यानं तुमच्या जोडीदारालाही अवघड वाटेल आणि निमंत्रण नसतानाही बरोबर कुणाला घेऊन गेलात तर तुमची प्रतिमाही खराब होईल. अशा पार्टीजमध्ये लहान मुलांना घेऊन गेलात तर त्यांना सांभाळताना तुम्हाला कोणाशी बोलता येणार नाही.

हेही वाचा: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पिण्यावर नियंत्रण ठेवा

ऑफिस पार्टीजमध्ये ड्रिंक्स सहसा असतातच. सध्याच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये तर स्त्री कर्मचाऱ्यांनीही ड्रिंक्स घेणं हे नॉर्मल आहे. पण म्हणूनच ऑफिस पार्टीजमध्ये ड्रिंक्स घेताना जरा सावधान! तुम्हाला जरी एरवी ड्रिंक्सची सवय असेल तरीही ऑफिस पार्टीजमध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवा. भरपूर दारू पिऊन अगदी झिंगू नका. ड्रिंक्सची सवय नसेल आणि तुम्हाला इच्छा नसेल तर कुणी कितीही आग्रह केला तरी नम्रपणानं नकार द्या. जितकं सहन होत असेल तितकेच ड्रिंक्स घ्या.

गॉसिप करू नका

ऑफिस म्हणजे गॉसिप आलंच. त्यात महिला एकत्र आल्या की गॉसिप होतंच अशी टीका होते. पण अशा ऑफिस पार्टीजमध्ये मात्र गॉसिप करणं टाळा. तुम्हाला जर गॉसिप करण्याची सवय असेल तर ऑफिस पार्टीजमध्ये ही सवय अवश्य बाजूला ठेवाच. ऑफिसमधल्या अन्य सहकाऱ्यांबद्दल खासगी गोष्टी किंवा तक्रारी पार्टीत करू नका. अन्य स्त्री कर्मचाऱ्यांबद्दलही काहीही गॉसिप करू नका. विचार करून बोला. मस्तीच्या मूडमध्ये पार्टी खराब होईल किंवा कुणाला लागेल असं काहीही चुकूनही बोलू नका. यामुळे वातावरण तर खराब होईलच आणि तुमची इमेजही खराब होईल.

ऑफिसच्याच गप्पा नकोत

रोजच्या कामातून थोडा विरंगुळा, कर्मचाऱ्यांना आराम मिळण्यासाठी म्हणून अशा ऑफिस पार्टीजचं आयोजन केलं जातं. इयर एंडर पार्टी तर वर्षभराच्या कामातून थोडं रिलॅक्स होण्यासाठी असते. अशा वेळेस मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांबरोबर इतर गप्पा मारा. ऑफिस, काम, प्रोजेक्ट हे सगळे विषय बाजूला ठेवा. अगदी ज्युनिअर्सना कामाबद्दल विचारण्याचा किंवा सूचना देण्याचा मोह टाळा. कुणी काही चूक केली असेल तर त्याबद्दल या पार्टीत बोलू नका, बॉसशीसुद्धा सतत प्रोजेक्टबद्दल वगैरे बोलू नका. नाहीतर तेही वैतागतील. अशा पार्टीजमध्ये जर तुम्ही पुनःपुन्हा कामाचा विषय काढलात तर तुमचे सहकारी तुमच्यापासून दूरच पळतील. मग संपूर्ण पार्टीत एकटं राहावं लागेल.

हेही वाचा: सुधा मूर्ती स्वत:साठी साडी खरेदी करत नाहीत, कारण…

सगळीकडे पार्टीजचा माहौल असताना तुम्हालाही एन्जॉय करण्याचा हक्क आहेच. त्यामुळे थोडावेळ सगळं बाजूला ठेवून तुमच्या ऑफिस पार्टीमध्ये मस्त आऊटफिट, छानसा मेकअपसह सहभागी व्हा. तुमच्या सहकाऱ्यांबरोबर एरवीपेक्षा छान गप्पा मारा, म्युझिकचा आनंद घ्या, डान्स करा, पार्टी स्नॅक्स, ड्रिंक्स एंजॉय करा. मस्त रिफ्रेश व्हा.

शब्दांकन – केतकी जोशी