Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेक विविध खेळ आणि जगभरातील हजारो खेळाडू खेळताना दिसतात. तर यासह मोठी भूमिका बजावतात ते म्हणजे खेळाडूंचे प्रशिक्षक. पण या प्रशिक्षकांच्या भूमिकेत फारच कमी महिला प्रशिक्षक असतात. याच विषयाचा सविस्तर आढावा.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये महिला प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाखाली सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या खेळाडूंमध्ये यूएसची धावपटू गॅबी थॉमस, ब्रिटीश डायव्हर टॉम डेली, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी आणि युक्रेनियन हाय जम्पर यारोस्लावा माहुचिक यांचा समावेश आहे. ज्यांनी या महिन्यात नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
Image of a woman trainer in a gym or swimming pool
Women Trainers In Gym : जिम, जलतरण तलावांमध्ये महिला प्रशिक्षक बंधनकारक, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

परंतु सारं जग, विचारसरणी बदलत असताना, मोठ्या स्पर्धांतील खेळांमध्ये कोचिंग करताना प्रामुख्याने पुरुष प्रशिक्षक असतात. “गुड ओल्ड बॉयज क्लब हा खरा अडथळा आहे,” असे फ्रेंच माजी जागतिक सायकलिंग चॅम्पियन आणि प्रशिक्षक मॅरियन क्लिग्नेट यांनी सांगितले, ज्यांनी २६ जुलैला सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी फ्रान्स ते पॅरिस असा ऑलिम्पिक मशालसह प्रवास केला.

क्लिग्नेट यांच्या मते इतर खेळांमधील महिला प्रशिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारं आहे. अनेकांनी असे म्हटले की आपलं म्हणणं ऐकलं जावं यासाठी महिलांना बराच खटाटोप करावा लागतो. त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांची मतं विचारात घेतली जात नाहीत असं बहुतांश महिला प्रशिक्षकांचं म्हणणं आहे.

नॉर्वेच्या ट्रायथलॉन प्रशिक्षक हेन्रिएट मेरो यांनी सांगितले की, पुरुष प्रशिक्षकांकडून महिला प्रशिक्षक आणि महिला खेळाडूंना त्रास दिला जातो त्यासह भेदभावही मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु अनेक महिला त्यांची नोकरी गमावण्याच्या भीतीने यावर मोकळेपणाने भाष्य करणं टाळतात. मेरो यांच्या राष्ट्रीय संघातील वातावरण इतके खराब होते की त्यांनी खाजगी कोचिंग घेणं सोडून दिलं होतं.

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनसह बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ” मी सांगतेय ती गोष्ट फक्त नॉर्वेमध्ये काही नवीन नाहीय. इतर देशांतील प्रशिक्षकांनीही मला हेच सांगितले आहे.” इतर प्रशिक्षकांनी सांगितले की त्यांना उघडपणे गैरवर्तनाचा सामना करावा लागला नाही, परंतु प्रशिक्षणसाठी शिबिरे आणि स्पर्धांसाठी घरापासून बराच वेळ दूर राहणं, यामुळे महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत मोठी कारकीर्द घडवणं, कठीण होतं.

२०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये करोनामुळे मान्यताप्राप्त प्रशिक्षकांपैकी केवळ १३ टक्के महिला होत्या. ज्या २०१६ मधील रियो ऑलिम्पिकमधील ११ टक्क्यांहून जास्त आकडा होता. तर २०२२ मध्ये बिजींगमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये १० टक्के महिला प्रशिक्षक होत्या.

महिला प्रशिक्षकांना एकमेकांशी जोडण्यासाठी जागतिक व्यासपीठ असलेल्या फिमेल कोचिंग नेटवर्कच्या संस्थापक, विकी ह्युटन म्हणाल्या की, पुरुषांनी पुरुषांसाठी तयार केलेली व्यवस्था असल्यामुळे महिलांचा कुठेही विचार झालेला दिसत नाही ही खरी अडचण आहे.

आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे जनक, पियरे डी कौबर्टिन यांनी १७९६ मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळांमध्ये महिलांवर बंदी घातली, पुरुषांनी स्पर्धेत सहभागी व्हावं आणि महिलांनी त्यांचं कौतुक करुन पाठिंबा द्यावा असं त्यांचं मत होतं.

१९०० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महिलांनी काही खेळांमध्ये भाग घेतला. प्रत्येक खेळात महिला सहभागी होण्यासाठी ११२ वर्ष लागली.
पण आजही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा संस्थांमधील सर्वोच्च जागांवर पुरुषांचे वर्चस्व कायम आहे.

“खेळातील सत्ता समीकरण खरोखर कधीच बदललं नाही आणि त्यामुळेच खूप कमी महिला डायरेक्टर्स आणि प्रशिक्षक मोठ्या पदांवर दिसतात,” असे ह्युटन म्हणाले.

बदलाची सुरुवात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC), आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राष्ट्रीय प्रशासकीय संस्थांमधून झाली पाहिजे, असे अनेक प्रशिक्षकांनी सांगितले. आयओसीच्या उपाध्यक्षा निकोले होवेर्ट्स, या पदावर असणाऱ्या केवळ चार महिलांपैकी एक आहेत. निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या पदांवर महिला असाव्यात याचा बॅच गांभीर्याने विचार करत होते .

माझ्यासाठी महिला अधिकाअधिक नेतृत्व करणाऱ्या पदांवर असतील यासाठी जास्तीतजास्त महिलांपर्यंत हा उपक्रम, चळवळ पोहोचणं हेही गरजेचं आहे, असं होवेर्ट्स म्हणाल्या.

हॉव्हर्ट्स म्हणाले की, महिलांसाठी प्रशिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी IOC क्रीडा संस्थांसोबत काम करत आहे. ज्यामध्ये कुस्ती, स्केटबोर्डिंग, ज्युडो आणि तायक्वांडो या खेळांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये, IOC ने WISH प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश महिला प्रशिक्षकांना सर्वोच्च स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज करणे आहे. ज्यामध्ये आतापर्यंत २२ खेळ आणि ६० देशांतील १२३ महिला प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी किमान सहा महिला प्रशिक्षक आगामी ऑलिम्पिकसाठी पॅरिसला जात आहेत.

ट्रायथलॉन प्रशिक्षक मेरो यांनी सांगितले की, महिला प्रशिक्षकांनी लहान मुली तसंच युवा वर्गासाठी चांगला आदर्श निर्माण केला आहे. महिला प्रशिक्षक असणं मुलींसाठी फायदेशीर ठरतं कारण त्या अधिक चांगल्याप्रकारे मुलींचे प्रश्न समजून घेऊ शकतात मासिक पाळीचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, पोषण आणि प्रशिक्षण अनुकूल असणे आवश्यक असते. तर काही खेळांतील दुखापतींचा स्त्रियांवर पुरुषांपेक्षा वेगळा प्रभाव पडतो.

अनेक प्रशिक्षकांनी सुचवले की महिला प्रशिक्षकांची संख्या वाढल्याने लैंगिक शोषणाचा धोका कमी होऊ शकतो. जलतरणपटू, जिम्नॅस्ट आणि टेनिस खेळाडूंसह महिला क्रीडापटूंच्या वाढत्या संख्येने, प्रशिक्षकांकडून छळ, विनयभंग किंवा बलात्कार झाल्याची नोंद केली गेली आहे. अलीकडे काही घोटाळ्यांचा फटका बसलेल्या खेळांमध्ये मालीमधील महिला बास्केटबॉल आणि युनायटेड स्टेट्समधील स्नोबोर्डिंग यांचा समावेश आहे.

विविध अडथळे

महिला प्रशिक्षकांना लिंगनिहाय विषमता जागोजागी दिसते स्टेडियमधील सुरक्षारक्षकांपासून ते इतर प्रशिक्षकांपर्यंत प्रत्येकजण त्यांना फिजिओ, एक आई किंवा काळजी करणारी एक व्यक्ती या भूमिकेत असल्यासारखे गृहीत धरले होते, अशी एक सामान्य तक्रार होती.

२०१६ च्या रिओ गेम्समध्ये अशा प्रकारचा पक्षपातीपणा अजून अधोरेखित झाला होता. दिग्गज ॲथलेटिक्स प्रशिक्षक ॲन्स बोथा यांनी दक्षिण आफ्रिकेचा धावपटू वेडे व्हॅन निकेर्कने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील विक्रम मोडत सुवर्णपदक मिळवले होते आणि त्याला भेटण्यासाठी ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी ॲन्स बोथा यांना मैदानात जाण्यापासून रोखले होते.

महिला प्रशिक्षकांनी असे काही प्रसंग सांगितले आहेत, जिथे त्यांना पुरुष प्रशिक्षकांनी कमी लेखले होते किंवा मीटिंगमध्ये महिलांनी सुचवलेल्या कल्पना फेटाळून लावण्यासाठी आणि पुरुषांच्या कल्पनांची वाहवा करण्यासाठी मिटिंगमध्यो बोलावले जायचे. मॉर्डन पेंटाथलॉन प्रशिक्षक निकोला रॉबिन्सन यांनी सांगितले की त्यांनी ईमेलमध्ये Nic हे नाव वापरले, जेणेकरून त्यांच्या नावावरून त्या महिला आहेत की पुरूष हे कळणार नाही. “यामुळे माझं आयुष्य अधिक सोयीस्कर झालं, मला कोणतेही पूर्वग्रह नको होते, असं त्या म्हणाल्या.

युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कोचिंग कोर्स शिकवणारे रॉबिन्सन म्हणाले की, आदर्श म्हणून पाहावं अशी उदाहरणंच नसल्याने महिला प्रशिक्षकांची संख्या नाममात्र आहे असं रॉबिन्सन म्हणाले. ते शिकवत असलेल्या अभ्यासक्रमात कोर्समध्ये विद्यार्थ्यांपैकी फक्त १० ते १५ टक्के महिला आहेत.

मुले ही पुरूष प्रशिक्षकांना मोठ्या खेळांमध्ये पाहत असतात आणि प्रशिक्षक म्हणून नोकरी करायला आम्हालाही आवडेल असं त्यांना वाटतं. पण मुलींना असं प्रेरित करणारं कोण आहे?

मातृत्व आणि प्रशिक्षक या दोन्हींचा ताळमेळ सांभाळणं ही आणखी एक अडचण आहे. “हे खरोखर एक कठीण आव्हान आहे. पोहण्याचं कोचिंग पहाटे लवकर सुरू होतं पण लहान मुलांच्या नर्सरी काही सकाळी ६ वाजता उघडत नाहीत. खेळाडूंसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे असतात, परंतु एका आईसाठी दोन आठवडे बाळापासून दूर राहणं सोपं आहे का?”

मुलं झाल्यानंतर महिलांना कोचिंग कायम सुरू ठेवण्यासाठी रॉबिन्सन यांनी एक युक्ती सांगितली. त्या म्हणाल्या की महिला प्रशिक्षकांच्या लहान मुलांना प्रशिक्षण शिबिरांमध्ये आणि स्पर्धांसाठी त्यांच्या जोडीदारासह किंवा इतर कोणी मुलांना सांभाळण्यासाठी सोबत येत असेल तर तशी सोय केली पाहिजे. याचबरोबर सर्वांनीच याकडे एक सामान्य गोष्ट असल्यासारखे पाहिले पाहिजे.

चॅरिटी युके कोचिंग संस्थेतील कोच डेव्हरपर असलेल्या एमिली हॅन्डीसाईड म्हणाल्या की, महिला प्रशिक्षकांना मिळणारा पाठिंबा आणि विकासाचा अभाव हा आणखी एक अडथळा आहे. हे विशेषतः फुटबॉल सारख्या खेळांमध्ये दिसून येते, जिथे पुरुष आणि महिला खेळात निधी आणि संसाधनांमध्ये मोठी असमानता आहे.

हॅन्डिसाईड यांनी एक प्रसंग सांगताना म्हटले की, त्या एका अशा महिला फुटबॉल प्रशिक्षकाला पाठिंबा देत होत्या ज्यांनी एका मोठ्या क्लबमध्ये प्रतिष्ठित भूमिका बजावली होती, परंतु त्या महिला प्रशिक्षकाकडे कर्मचारी नसल्याने त्या स्वत: पाच वेगवेगळ्या गोष्टी करत होत्या. पण कारकीर्दीच्या या टप्प्यावर असलेल्या पुरुष प्रशिक्षकाला अशा गोंष्टींना सामोरे जावे लागणार नाही. महिला प्रशिक्षकांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि ब्रिटन यांचा समावेश असल्याचे हॅन्डिसाई़ड यांनी सांगितले.

परंतु तज्ञांनी सांगितले की महिला प्रशिक्षकांसाठी विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे पुरेसे नाही . असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले तर असंख्य प्रशिक्षित प्रशिक्षकांची फौज तयार होईल पण त्यांच्या लौकिकाला साजेसं काम मिळणार नाही.

द फिमेल कोचिंग नेटवर्कच्या ह्युटन यांनी सांगितले की, महिला प्रशिक्षकांची भरती अनेकदा अनौपचारिक चॅनेल आणि सोशल नेटवर्क्सद्वारे होते, ज्यामुळे पुरुष प्रशिक्षकांना फायदा होतो. जाहिरातींमध्येही पारदर्शकता नसते आणि प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या पॅनेलवर विविधताही नसते.

ह्यूटन यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा संस्थांना प्रशिक्षक निवड धोरणे प्रमाणित आणि त्यांना व्यावसायिक रूप द्यावं असे आवाहन केले. “व्यवस्था बदलण्याची गरज आहे, महिलांनी बदलण्याची गरज नाही,” असं ह्युटन म्हणाल्या.

Story img Loader