प्रिय नरोत्तम मिश्रा (गृहमंत्री, मध्यप्रदेश),

पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. प्रेक्षकांनी गाण्याला भरभरून प्रतिसादही दिला, पण अचानक चित्रपटात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावरून वाद सुरू झाला. सर्वात आधी हिंदू महासभेने या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. या गाण्यात भगव्या रंगाचा अपमान केला आहे, असं हिंदू महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटलं. त्यानंतर तुम्हीही त्यावरून हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला.

तुम्ही चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणं आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्यप्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असं तुम्ही म्हणालात. खरं तर मी तुमच्या मध्यप्रदेश राज्यातील नाही, पण तुमचं वक्तव्य ऐकल्यानंतर विचार आला, तो म्हणजे अहो, तुम्ही खरंच इतके संवेदनशील आहात का, की एका अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली, म्हणून एका राज्याच्या गृहमंत्रीपदावर असलेल्या तुमच्या भावना दुखावतात?

“…तर ‘पठाण’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपा मंत्र्याचा इशारा, म्हणाले, “गाण्यातील भगवे कपडे अन्….”

खरं तर या गाण्याच्या बोल आणि कपड्यांवरचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला अनेक प्रश्न पडले. तुमच्या घरात कुणी भगव्या रंगाचे कपडे घालत नाहीत का किंवा कुणी परिधान केले असतील, तर त्याचा अपमान होऊ नये, यासाठी तुम्ही कोणते नियम केले आहेत, भगवे कपडे घालायचे असतील तर त्यासाठी नियम आहेत का? त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त कपड्यांवरून भावना दुखावणारे तुम्ही राज्यातील महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा इतक्या खुलेपणाने का नाही बोलत?

Pathaan Controversy दरम्यान शाहरुख खानची पहिली पोस्ट; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला, “१८ डिसेंबरला…”

तुमचे डोळे उघडावे म्हणून थोडी आकडेवारी सांगावी असं वाटलं. गृहमंत्री साहेब, तुमच्या राज्यात गेल्या पाच वर्षात किती महिलांचा हुंडाबळी गेलाय, तुम्हाला माहीत आहे का? सध्याच्या तुमच्या वक्तव्यावरून तरी आठवत नसेल असं दिसतंय, त्यामुळे मीच सांगावं म्हणतेय. तर, २०१७ ते २०२१ या पाच वर्षांत तुमच्या राज्यात तब्बल २,८५९ एवढ्या महिलांचा फक्त हुंड्यासाठी बळी गेलाय. तुमचं राज्य हुंडाबळीमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात प्रत्येक दिवसाला २० महिलांचा हुंड्यासाठी जीव जातोय. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे, पण तुम्ही भगव्या रंगासाठी आकांत करत बसले आहात. भारतात हुंडाविरोधी कायदा १९६१ साली मंजूर झाला होता, ज्या मंत्रीपदावर तुम्ही बसलेले आहात, त्या मंत्रालयाचीच या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. पण तुम्ही किती प्रकरणात जातीने लक्ष घालता? राज्यात हुंडाबळीमुळे जीव गमावणाऱ्या किती महिलांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत? एक सांगू का, तुमची वक्तव्ये ऐकली ना की एक जाणीव प्रकर्षाने होते, ती म्हणजे तुम्ही फक्त राजकारणासाठीच बोलता. बाकी राज्यात किती महिलांचा जीव जातोय, याचं गांभीर्य तुम्हाला आहे, असं दिसत नाही.

Photos: दीपिकाच्या भगव्या बिकिनीमुळे ‘पठाण’ अडचणीत; पण यापूर्वी ‘या’ अभिनेत्रींनीचा ‘सॅफ्रॉन’ ऑनस्क्रीन रोमान्स राहिलाय चर्चेत

तुम्ही दीपिकाच्या बिकिनीबद्दल केलेलं वक्तव्य सकाळी वाचलं आणि डोक्यात विचार सुरू झाले. एका राज्याच्या गृहमंत्री पदावर बसलेला मंत्री महिलांच्या सुरक्षेबद्दल, त्यांच्या हक्क, अधिकारांबद्दल, राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं सोडून एका अभिनेत्रीच्या कपड्यावर बोलतो आहे. शेवटी इतकंच सांगेन की कोणी काय कपडे घालावे, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. भगवा आणि हिरव्या रंगांबद्दल बोलून राजकारण करण्यापेक्षा राज्यातील महिलांच्या प्रश्नावर लक्ष द्याल आणि हुंडाबळी गेलेल्या महिलांना न्याय मिळावा, यासाठी थोडं जातीने लक्ष घालाल, अथवा राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेकडे काटेकोर पाहाल तर कदाचित अनेक महिला बलात्काराच्या बळी ठरण्यापासून वाचतील, अनेक महिलांचा हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारमुळे जीव जाणार नाही. तर, आधुनिक कॉर्पोरेट भाषेत बोलायचं तर तुमचा केआरए काय आणि बोलताय काय?

Story img Loader