महिलांना सेंद्रिय शेती आणि शेतीला पूरक असे नैसर्गिक पध्दतीने बनवण्यात येणारे द्रव्य आदींविषयी प्रशिक्षण दिलं जातंय. यामुळे त्यांचा शेतीसाठी लागणारा पैसा तर वाचेल, पण याचा पर्यावरण संवर्धनासाठीही उपयोग होणार आहे. तसेच सेंद्रिय उत्पादने तयार करत आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जेव्हा चर्चेत येतो तेव्हा वेगवेगळ्या संकल्पना, प्रकल्प डोळ्यांसमोर येतात. मात्र मळलेली ही पायवाट बदलत आदिवासीबहुल असलेल्या इगतपुरी तालुक्यातील गरीब, गरजू आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी एकत्र येत ग्रामीण महिला उपजिविका सक्षमीकरण कार्यक्रम हाती घेतला. याअंतर्गत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. महिलांना सेंद्रिय शेती आणि शेतीला पूरक असे नैसर्गिक पध्दतीने बनवण्यात येणारे द्रव्य आदींविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे त्यांचा शेतीसाठी लागणारा पैसा तर वाचेल, पण त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होणार आहे. तसेच सेंद्रिय उत्पादने तयार करत आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल.

हेही वाचा >>> पुनर्विवाहित विधवेसही वारसाहक्क!

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे पुण्याची अफार्म संस्था आणि नाशिक येथील प्रेम फाउंडेशन यांच्यावतीने ग्रामीण महिला उपजिविका सक्षमीकरणा अंतर्गत सेंद्रिय शेती महिला गट सदस्यांसाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी सेंद्रिय कर्ब संवर्धन आणि जैविक निविष्ठा निर्मिती व वापर यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणात ५० आदिवासी महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या महिलांना पांडुरंग पाटील यांनी प्रशिक्षण दिले. ग्रामीण महिलांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देणे, उत्पादन खर्च कमी करणे, मातीचा पोत व गुणवत्ता सुधारण्याचे ज्ञान देणे हे उद्दिष्ट समोर ठेवून या प्रशिक्षणात या मुद्यावर भर देण्यात आला होता. प्रशिक्षणात संस्थेच्या प्रकल्प क्षेत्रातील वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी या गावातील सेंद्रिय शेती गटातील शेतकरी महिला सहभागी झाल्या. त्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे, त्यात वापरावयाचे साहित्य, त्याची उपलब्धता व वापर करण्याची पद्धत आदींची माहिती देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने बीजप्रक्रिया, जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडुळ खत, विविध किड नियंत्रक सापळे आदींची विस्तृत माहिती देण्यात आली.

हेही वाचा >>> …तर नवीन वर्ष होईल आनंददायी

या महिला शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन तेथेच बीजप्रकिया, दशपर्णी अर्क आणि जीवामृताचे प्रात्यक्षिक करून घेतले. शिवाय या साहित्याची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक महिला शेतकऱ्यांस प्रत्येकी ३०० लिटरच्या प्लास्टिक पिंपांचे वाटप करण्यात आले. मातीचा पोत आणि गुणवत्ता वाढीस लागावी म्हणून प्रत्येक महिला शेतकऱ्यांस ५० किलो गांडुळ खत आणि १५ किलो तागाच्या बियाणांचे वाटप करण्यात आले.

प्रेम फाऊंडेशनचे राजू शिरसाठ यांनी गरीब, गरजू आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज या निकषांवर इगतपुरीमधील पाच गावांमधील ५० महिलांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात आल्याचे सांगितले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वर्षा गोडे म्हणाल्या, या प्रशिक्षणामुळे सेंद्रीय शेतीच्या प्रशिक्षणामुळे नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले अन्नधान्य बाजारात येईल. पर्यावरणाची हानी होणार नाही शिवाय सकस अन्न देण्यात येईल याचे समाधान असेल.

अनिता कोरडे म्हणाल्या, सेंद्रीय शेतीमुळे आमचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. पर्यावरण सुधारण्यास मदत होईल, जमिनीचा पोतही सुधारेल.

अन्नधान्याच्या उत्पादनात रासायनिक खतांचा होणारा वापर पाहता सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पीक उत्पादनाचे मूल्यवर्धन वाढवणे आणि महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. गांडुळ खत प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीला पूरक असे द्रावण या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. महिलांना शेतीसाठी ती विकली जातील, यामुळे त्यांना रोजगार मिळणार असल्याचे शिरसाठ सांगतात.