Who is known as Queen of elephants: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, वैद्यक यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. पद्म पुरस्कारासाठी ११० जणांची नावे निवडण्यात आली आहेत यापैकी ३४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ नंतर ‘पद्म पुरस्कार’ हा सर्वात महत्वाचा सन्मान मानला जातो. हे ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पार्वती बरुआ यांच्या नावाचाही समावेश आहे. पार्वती बरुआ, ज्यांना ‘हत्तीची परी’ म्हणूनही ओळखले जाते, या भारतातील पहिली महिला माहुत आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी (प्राणी कल्याण) पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ यांची कहाणी जाणून घेऊया.

पुरुषप्रधान क्षेत्रात बनवली स्वत:ची ओळख

पुरुषांना अनेकदा हत्तीचे माहूत म्हणून पाहिले जाते. गुवाहाटी, आसामच्या पार्वती बरुआ यांनी अशा पुराणमतवादी विचारांना आव्हान दिले. पार्वती यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:साठी एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. आज,त्या एक माहूत (हत्ती ट्रेनर) आहे एक सुप्रसिद्ध पॅचीडर्म तज्ज्ञ (pachyderm expert) आहे. त्यांना दिवस-रात्र जंगलात राहावे लागते. त्या हत्तींचे पालनपोषण, प्रशिक्षण आणि संरक्षण करतात. हेच त्यांचे एक कुटुंब आहे. जगंली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पार्वती त्यांच्या टीमसह देशाच्या कोणत्याही भागात जिथे हत्ती आहेत तिथे प्रवास करते.हत्तींना नित्रंयण करण्यासाठी धोरण आणि संवर्धन उपक्रम राबवण्यासाठी, तसचे वन्य कळपांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पार्वती यांना मदतीसाठी बोलवले जाते. शहरी भागातून जंगली हत्तींना हुसकावून लावण्यासाठी आणि माहूतांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील त्यांना बोलावले जाते. मानव-हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या हेतूने त्यांनी प्रयत्न केले आहेत. पार्वती यांनी तीन राज्य सरकारांकरिता जंगली हत्तींना हाताळण्यात आणि पकडण्यात मदत केली अनेकांचे प्राण वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


हेही वाचा -देशातल्या पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआंसह ३४ जणांना पद्मश्री पुरस्कार, पाहा विशेष योगदान देणाऱ्यांची यादी

लहानपणापासून हत्तींवर होते प्रेम

सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, पार्वती श्रीमंत पार्श्वभूमीतून आली असूनही त्यांनी साधे जीवन निवडले. आसामच्या गौरीपूरमधील राजघराण्याशी संबंध असलेल्या पार्वती बरुआ यांना सुरुवातीपासून प्राण्यांविषयी खास आपुलकी वाटत होती. त्यांनी आयुष्यभर प्राण्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. पार्वती यांचे वडील प्रसिद्ध हत्ती तज्ज्ञ होते. वडिलांप्रमाणेच त्यांना हत्तींविषयी खूप प्रेम होते. म्हणूनच त्या लहानपणापासून हत्तींसह खेळत असे.पार्वतीचे आठ भाऊ-बहीण आहेत. पण, तिच्या वडिलांसह घनदाट जंगलातील प्रवासाच्या अनुभवांमुळे त्यांनी वेगळ्या वाटेने जायचे ठरले. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी हत्तींना नियंत्रित करण्यास सुरुवात केली.त्या गुवाहाटी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवीधर आहे. चार दशकांच्या त्यांच्या सततच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी अनेक वन्य हत्तींचे जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यांना हत्ती इतके का आवडतात? तेव्हा उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या, ‘कदाचित हत्ती हे खूप स्थिर, निष्ठावान, प्रेमळ आणि शिस्तप्रिय असतात म्हणून असावे’.

जंगली हत्तीचा वाचवला जीव

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच, काझीरंगा येथे २८ वर्षीय जंगली हत्तीने माहूतासह अनेकांना ठार केले. आसामच्या वनविभागाने या हत्तीला मारण्याचा निर्णय घेतला. याबाबत पार्वती म्हणाल्या की, “हत्तीच्या आयुष्याचा इतका दुःखद अंत होण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते आणि त्याला माझ्या देखरेखीखाली ठेवले. कालांतराने, हत्ती रुळावर आला. शिस्तबद्ध कामासाठी तो आता परिपूर्ण स्थितीत आहे. त्याच्या आयुष्यातील नवीन टप्पा हा माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे. “

हेही वाचा – पंजाबच्या ‘ड्रोन दीदी’, ग्रामीण भागातील महिलांना मिळालं उत्पन्नाचं नवं साधन! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी

जीवनगौरव पुरस्कार

पार्वती या हत्तींशी संबंधित संस्थांसह काम करत आहेत. त्या एशियन एलिफंट स्पेशालिस्ट, आययूसीएनच्या सदस्यही आहेत. हत्तींसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर अनेक माहितीपटही तयार झाले आहेत. बीबीसीने त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट बनवला होता. ज्याचे नाव होते “हत्तींची राणी”. कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवाने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.६७ वर्षीय पार्वती बरुआ या आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबातील आहेत, तरीही त्यांनी आपले जीवन हत्तींसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. हत्तींना वाचवण्यासाठी त्या खूप सक्रिय असतात. पार्वती यांचा प्रवास प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारा आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma shri award 2024 padma shri parbati barua first female elephant trainer queen of elephant