आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अनेकांना संघर्षमय काळातून जावं लागतं. भविष्यातील यशासाठी वर्तमान सुखांचा त्याग करावा लागतो. प्रश्न मुलांच्या करियरचा असेल तर मुलांसह पालकांनाही खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सिमरन थोरातने असंच सातासमुद्रापार जाण्याचं आणि सुमद्रावर स्वार होण्याचं स्वप्न पाहिलं. पण हे स्वप्न पूर्ण करणं सोपं नव्हतं. सिमरनला मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचं होतं. यासाठी पुण्यात सदर शिक्षणाचा तीन वर्षांचा कोर्स आहे, त्याचं शैक्षणिक शुल्क आहे ९ लाख रुपये. सिमरनचे आई-वडील इंदापूर तालुक्याच्या बाहेर फारसे कधी गेले नव्हते. पण आपल्या मुलीची सागरसफर यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःची तीन एकरची शेती विकली. ज्या शेतात मका, गहू आणि ऊस पिकवून कुटुंबाचा गाडा चालत होता, ती जमीन लेकीच्या स्वप्नांसाठी ओवाळून टाकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा