Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने भारताला कांस्यपदक जिंकून दिलं आहे. त्याचबरोबर मनू भाकरने तिच्या नावी एक इतिहाससुद्धा रचला आहे. ती नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने आजवर ३६ पदकं जिंकली आहेत. त्यातली नऊ वैयक्तिक पदकं ही महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. त्या महिला खेळाडू कोण आहेत, हे आज आपण जाणून घेऊ या. (sportswomen won nine Olympic medals)

कर्णम मल्लेश्वरी

कर्णम मल्लेश्वरीने १९ सप्टेंबर २००० मध्ये सिडनीमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ६९ किलोग्राम वजनी गटातून ती खेळली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

Paris Paralympics 2024 India Medal Tally in Marathi
Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Simran Sharma wins Bronze and Navdeep Singh clinches Silver in javelin
Paris Paralympics 2024: भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी, पण नवदीपनं ते शक्य करून दाखवलं; भारताचा ‘गोल्ड’मॅन!
Harvinder Singh First Gold Medal in Archery for India Dharambir Wins Gold and Pranav Surma Got Silver in Club Throw
Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी
Paris Paralympics 2024 Medal Tally India Won 8 Medals on Day 5
Paris Paralympics 2024: भारताने पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल ८ पदकं, भालाफेक, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकं; भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी?
Suhas Yathiraj wins Silver Medal in Badminton
Suhas Yathiraj : सुहासला सुवर्णपदकाची हुलकावणी! अंतिम सामन्यात रौप्यपदाकावर मानावे लागले समाधान
Preethi Pal Becomes First Indian Woman Athlete who won 2 Medals in Paralympics
Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने सलग दुसरे पदक जिंकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू
Paris Paralympics Games 2024 Manish Narwal Won Silver News in Marathi
Manish Narwal Won Silver: पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा मनिष नरवाल आहे तरी कोण? भारताने लागोपाठ जिंकली ४ पदकं

मेरी कोम

मेरी कोम अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. मेरी कोमने २०१२ साली लंडन येथे आयोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ५१ किलो वजनी गटातून ती खेळली होती. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

हेही वाचा : Women Need More Sleep: पुरुषांपेक्षा महिलांनी ‘इतके’ मिनिटं जास्त झोपावे? यामागचं नेमकं कारण काय? पाहा संशोधन नेमकं काय सांगते…

साक्षी मलिक

साक्षी मलिकने २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ५८ किलो वजनी गटातून ती खेळली होती. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

सायना नेहवाल

सायना नेहवालने २०१२ रोजी लंडनमध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला आहे.

पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये रौप्यपदक जिंकले होते तर २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

मीराबाई चानू

२०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानू ४९ किलो वजनी गटातून वेटलिफ्टिंग खेळली होती. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवत टोकियोमध्ये भारताच्या पदकाचं खातं उघडलं होतं.

लवलिना बोरगोहेन

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत २०२० मध्ये लवलिना बोरगोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ६४ ते ६९ वजनी गटातून ती खेळली होती. विशेष म्हणजे टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी ही एकमेव भारतीय आहे.