Paris Olympics 2024 : पॅरिसमधील १९०० साली उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये महिलांनी प्रथमच पाच खेळांमध्ये सहभाग घेतला होता. त्याला आता बराच काळ लोटला आहे. २०१२ च्या गेम्समध्येही महिलांनी सर्व खेळांमध्ये भाग घेतला होता आणि महिला बॉक्सिंगने ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. तेव्हापासून ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कामगिरीची चर्चा ऐकायला मिळते. पण, काही किस्से पदकं जिंकण्यापलीकडचे असतात आणि ते म्हणजे या महिलांचा तिथपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष.

आव्हानांना तोंड देणाऱ्या गरोदर महिलांपासून इतरांना मागे टाकणाऱ्या तरुणीपर्यंत, खेळादरम्यान तिच्या पहिला प्रसूतीनंतरचा कालावधी ते नवख्या आईने सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यापर्यंतचा अवघड प्रवास दिसला होता. या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये काही महत्त्वाच्या महिला खेळाडू दिसल्या; ज्यांनी अडचणीतून मार्ग काढत स्वत:ला सिद्ध केले. अशा अनेक बलवान महिलांपैकी पाच महिला ज्यांनी अडथळ्यांवर मात करून, आपल्या विजयाच्या आणि सामर्थ्याचा इतिहास रचला. त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

१. मनू भाकर : सर्वांत तरुण भारतीय नेमबाज (Manu Bhaker : Youngest Indian shooter)

पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की, आता मनू भाकरचे नाव घेतले जाणार आहे. वयाच्या अवघ्या २२ वर्षी या तरुणीने इतिहास रचला आहे. मनू भाकरने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकून, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:सह देशाचेही नाव उंचावले आहे. अशी कामगिरी ती पहिली खेळाडू ठरली आहे. एकाच खेळाडूने दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्यांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे. पण, मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली आहेत. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि १० मीटर एअर पिस्तूल महिला यामध्ये मनूने कौतुकास्पद कामगिरी करीत कास्यपदकांची कमाई केली आहे. त्याबद्दल मनू भाकरचे सर्व स्तरांतून आता कौतुक होत आहे.

२. सिमोन बायल्स (Simone Biles : Mental Health Crusader)

जगप्रसिद्ध जिम्नॅस्ट खेळाडू सिमोन बायल्स (Simone Biles) हिने पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ स्पर्धेत तब्बल दोन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला आहे. चेकोस्लोवाकियाची वेरा कास्लाव्स्का या महिला जिम्नॅस्ट खेळाडूनंतर अशी कामगिरी करणारी सिमोन बायल्स ही दुसरी महिला जिम्नॅस्ट खेळाडू ठरली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू असताना दिलेल्या मुलाखतींमध्ये सिमोनने विस्ताराने टोक्योचे अनुभवकथन केले होते. तिने सांगितले की, ‘ट्विस्टीज’मुळे तिचे मानसिक स्वास्थ्य हरवले होते. आपण चांगली कामगिरी करू शकणार नाही, अशी तिला सतत शंका वाटत होती. तिला आपल्या शरीर आणि मनाचीही काळजी वाटत होती. अखेर तिने अनेक स्पर्धा प्रकारांमधून माघार घेतली. अमेरिकेच्या संघाला त्यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. टोक्योनंतर सिमोनने आपले पूर्ण लक्ष मानसिक आरोग्यावर केंद्रित केले. एखाद्या दिवशी सकाळी उठून आपल्याला नेहमी सवय असलेली कार चालवताच येत नाही, असे कळते तेव्हा काय वाटेल, तसे मला तेव्हा वाटत होते. अशा शब्दांमध्ये तिने आपली व्यथा व्यक्त केली होती.

३. नादा हाफेझ (Nada Hafez : Pregnant Egyptian Fencer)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची महिला तलवारबाज नादा हाफेझनेही सहभाग घेतला होता. कल्पना करा की, सात महिन्यांची गरोदर असूनही कोणती महिला ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकते का? पण, इजिप्तच्या नादा हाफेझने ही कामगिरी केली आहे. सात महिन्यांची गरोदर असूनही ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी करणे ही बाब इजिप्तची तलवारबाज नादा हाफेझसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान गर्भवती असूनही नादा हाफेझने स्पर्धेत भाग घेतला एवढेच नव्हे, तर तिने काही सामने जिंकण्यातही यश मिळविले.

हेही वाचा >> Major Sita Shelke: मी केवळ महिला नाही, तर मी “सैनिक” अनेक युगं पार केल्यानंतरचं सीतेचं बदलेलं रुप

४. इमेन खलिफ (Imane Khelif: Algerian Boxer)

एकीकडे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा होत असतानाच दुसरीकडे अल्जेरियाच्या एका बॉक्सरचे नाव वादात सापडले आहे. सामना सुरू झाल्यानंतर ४६ सेकंदातच प्रतिस्पर्धी महिला खेळाडूने सामनाच सोडत असल्याचे जाहीर केले आणि अल्जेरियाच्या इमेन खलिफचे नाव चर्चेत आले. कारण- पुरुषी गुणधर्म असूनही इमेनला महिला म्हणून महिलांच्या श्रेणीत का खेळवले गेले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बॉक्सिंग रिंगमध्ये गेल्यानंतर पुढच्या ४६ सेकंदांत कॅरिनीला इमेन खलिफकडून दोन ते तीन वेळा थेट चेहऱ्यावर प्रहार सहन करावे लागले. त्यात तिचं हेडगिअरही सैल झालं. कॅरिनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या प्रशिक्षकाकडे गेली आणि त्यांनी सामना सोडत असल्याचे जाहीर केले. अस्पष्ट लिंग पात्रता चाचणीमुळे २०२४ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून तिची हकालपट्टी झाल्यानंतर पॅरिसमधील ऑलिम्पिकमधील खलिफच्या सहभागामुळे वाद निर्माण झाला आहे. कॅरिनीविरुद्धच्या तिच्या विजयाने आगीत आणखीच भर पडली.

इमेन खलिफ खरेच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. खलिफला ऑलिम्पिकमध्ये खेळू देण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या निर्णयावरही आता टीका होऊ लागली आहे. गेल्या वर्षी नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अवघ्या काही तास आधी इमेन खलिफ लिंगचाचणीमध्ये अपात्र ठरली होती. याच कारणामुळे तैवानच्या दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या लिन यु-तिंगचं कास्यपदकही काढून घेण्यात आले होते. या दोन्ही खेळाडूंच्या डीएनए चाचणीमध्ये त्यांच्यात XY गुणसूत्रे असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे तत्कालीन आयबीए अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी सांगितलं होते. XY गुणसूत्रे हा पुरुषांच्या डीएनएमधील घटक असतो; तर XX गुणसूत्रे हा महिलांच्या डीएनएचा घटक असतो.

५. एले प्युरिअर सेंट पियरे (धावपटू) (Elle Purrier St. Pierre : New Mom Runner)

एले प्युरिअर सेंट पियरे ही एक अमेरिकन धावपटू आहे; जी मध्यम व लांब अंतर धावण्यात पारंगत आहे. एले प्युरिअर सेंट पियरे ही एक नुकत्याच बाळाला जन्म देणारी आई असून, मुलगा इव्हान याच्या जन्मानंतरच्या पहिल्या प्रसूतीनंतरच्या सामन्यात तिने बाजी मारली. मार्च २०२३ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या पुनरागमनाबद्दल शंका घेण्यापासून ते ध्येय गाठण्यापर्यंतचा तिचा प्रवास उल्लेखनीय आहे.

या सर्व महिलांची कामगिरी पाहून तुम्हालाही वाटलं असेल ना की, बाईपण भारी देवा…

Story img Loader