डॉ. अश्विन सावंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्या एका विकृतीने २१व्या शतकातील स्त्रियांचे, त्यातही प्रजननक्षम वयातील तरुण मुलींचे मासिक चक्र बिघडवून त्यांना त्रस्त करून टाकले आहे, जी विकृती स्त्री शरीराला जणू पुरुषाच्या शरीरासमान बनवू पाहते व मुलीच्या चेहऱ्यावर दाढीमिशा येऊ लागतात आणि ज्या विकृतीचा योग्य उपचार न झाल्यास मुली पुढे जाऊन वंध्या होण्याची शक्यता असते, ती विकृती म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस्.
‘संशोधक म्हणतात की हा २१व्या शतकाचा आजार आहे; मात्र हे पूर्ण सत्य नाही. स्त्री-शरीर असूनही दाढी-मिशा आलेल्या बायका जुन्या जमान्यातही पाहायला मिळायच्या. त्यावरूनच तर ‘आत्याबाईला मिशा’ ही म्हण अस्तित्वात आली. पण, अशा दाढीमिशा फुटलेल्या स्त्रिया पूर्वी दिसल्या तरी अभावाने, म्हणजेच हा पीसीओएस् आजार समाजात पूर्वी तितक्या बाहुल्याने दिसत नव्हता. आज २१ व्या शतकात मात्र या आजाराचे प्रमाण १० मुलींमागे एक इतके वाढले आहे, असे संशोधक सांगतात. या रोगाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर अशी शंका आहे की हे प्रमाण पाच मुलींमध्ये एक असावे, त्यातही मुंबई, पुणे, दिल्ली अशा मेट्रो शहरांमध्ये अधिकच.
आणखी वाचा : दगावलेल्या अर्भक आणि बाळंतिणीला ‘स्वतंत्र भारता’ने काय दिलं?
याचा अर्थ या आजाराचा संबंध मेट्रो शहरांमधील जीवनशैलीशी व आहाराशी असावा का? तर हो, यात काहीच शंका नाही की या रोगाचा संबंध शहरांमधील लोभ व ईर्ष्या यांवर आधारलेल्या स्पर्धात्मक, ताण-तणावयुक्त आणि शरीराला हालचाल होऊ न देणाऱ्या बैठ्या जीवनशैलीशी व शहरांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या जंक फूडशी आहे. त्यामुळेच या आजाराला आधुनिक जीवनशैलीचे अपत्य म्हणायला हवे. ही आधुनिक जीवनशैली सगळ्यांनाच परवडणारी नसली तरीही श्रीमंतांबरोबर मध्यमवर्गीय आणि त्यांच्यासह गरीबदेखील या आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेऊ लागतात.
२१व्या शतकात तर ही जीवनशैली शहरांमधून पाझरत-पाझरत हळूहळू मध्यम आकाराची शहरे, तालुका पातळीवरील लहान शहरे असा प्रवास करत आता लहान-मोठ्या गावांमध्येही झिरपली आहे. ही जीवनशैली आकर्षक व आनंददायी भासली तरी वास्तवात तात्पुरता आनंद देणारी आणि स्वास्थ्य बिघडवणारी अर्थात अस्वस्थ आहे. साहजिकच ही जीवनशैली जगणाऱ्यांच्या शरीरावर जे-जसे व जितके विकृत परिणाम व्हायचे, ते-तसे व तितके होतातच. शरीरावर परिणाम होणारी विकृती ही कधी शहर-गाव, श्रीमंत-गरीब असा भेदभाव करत नाही. वयात आलेल्या मुलींच्या शरीरावर होणारा त्या विकृतींचा दुष्परिणाम म्हणजे ‘पीसीओडी किंवा पीसीओएस्’. वास्तवात या दोन्ही विकृती सारख्याच असल्या तरी त्यांमध्ये काही फरक आहे. व्यवहारामध्ये मात्र पीसीओडी हाच शब्द अधिक प्रचलित आहे, तर समजून घेऊ या दोघांमधला फरक.
पीसीओडी आणि पीसीओएस् यांमधील फरक
पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पीसीओएस् म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिन्ड्रोम, यांमधील एक- एक शव्दाचा अर्थ समजून घेऊ. पॉलि म्हणजे अनेक, दुसरा शब्द सिस्टिक हा शब्द स्त्री-बीज ग्रंथी (ओव्हरी) मध्ये तयार होऊन वाढत जाणाऱ्या उंचवट्यांसमान दिसणाऱ्या व पाण्याने भरलेल्या अपक्व किंवा अर्धपक्व स्त्री-बीजांडांनी भरलेल्या (किंवा बीजांड विरहित) अशा असंख्य लहानशा पिशव्यांसारख्या रचनेविषयी आहे, ज्यांना ’फॉलिकल्स’ म्हणतात. तिसरा शब्द आहे ओव्हरीयन म्हणजे स्त्री-बीजग्रंथींशी संबंधित. स्त्री-बीज ग्रंथी म्हणजे स्त्री शरीराला जोवर मासिक स्त्राव सुरू आहे तोवर दर महिन्याला स्त्री-बीजे पुरवण्याचा कारखानाच जणू आणि चौथा शब्द डिसीज याचा अर्थ रोग, तर सिन्ड्रोम शब्दाचा अर्थ लक्षण समुच्चय. तात्पर्याने स्त्री-बीज ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या असंख्य सूक्ष्म ग्रंथींशी (सिस्टशी) संबंधित विकृतीच्या लक्षणांचा समुच्चय म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिन्ड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजचे लघुरुप म्हणजे पीसीओडी आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम याचे लघु स्वरूप पीसीओएस्.
आणखी वाचा : मेहनतीचे दुसरे नाव…टेनिससम्राज्ञी सेरेना!
- पीसीओडी हा सर्रास दिसणारा आजार, जो जगातील एक तृतीयांश स्त्रियांना होतो, असे तज्ज्ञ सांगतात, तर पीसीओएस्चे प्रमाण तुलनेने कमी आहे, जो सरासरी ५ ते १५ टक्के स्त्रियांना होतो असा अंदाज आहे. तसेच पीसीओएस्च्या तुलनेमध्ये पीसीओडी हा आजार तितकासा गंभीर नाही.
- पीसीओएस् हा लहान वयाच्या मुलींमध्ये दिसण्याची शक्यता अधिक. वयात येणाऱ्या अर्थात मासिक पाळी सुरू होण्याच्या काळात होणारी ही विकृती तारुण्यपिटीका, वाढलेले वजन, शरीरावर वाढणारे केस या लक्षणांवरून लक्षात येते.
- पीसीओडीमध्ये आणि पीसीओएस्मध्ये तशी लक्षणे सारखीच असतात, मात्र पीसीओडीमध्ये मुलींच्या मासिक चक्रामध्ये स्त्री-बीजांडाची निर्मिती होत असते. साहजिकच पीसीओडीचा त्रास असलेल्या मुलींना/स्त्रियांना वंध्यत्वाचा उपचार सहज करता येतो, याउलट पीसीओएस्मध्ये मासिक पाळी आली तरी स्त्री-बीज ग्रंथीमधून परिपक्व बीजांड तयार होत नाही, ज्यामुळे वंध्यत्वाचा धोका प्रबळ असतो व उपचार कठीण असतो.
- पीसीओएस् मध्ये पुढे जाऊन इतर गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो, जसे- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, गर्भाशयाचा कर्करोग.
या विषयी अधिक माहिती घेऊ उद्या.
drashwin15@yahoo.com