बुद्धिबळ अर्थात बुद्धीच्या बळावर खेळली जाणारी पटावरची लढाई अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय खेळ आहे. गेल्या काही वर्षांत तर चेसबद्दलची जागरूकता वाढली आहे. महानगरांपासून ते अगदी निमशहरी भागातही मुलांना लहानपणापासून चेसचे प्रशिक्षण दिले जात आहे, स्पर्धात्मक चेस खेळण्यास उत्तेजन दिले जात आहे. केवळ एक खेळ म्हणून नव्हे, तर बुद्धीला चालना देण्याचे, तर्कशक्ती वाढवण्याचे, डावपेच व युक्त्या लढवण्याचे कौशल्य बाणवण्याचे साधन म्हणून बुद्धिबळाकडेकडे बघितले जाते.

मात्र, ही सर्व जीवनकौशल्ये पुरुषांना जेवढी आवश्यक असतात आणि अवगत होऊ शकतात, तेवढीच स्त्रियांसाठीही आवश्यक आणि अगवत होण्याजोगी आहेत ह्याबद्दल तत्त्वत: दुमत नसले, तरी प्रत्यक्षात मात्र बुद्धिबळ खेळणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तीन वर्षांपूर्वी एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘द क्वीन्स गॅम्बिट’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एका स्त्री बुद्धिबळपटूचा प्रवास दाखवण्यात आला होता. ही वेबसीरिज तुफान यशस्वी ठरली होती. ह्या सीरीजमधील बेथ हार्मन ही व्यक्तिरेखा फिक्शनल असली आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या चेसविश्वात एका स्त्रीला द्यावा लागलेला लढा वास्तव जगातही अनेकींना द्यावा लागला आहे, द्यावा लागत आहे हे सत्य आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील मानसशास्त्राच्या संशोधकांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनामध्येही हेच सत्य मांडण्यात आले आहे.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?

हेही वाचा… पत्नीला गुरासारखे, वेठबिगारासारखे वागवता येणार नाही…

मुली मुलांच्या तोडीचे बुद्धिबळ खेळू शकत नाहीत असा पूर्वग्रह पालकांच्या आणि प्रशिक्षकांच्या मनातही असतो. त्यामुळे मुलींना पुरेसे उत्तेजन मिळत नाही आणि चेसच्या विश्वात पुरुष व स्त्रिया ह्यांच्यात मोठी तफावत दिसून येते, असे ‘चेकिंग जेंडर बायस: पेरेण्ट्स अँड मेंटॉर्स पर्सिव लेस चेस पोटेन्शिअल इन गर्ल्स’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठात मानसशास्त्रात डॉक्टरेट करणाऱ्या संशोधकांसोबतच फिडेच्या (जागतिक बुद्धिबळ महासंघ) वुमन ग्रॅण्डमास्टर जेनिफर शाहेड ह्यांनी अहवालाचे सहलेखन केले आहे.

‘चेससाठी लागणारी अलौकिक बुद्धिमत्ता स्त्रियांमध्ये नसते’ असे अनेक बुद्धिबळ प्रशिक्षकांना वाटत असल्याचे ह्या अहवालात म्हटले आहे. ह्या संशोधनात ६५० अल्पवयीन बुद्धिबळपटूंचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या पालकांशी आणि प्रशिक्षकांशी चर्चा करण्यात आली. मुलांच्या स्पर्धेत टिकू न शकल्याने एका टप्प्यावर मुली चेस खेळणे सोडून देतात अशी अनेक उदाहरणे ह्या संशोधनात दिसून आली. मात्र, मुलींना पुरेसे प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे त्या चेस खेळणे सोडून देतात का, ह्या प्रश्नाचे उत्तर बहुतेक पालक व प्रशिक्षकांनी नकारार्थी दिल्याचे अहवालात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.

भारतातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. अर्थात आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरू लागल्या आहेत असे म्हणण्याची पद्धत रुढ झाली असली, तरी हे करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत कमीच आहे. ह्या वास्तवाचे प्रतिबिंब बुद्धिबळविश्वातही दिसणारच. त्यामुळेच सर्व वयोगटांमध्ये व स्तरांवर चेस खेळणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अत्यल्प आहे. भारतात सध्या ३३, ०२८ रेटेड चेसपटू आहेत. त्यात स्त्रियांची संख्या केवळ ३,५३४ आहे; ८३ ग्रॅण्डमास्टर्समध्ये केवळ दोन स्त्रिया आहेत, १२५ इंटरनॅशनल मास्टर्समध्ये स्त्रियांची संख्या सहा आहे. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभरातील चेसक्लब्जमध्ये स्त्रियांना प्रवेशच नव्हता. त्यानंतर तो दिला जाऊ लागला पण स्त्रियांना स्त्रियांशीच खेळता येत असे. खरे तर चेस स्पर्धा लिंगनिरपेक्षच असणे योग्य आहे. कारण, क्रिकेट किंवा टेनिस ह्यांसारख्या खेळांमध्ये पुरुषांना जन्मजात शारीरिक क्षमतेचा जो लाभ मिळतो, तो मिळण्याची शक्यता चेसमध्ये नसते. लिंगनिरपेक्ष (जेंडर न्युट्रल) बुद्धिबळ स्पर्धा आता होऊ लागल्या आहेत. फिडेच्या अनेक बुद्धिबळ स्पर्धा ह्या खुल्या व स्त्रियांसाठी अशा दोन्ही विभागांत खेळवल्या जातात.

अर्थात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित आहे. पुरुष चेसपटू आणि प्रशिक्षकांच्या कुत्सित, खच्चीकरण करणाऱ्या टिप्पण्यांना तोंड देत स्त्रियांना खेळावे लागते असा अनुभव जेनिफर शाहेड, ज्युडिथ पोलगर (ही जगातील पहिल्या १० चेसपटूंमध्ये स्थान मिळवणारी एकमेव स्त्री बुद्धिबळपटू आहे) ह्यांनी अनेकदा नमूद केला आहे.

तृतीयपंथी खेळाडूंना स्त्रियांच्या गटात खेळण्यास मनाई करणारा आदेश जारी केल्याप्रकरणी फिडेला दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले आहे. जन्मजात शारीरिक क्षमतेचा कोणताही लाभ ज्या खेळात नाही, त्या खेळात असा भेदभाव करण्याची गरजच नाही, अशी भूमिका घेत अनेकांनी फिडेला धारेवर धरले. तृतीयपंथी खेळाडूंचा विषय वरकरणी वेगळा वाटत असला, तरी फिडेचा लिंगाबद्दलचा प्रतिगामी दृष्टिकोन ह्यातून दिसून येतो. स्त्रियांप्रतीही असाच पूर्वग्रहदूषित, प्रतिगामी दृष्टिकोन बाळगल्यामुळे आज एकविसाव्या शतकात प्रवेश करून दोन दशके उलटून गेल्यानंतरही चेससारख्या खेळामध्येही स्त्रियांना उपेक्षा सहन करावी लागत आहे.

Story img Loader