सध्या सगळ्या वस्तूंच्या नावाबरोबर ‘स्मार्ट’ हा शब्द जोडून देण्याची पद्धत आहे. पण ‘स्मार्ट अंडरवेअर’ हे ऐकायला कसं वाटतंय?… नाही, हा कुठला अंडरवेअरचा ब्रॅण्ड नाहीये आणि आम्ही इथे कोणत्याही विशिष्ट उत्पादनाची जाहिरातसुद्धा करत नाहीयोत. ‘स्मार्ट’ हा शब्द आम्ही केवळ एवढ्यासाठी वापरलाय, की सध्याचं जग ‘स्मार्ट’ होत असताना अंडरवेअर्सचे उत्पादकही मागे राहिलेले नाहीत. कारण बाजारात विविध ब्रॅण्डस्च्या खास प्रकारच्या अंडरवेअर्स विक्रीस आल्या आहेत. स्त्रियांना दररोजच्या वापरात ‘पॅन्टी लायनर्स’सारखी उत्पादनं वापरावी लागू नयेत, यासाठी त्यात विशेष प्रकारचं कापड वापरण्यात आल्याचा उत्पादकांचा दावा आहे.

‘पॅन्टी लायनर’ म्हणजे स्त्रिया मासिक पाळीच्या वेळेस जसं सॅनिटरी पॅड वापरतात, तसंच अगदीच छोटसं आणि खूप पातळ सॅनिटरी पॅडच असतं. मूत्रविसर्जनानंतर प्रत्येक वेळी ती जागा कोरडी ठेवणं स्त्रियांसाठी आरोग्याच्या दृष्टिनं महत्त्वाची गोष्ट असते. शिवाय बऱ्याच स्त्रियांना कधी कधी ‘व्हाईट डिसचार्ज’चाही त्रास होतो. पॅन्टी लायनर वापरलं, तर या दोन्ही प्रसंगी निश्चिंत राहता येतं आणि अंडरवेअरवर ओलावा राहण्याची भीती टाळता येते. या कारणामुळे अनेक मुली बाहेर जाताना पॅन्टी लायनर वापरू लागल्या आहेत. आता बाजारात नव्याने दिसू लागलेल्या खास कापड वापरलेल्या अंडरवेअर्स मात्र पॅन्टी लायनर्ससारखंच काम करतील आणि वेगळं पॅन्टी लायनर वापरायची गरजच भासणार नाही, असा दावा हे ब्रॅण्डस् करत आहेत.

What did you decide on the No November trend Chatura new
चतुरा: ‘नो नोव्हेंबर’ ट्रेंड मध्ये तुम्ही काय ठरवलं?
Womens Health Suffering from abdominal
स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?
nisargalipi Decorating glass garden
निसर्गलिपी : काचपात्रातील बाग सजवताना…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

‘वेगळं’ कापड म्हणजे काय?

‘युरोपीयन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकोलॉजी अँड रीप्रॉडक्टिव्ह बायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार अंडरवेअरचं कापड सिंथेटिक असण्याचा आणि स्त्रियांना जननेंद्रियांच्या ठिकाणी बुरशीचा संसर्ग (यीस्ट इन्फेक्शन) होण्याचा परस्परसंबंध जोडता येतो. अर्थात या विषयावरसुद्धा वेगवेगळ्या स्त्रीरोगतज्ञांचं मत वेगवेगळं असतं. तरीही सर्वसाधारणपणे अंडरवेअरचं कापड शक्यतो सिंथेटिक नसावं. म्हणजे नायलॉन, पॉलिस्टर, स्पँडेक्ससारखी कापडं किंवा या कापडांचा ‘ब्लेंड’ असलेली कापडं अंडवेअरसाठी चांगली नाहीत. सिल्क, सॅटिन, लेस कापडसुद्धा अंडरवेअरसाठी कुचकामी. किमान अंडरवेअरचा मधला ‘क्रॉच एरिआ’ तरी अशा कापडांचा नसावा, असं सांगितलं जातं. मग अंडरवेअरसाठीच्या हल्ली लोकप्रिय होत चाललेल्या ‘स्मार्ट’ कापडांमध्ये वेगळं काय आहे?

हेही वाचा – National Doctors Day : पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या ?

स्मार्ट अंडरवेअर्सचं कापड नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं असतं. त्यांची ओलावा शोषण्याची क्षमता अधिक असते, असा दावा या प्रकारच्या अंडरवेअर्स बनवणारे उत्पादक करतात. ‘अँटी मायक्रोबिअल फॅब्रिक’ या प्रकाराचीही सध्या चलती दिसते. यानं त्या ठिकाणी ओलसरपणा न राहून ‘युरिन इन्फेक्शन’सारख्या तक्रारी टाळल्या जाऊ शकतील, असा दावा केला जात आहे. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे स्मार्ट अंडरवेअर्समध्ये ओलावा शोषण्यासाठी विशिष्ट मटेरिअल्स एकावर एक ठेवून ती शिवलेली असणं. तुम्ही ‘पिरियड पॅण्टी’ किंवा ‘युरिनरी इन्कॉन्टिनन्स पॅण्टी’चं (‘युरिनरी इन्कॉन्टिनन्स’ म्हणजे वय वाढतं, तसा मूत्राशयावर पुरेसा ताबा न राहून स्वच्छतागृहात पोहोचण्यापूर्वीच काही थेंब लघवी होणं.) नाव कदाचित ऐकलं असेल. या अंडरवेअरच्या विशेषत: मधल्या भागात कापडाच्या अगदी वरच्या थराच्या खाली पॅडिंग देण्यासाठी आणखी अब्सॉर्बंट कापडाचे थर एकावर एक बसवून शिवलेले असतात. हीच शिवण पद्धत (पण काहीशी कमी प्रमाणात. म्हणजे कापडांचे कमी थर देऊन) स्मार्ट अंडरवेअर्समध्ये वापरलेली दिसून येते. म्हणून दररोजच्या वापरात ज्या ओलाव्याचा सामना करावा लागतो, तो अंडरवेअरमध्ये शोषला जातो आणि तुम्हाला कोरडं आणि स्वच्छ वाटतं, असं हे ब्रँडस् सांगतात.

हेही वाचा – नातेवाईक टोमणे मारतायत? मग हे वाचा!

या नवीन प्रकारच्या अंडरवेअर्सच्या किंमती पाहता त्या चांगल्या दर्जाच्या कॉटन- होजिअरी कापडाच्या अंडरवेअर्सपेक्षा जवळपास तिप्पट ते चौपट जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला ओलाव्याची समस्या असेल, तर कदाचित कॉटनची अंडरवेअर आणि पॅण्टी लायनर हा तुलनेनं स्वस्त उपाय ठरेल. तरीही तुम्हाला या नवीन अंडरवेअर्स वापरून पाहायच्या असतील, तर ऑनलाईन बाजारात त्यांचे काही ब्रॅण्डस् नव्यानं प्रस्थापित झाले आहेत.