सुप्रिया खाडे
निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजन आवश्यक मानलं जातं. पूर्वीच्या तुलनेत या मनोरंजनाच्या साधनांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सची भर पडली आहे. अगदी जगभरात ओटीटी फारच लोकप्रिय झालं आहे. त्यावर नवनवीन चित्रपट, वेब सीरिज आणि इतर मीडिया कन्टेंट पाहायला मिळतो.

आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

सोशल मीडियांच्या आकडेवारीनुसार भारतीय तरुणवर्ग दिवसाला अंदाजे ८ तास २९ मिनिटे ऑनलाइन व्हिडीयो पाहण्यात घालवतो. रिपोर्टनुसार, भारतात जवळपास ४५ कोटी लोक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सदस्य आहेत आणि दर मिनिटाला १८१ ते २०४ अब्ज लोक ओटीटी प्लॅटफॉर्म्स वापरतात. ओटीटी ही एक मोठी बाजारपेठ झाली आहे. आणि मार्केटमध्ये टिकून राहाण्यासाठी तुम्हाला काही तरी वेगळं करणं गरजेचं असतं. म्हणून गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह भाषा, दृश्ये आणि लैंगिक दृश्यांनी भरलेले चित्रपट आणि सीरिज दाखवल्या जात आहेत. त्याचीच काही उदाहरणे म्हणजे ‘कूकू’, ‘द सिनेमा दोस्ती’, ‘गुपचुप’, ‘फेणेओ’ अशी ॲप्स आणि वेब सीरिज. २०२० मध्ये केवळ फेब्रुवारी ते मार्च या एका महिन्यात ‘कूकू’ ओटीटी ॲप आल्यावर प्रेक्षकांची संख्या तब्बल ६० टक्क्यांनी वाढली आणि ‘गुपचुप’ हे दुसरा ओटीटी ॲप आल्यावर मार्च २०२० ते एप्रिल २०२० या एका महिन्यात तब्बल ८० टक्क्यांनी प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. नि:संशयपणे, या सगळ्या माध्यमांमध्ये लोकांची विचारप्रक्रिया, त्यांची मूल्ये आणि त्यांच्या दृष्टिकोणावर प्रभाव टाकण्याची प्रचंड क्षमता आहे.

आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला

एकता कपूर निर्मिती असलेला असाच एक ‘XXX-2’ हा (एरोटिका/सॉफ्ट कोअर वर्गात मोडणारा) वेब शो Alt Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वर्षांपूर्वी आला होता. यामध्ये जवानाच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध दाखवले आहेत. तसेच काही उत्तेजक, लैंगिक आणि आक्षेपार्ह दृश्ये दाखवली आहेत. अशा प्रकारच्या वेब सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक गोष्टींना पाठिंबा दिलेला दाखवला जातो, त्याला ग्लोरिफाय केलं जातं आणि या सीरिजचा उद्देश लोकांना या गोष्टींपासून सावध करणं नसून लोकांना त्याकडे आकर्षित करणं असतो आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतो.

आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…

पाश्चिमात्य देशांमध्ये सॉफ्ट पॉर्न वर्गात मोडल्या जाणाऱ्या अशा कन्टेंटवर मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे आणि त्यातून जे निष्कर्ष मिळाले आहेत ते धक्कादायक होते. ब्रिटनमधल्या नॉटिंगहम विद्यापीठातील फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्ट डॉ. सायमन डफ आणि डॉ. सोफी डॅनियल यांनी याच सॉफ्ट कोअर पॉर्नचा तरुण मुलांवर काय परिणाम होतो हे शोधायचा प्रयत्न केला. यातील सर्व तरुण सरासरी १९ वर्षांचे होते. या रिसर्चचा निष्कर्ष असा निघाला, की जे लोक वारंवार सॉफ्ट पॉर्न बघतात, ते लोक अशा चित्र आणि चित्रपटांना असंवेदनशील होतात. त्यांना इतर लोकांच्या तुलनेत असा कन्टेट अश्लील वाटत नाही आणि/किंवा कमी अश्लील वाटतो. त्याचप्रमाणे स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण नकारात्मक होतो.

आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?

ह्यूस्टन विद्यापीठातील संशोधक ‘जेनीग्स ब्रायंट’ आणि इंडियाना विद्यापीठाचे ‘झिलमन’ यांनी जवळजवळ पाच वर्षे सॉफ्ट कोअर पॉर्नचा तरुणांच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांच्या निदर्शनास आलं, की सॉफ्ट कोअर पॉर्न मोठ्या प्रमाणावर पाहणाऱ्यांना बलात्कार हा एक क्षुल्लक गुन्हा वाटतो. त्याचप्रमाणे त्यांना हेदेखील आढळून आलं की, हे सर्व लोक त्यांच्या लैंगिक आयुष्यात असमाधानी होते. ते पुढे म्हणतात की, “त्यांनी अभ्यासलेल्या बलात्काऱ्यांपैकी अर्ध्या लोकांनी पीडितेवर बलात्कार करण्यापूर्वी सॉफ्ट कोअर पॉर्न पाहिला होता.”

आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?

एरोटिका आणि सॉफ्ट कोअर पॉर्नवर झालेल्या संशोधनाने हे सिद्ध केलं आहे, की अशा प्रकारचा कन्टेट वारंवार पाहणं हे व्यक्तीला विकृतीकडे नेणारं ठरतं. त्याचप्रमाणे हे समाजविघातक आणि तरुणांच्या मानसिकतेवर दुष्परिणाम करणारं आहे. इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी खूप सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे या गोष्टी पाहण्यापासून स्वतःला थांबवणं कठीण आहे म्हणूनच याच्या दुष्परिणामांबद्दल तरुणांना सजग करणे, ही काळाची गरज झाली आहे.
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत)
khadesupriya6@gmail.com

Story img Loader