रेखा शहाणे

अगदी सगळंच…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सगळंच करूण होत चाललंय आताशा

मणिपूर असो की महात्मा

जयपूर-मुंबई ट्रेन नाहीतर मेवात

शेठ मुकाट…

हे स्त्रियांनो,

ठीक आहे

कोमल आहातही तुम्ही

पण अधिक कणखरही आहात

विसरला आहात तुम्ही

स्वत:च स्वत:ला

आता एकमेकांना सांभाळत

चालत राहाणे

एवढंच हाती आहे आपल्या …

अपार पोरकं वाटतं अनेकदा या देशात…

घराचे वासे फिरावेत तसंच

घडतंय काही भयंकारी…

ऐकू येतंय… येतंय ना?

‘ही तर सुरूवातच आहे नुसती…’

आणि तू तर

जाणून आहेसच,

तू आणि तुझ्या मुलांवर

डोळा ठेवायला

चटावलाय इतिहास

तोच तर सांगतो

कथा कहाण्या तुमच्या..

रडतात बायका

धुमसतात

नि निव्वळ विझून जातात

सामान्यपणे

कुंड होतात नंतर त्यांची

अविरत वाहणारी

भरलेल्या डोह डोळ्यांची..

अगं खाचा नव्हेत त्या

सताड उघड्या नजरेनं

घे अंदाज वर्तमानाचा

धडधडीत

ओलांड सीमा

कोमलतेच्या

सहज समजुतीच्या

हो रणचंडी खुशाल

मूर्तिमंत साहसाची

तुझ्या हातातून

तुझ्या पोरांचा

हात सुटून

त्या झुंडीत

ती ही सामील होण्याआधी…

Story img Loader