मंजिरी फडणीस

गावातली संध्याकाळची वेळ… रानात चरून आलेली जनावरं गोठ्यात येऊन थांबतात. धार काढण्यासाठी त्या घरातल्या पुरुषांची गडबड सुरू असते. तिथून ते दूध डेअरीत देऊन यायचं असतं. गोठा साफ करायचा असतो. नाहीतर जनावरं शेणातच बसतात…

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Which metal vessel is used to boil
दूध उकळवण्यासह पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्याचा वापर केला जातो?

हे चित्र बदललंय, ते ही स्त्रियांनी…

जनावरांना ठराविक परिसरामध्ये चरायला सोडलं जातं. गोठ्यालगतचा हा मुक्त गोठ्याचा परिसर. त्यामुळं जनावरांना रानात लांबवर न्यावं लागत नाही. जनावरं गोठ्यात आली की आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने धार काढली जाते. पारंपरिक पद्धतीने, ताकदीने धार काढण्याचा प्रकार तिथे नसतो. दूध एकत्र होतं. ठरलेल्या डेअरीच्या कॅनमध्ये ते भरलं जातं. डेअरीची गाडी येते. दूध संकलन करून घेऊन जाते. महिन्याने मोबाईलवर हिशोब येतो आणि बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेजही! गोठा साफ करण्यासाठी शेणात हात घालावा लागत नाही. त्यासाठीही खड्ड्यांचं आधुनिक तंत्र. त्या खड्ड्यात शेण जमा होतं आणि एकत्र होऊन नंतर शेणखत म्हणून विक्री होते. अगदी जनावरांना धुणं असो किंवा चारा विकत घेणं, या सगळ्या प्रक्रिया होतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या मदतीनं!

हेही वाचा >>> मैत्रिणींनो उद्योग-व्यवसाय करताय?… मग या ७ अर्थविषयक टिप्स वाचाच!

स्त्रिया सोशल मीडियावर टाइमपास करतात असा अनेकदा विनोदाचा विषय असतो. मात्र मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक स्त्री व्यवसाय उभा करते, यशस्वीपणे चालवते. कोल्हापूर जिल्हयातल्या अब्दुललाट गावातील पूनम पाटील यांचं हे उदाहरण. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्त्री कशी यशस्वी होते याचं. पूनम जेवढ्या ताकदीनं व्यवसाय चालवतात तेवढ्याच हिंमतीनं आपली आवडही जोपासतात. जनावरांच्या मागून फिरणाऱ्या पूनम आत्मविश्वासाने रॅम्पवर उतरतात. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायासारखं काम करणं कमीपणाचं नाही हे स्टेजवरून स्पष्टपणानं सांगतात. त्यांचा स्वत:बद्दलचा हाच अभिमान नव्या कामाचं बळ देतो.

हेही वाचा >>> चौथ्या सीटसाठी वादावादी कशाला? ‘लोकल’ नियमांची खरच गरज आहे का?

करोना काळात पूनम यांनी गावी जावून दुधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. खरं तर मुलांचं संगोपन, घरचं काम असं सगळं नेहमीच्या पद्धतीत सुरू होतं. पण स्वत:च्या हिंमतीवर काही करण्याची जिद्द पूनम यांच्या मनात होती. शिक्षण बारावीपर्यंतच झालेलं. एक दिवस गावी जाऊन राहण्याचा निर्णय पूनम यांनी बोलून दाखवला. सासरी आणि माहेरी पाठिंबा होताच, पण पाठिंब्याशिवाय उभं राहण्याचा निर्धार करत त्यांनी पती, मुलांसह गाव गाठलं. तिथं थोडी जमीन होती. त्याच जमिनीवर गोठा तयार करण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला एक म्हैस घेतली. हळूहळू व्यवसाय वाढवत नेला आणि गोठ्यात एकाच्या सात म्हशी झाल्या. करोना काळात पतीच्या आजारपणात पूनम एकट्याच जनावरांचा सांभाळ करत होत्या. एवढ्या म्हशींची एकटीनं धार काढणं कठीण होऊ लागलं. करोना काळानं धडा दिला. आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन बाजारपेठ याचा फायदा लक्षात आला. त्या आधुनिक पद्धतीकडे वळल्या. म्हशींची संख्या कमी करून गाई घेतल्या.

पूनम सांगतात, ‘जनावरांची धार काढायला उशीर झाला तर ती दूध कमी देतात. म्हणून आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं. तसंच धार काढताना आजुबाजुला गोंगाट असेल तर जनावरं बुजतात. गाईंची धार तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं काढली जाते. त्यावेळी गोठ्यात मोठ्या आवाजात गाणी लावतो. आता गाई कितीही आवाज आला तरी बुजत नाहीत. गाईंना पाईपद्वारे धुण्याची सोयही आम्ही गोठ्यात केली आहे. आम्ही जनावरांना आधुनिक पद्धतीनं सांभाळतोच, पण इतर गोष्टींसाठीही तंत्रज्ञानाची मदत घेतो. जसं वर्षभराचा चारा आम्ही ऑनलाइन खरेदी करतो. आता वर्षभर साठवून ठेवता येईल असा ओला चारा मिळतो. त्यामुळे फोन किंवा मेसेजच्या सहाय्यानं दर ठरतो. पैसे ऑनलाइन पाठवले जातात. चारा घरपोच येतो. इथेही आधुनिक तंत्रज्ञानामुळं शेतात जाऊन चारा आणण्याची पुरुषी मक्तेदारी संपवता आली आहे.’ पूनम यांना जनावरांबद्दल काहीच माहिती नव्हती. तंत्रज्ञान वापरूनही पारंपरिक पद्धतीची किमान माहिती लागते. इंटरनेटच्या माध्यमातून अशी माहिती मिळवल्याचं त्या सांगतात. ‘एकदा म्हशीचं बाळंतपण करावं लागणार होतं. वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्ती भेटली नाही. शेवटी मोबाईलवरून आम्ही बाळंतपणाची माहिती शोधली. त्या बाळंतपणात बाईचं सिझेरियन करतात तशीच अवघड वेळ म्हशीवर आली होती. पण आम्ही मोबाईलवरून माहिती घेऊन ते व्यवस्थित करू शकलो.’

हेही वाचा >>> आहारवेद : रक्त शुद्ध करणारे लिंबू

गाई, म्हशींची निवड, त्यांच्यासाठी चाऱ्याची उपलब्धता, धार काढणं, शेणाचं खत तयार करणं, स्वच्छता, मुक्त गोठा, दुधाची विक्री सगळं चालतं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं. मदतनीस म्हणून मोबाईलही साथीला असतो. मग ना शेणात हात घालावा लागतो, ना धारेची कटकट होत. पूनम यांनी व्यवसायाची आर्थिक घडीही व्यवस्थित बसवली आहेत. सकाळी एक-दीड तास आणि संध्याकाळी एक-दीड तास काम करून हा दुग्धव्यवसाय यशस्वीपणे चालवता येतो हे सिद्ध केलं आहे. उरलेल्या वेळेत पूनम फॅशन शोची आवड जपतात. रॅम्पवर उतरण्याची तयारी कशी करता याबाबत विचारलं असता तेवढ्याच बिनधास्तपणे त्या सांगतात, ‘गोठा सांभाळणं हाच मोठा व्यायाम आहे. शेणा-मातीत काम करते. त्यामुळेच त्वचा चांगली राहते. मला नितळ त्वचेचं बक्षिस मिळालं आहे. यासाठी मला पार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही.’

रॅंपची आवड त्यांना सुरुवातीपासून होती, पण त्याचा त्यांनी कधी फार विचार केला नव्हता. सुरुवातीला सामान्य गृहिणीप्रमाणेच त्यांचं आयुष्य सुरू होतं. त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्यामध्ये कामाचा आत्मविश्वास आला. व्यवसाय सांभाळत असताना त्यांना दुपारी वेळ मिळत होता. या वेळेत आपली आवड जोपासावी असा विचार केला. त्या केवळ प्रोफेशनल फॅशन शो करत नाहीत. जिल्हा स्तरावर किंवा लोकल स्पर्धा असतात त्यामध्ये त्या सहभागी होतात. त्या सांगतात, ‘मला इतर स्त्रियांना दाखवायचं आहे की फॅशन इंडस्ट्री सर्वांसाठी आहे. केवळ विशिष्ट वर्गासाठी नाही. मी ग्रामीण भागात राहते किंवा जनावरं सांभाळण्याचं काम करते ते काम कमीपणाचं नाही. हे काम करून देखील मी स्वत:ची आवड म्हणून मी फॅशन शो मध्ये भाग घेते. मी स्टेजवरून खुलेपणानं आणि आत्मविश्वासानं सांगते की, मी शेणामातीत काम करूनही रॅम्पवर चालू शकते.

फॅशन शो हे पूनम यांचं प्रोफेशन नाही. त्यांना आधुनिक पद्धतीनं जनावरांचा गोठा सांभाळणं हेच स्वत:चं प्रोफेशन ठेवायचं आहे. दुग्धव्यवसाय हाच करियरचा एक भाग आहे. फॅशन इंडस्ट्री ही त्यांची आवड आहे, शक्य होईल तितकी ही आवड त्या जोपासतात. त्यात अनेक ठिकाणी यशस्वी होतात आणि आनंदीही!