Wrestling King Preeti Kumari: “वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है”, हा डायलॉग कित्येक वर्षांपासून स्त्रिया सत्यात उतरवत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक आव्हानं पेलत आहेत. घर सांभाळून नोकरी करणाऱ्या स्त्रिया, तसेच स्वत:ला सिद्ध करत कला, क्रीडा या क्षेत्रांत आपला नावलौकिक कमावणाऱ्या स्त्रिया आपल्या भारत भूमीत आपण पाहिल्या आहेत. आज आपण अशाच एका तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने पहिल्यांदाच तिच्या जिल्ह्यात कुस्तीपटूचा सन्मान मिळवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे प्रीती कुमारी?

कोणीही कठोर परिश्रमाच्या जोरावर स्वतःची यशोगाथा लिहू शकतो. बिहारमधील सहरसा येथील रहिवासी, सिमरी बख्तियारपूरच्या तरियामा गावातील शूर महिला कुस्तीपटू प्रीती कुमारी हिनेदेखील असेच केले आहे. प्रीती कुमारीला कुस्ती विश्वात तिला ‘कुस्ती किंग’ म्हणून ओळखले जाते. कारण- ती मोठमोठ्या पैलवानांना सहज पराभूत करते. प्रीतीची ही प्रतिभा पाहून क्रीडा विभागाने तिला तब्बल ६० हजार रुपयांचा ‘सन्मान’ दिला आहे.

हेही वाचा… फोन केला बंद अन् सोशल मीडिया केलं डिलीट; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या IAS परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

कला, संस्कृती व युवक विभागातर्फे आयोजित ‘राज्य क्रीडा सन्मान सोहळा २०२४’ नुकताच पार पडला. या सोहळ्यात कुस्ती या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रीती कुमारीला गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री सुरेंद्र मेहता, राज्य क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्र शंकरन, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव बी. राजेंद्र यांनी प्रीती कुमारीचा ₹६०,००० चा धनादेश, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव केला.

प्रीती कुमारीमुळे बिहार क्रीडाविश्वात सहरसाचा नावलौकिक

सहरसा कुस्तीगीर संघटनेचे सचिव व राष्ट्रीय प्रशिक्षक हरेंद्रसिंग मेजर म्हणाले की, सहरसा जिल्ह्याच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर प्रथमच महिला कुस्तीपटूला राज्य क्रीडा सन्मान मिळाला आहे. प्रीती कुमारीने बिहारच्या क्रीडाविश्वात जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देत इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. हरेंद्र सिंह मेजर यांनी असेही सांगितले की, प्रीती कुमारीने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये १५ सुवर्ण व रौप्यपदके जिंकली आहेत आणि राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदकही जिंकले आहे.

हेही वाचा… लाडकी बहीण योजनेसह ‘या’ तीन आर्थिक योजनांमुळे होतो महिलांना फायदा, जाणून घ्या सविस्तर

प्रीतीची मेहनत पाहून बिहार सरकारनेही तिला थेट क्रीडा कोट्यातून नियुक्ती देण्याची शिफारस केली आहे. ही नियुक्ती झाल्यास क्रीडा कोट्यातून थेट नियुक्ती मिळवणारी प्रीती कुमारी सहरसा जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरेल, जी तिच्या नावावर नवा इतिहास रचेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preeti kumari from bihar sahrasa known as wrestling king sports department honored her chdc dvr