आठव्या महिन्यात जन्मलेलं मूल वाचत नाही, असा मोठा गैरसमज आहे. का असं म्हटलं जात असावं?

आठव्या महिन्यात जन्मलेलं मूल वाचत नाही, असं म्हटलं जातं. गर्भधारणेच्या सातव्या आणि नवव्या महिन्यात जन्मलेली बाळं वाचतात आणि आठव्या महिन्यात जन्मलेली बाळं वाचत नाहीत, हा गैरसमज आहे. आठव्या महिन्यात काही कारणांमुळे जर पोटात दुखत असेल, तर घरातील जेष्ठ महिला चिंतेत असतात. ‘आठव्या महिन्यात बाळंतपण झालं तर? एकदा नवव्या महिन्याची सावली पडली  की मग काळजीचं कारण नाही.’ असं आजही काही आज्या म्हणतात.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
January Born Babies
January Born Baby Names : जानेवारी महिन्यात जन्मलेल्या बाळांचे ठेवा हटके नावं, ऐकताक्षणीच आवडेल सर्वांना
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

वास्तविक पहाता गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यापासून ३७ व्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत कधीही बाळंतपण झालं तर त्याला मुदतपूर्व बाळंतपण (Premature delivery) असं म्हणतात. कमी दिवसाच्या बाळाचं वजनही कमी असतं. कमी दिवसाच्या, कमी वजनाच्या बाळाच्या जिवाला पूर्ण दिवसानंतर जन्मलेल्या बाळाच्या तुलनेत जास्त धोका असतो; कारण त्या बाळाची वाढ पूर्ण झालेली नसते. तुलनाच करावयाची झाल्यास, आठव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाची वाढ सातव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाच्या तुलनेत जास्त चांगली असते आणि वजनही जास्त असतं. त्यामुळे सातव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाच्या तुलनेत आठव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाची जगण्याची शक्यता अधिक असते.  लोकांच्या मनातील अनेक वर्षांपासून चालत असलेल्या हा  गैरसमज दूर करताना बाळंतपण कधी झालं म्हणजे त्याला मुदतपूर्व बाळंतपण (Premature Delivery) असं म्हणतात याबद्दलची माहिती मिळाली पाहिजे असं वाटतं.

हेही वाचा >>> स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?

अलीकडच्या काळात ठराविक तारखेला, ठरवलेल्या वेळेला सिझेरियन (Planned caesarean section)  करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, एखाद्या बाळाची नेमकी जन्मवेळ आणि जन्मस्थान सांगता येऊ शकतं. एरवी, एखाद्या गर्भवतीची नॉर्मल डिलीव्हरी, निसर्ग कधी, कितव्या महिन्यात किती वाजता आणि कुठे घडवून आणेल याचा नेम नसतो. हा कार्यक्रम काही संगणकीय शास्त्राच्या नियमावर आधारित नसतो; की अमुक एका गर्भवतीचे ९ महिने संपले, आता ‘कमांड  द्या आणि बाळंतपण सुरु करा’ या तत्वावर तो चालत नसतो. गर्भारपणाचे दिवस भरत येताना, गर्भवतीच्या प्रजननसंस्थेत अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. त्या घटना एका विशिष्ट स्तरावर आल्यानंतर बाळंतपणाच्या कळा सुरु होतात. सहसा या घटना गर्भधारणा ३७ आठवड्याची झाल्यानंतर सुरु होतात.

काही वेळेस म्हणजे साधारणतः १० ते १५ टक्के गर्भवतींमध्ये विविध कारणास्तव या घटनांची सुरुवात ३७ आठवड्याच्या अगोदर घडतात म्हणून बाळंतपण मुदतपूर्व (Premature) होऊ शकतं. एखादं बाळंतपण मुदतपूर्व आहे की नाही हे एका गणिताच्या भाषेत समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बाळंतपणाची अपेक्षित तारीख काढण्याचं एक सूत्र असतं. गर्भवतीस शेवटची मासिकपाळी कोणत्या तारखेला (Last Menstrual Period किंवा LMP) आली होती हे विचारलं जातं.  त्या तारखेपासून पुढे ९ महिने मोजल्यानंतर आलेल्या तारखेत अजून सात दिवस जोडल्यानंतर आलेली तारीख म्हणजे बाळंतपणाची अपेक्षित तारीख किंवा Expected Date of Delivery अर्थात EDD. उदा. समजा एखाद्या स्त्रीची शेवटची मासिकपाळी येऊन गेलेली तारीख (LMP) १८ मार्च २०२४ आहे, तर तिच्या  बाळंतपणाची अपेक्षित तारीख (EDD) ही १८ डिसेंबर अधिक ७ दिवस म्हणजे २५ डिसेंबर २०२४ ही असेल. वेगळ्या भाषेत सांगायचं झाल्यास या उदाहरणात २५ डिसेंबरला ९ महिने ९ दिवस पूर्ण होतात किंवा गर्भधारणा ही ४० आठवड्याची होते. याचा अर्थ कॉम्पुटरमध्ये सेट केल्याप्रमाणे २५ डिसेंबरला निसर्ग बाळंतपणाच्या कळा सुरु करेल असं नसतं.

हेही वाचा >>> स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

२५ डिसेंबरच्या तीन आठवडे अगोदर म्हणजे ४ डिसेंबरनंतर (म्हणजेच ३७ आठवड्यानंतर) कधीही बाळंतपण झाल्यास ‘पूर्ण दिवस’ भरलेल्या (Full Term) बाळाचा जन्म झाला असं समजलं जातं. ४ डिसेंबरच्या पूर्वी म्हणजेच ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळंतपण झाल्यास त्याल Premature डिलिव्हरी असं म्हणतात. बाळ सातव्या महिन्यात जन्माला येवो अथवा आठव्या महिन्यात, जितका कमी आठवड्याचा गर्भ तितकं त्या गर्भाच्या ‘वाचण्याची’ शक्यता कमी, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही वेळेस  बाळंतपण २५ डिसेंबर म्हणजे बाळंतपणाची अपेक्षित तारीख उलटून गेल्यानंतर देखील होऊ शकतं. बाळंतपण  ४१ किंवा ४२ व्या आठवड्यात जरी झाल्यास तरी त्याला पूर्ण दिवस भरलेलं (Full Term)  बाळंतपण असंच संबोधलं जातं.  एखादं बाळंतपण सातव्या किंवा आठव्या महिन्यात का होतं या संदर्भात जवळपास ५० टक्के वेळा काहीही कारण सांगता येत नाही. काही कारणास्तव पूर्वी Premature डिलिव्हरी झालेली असल्यास नंतरच्या वेळी पुन्हा  Premature डिलिव्हरी होऊ शकते. गर्भाशयाच्या आकारमानात जन्मदोष असणं, गर्भधारणा असताना रक्तदाब वाढलेला असणं, गर्भजलाचं प्रमाण वाढलेलं असणं,  ही काही मुदतपूर्व बाळंतपण होण्याची संभाव्य कारणं आहेत. जुळ्यांची (Twins) गर्भधारणा असताना देखील Premature डिलिव्हरी होऊ शकते. क्वचित प्रसंगी ४२ आठवडे उलटून गेल्यानंतरही बाळंतपणाच्या कळा सुरु होत नाहीत. याला Post mature किंवा Post term गर्भधारणा असं म्हणतात. या परिस्थितीत, बाळाच्या सुरक्षतेसाठी बाळंतपण,  कळा येण्याचं इंजेक्शन देऊन अथवा सिझेरियन करून पूर्ण करावं लागतं.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com

Story img Loader