पतीने पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता पत्नीने परस्पर विकल्यास ती क्रुरता ठरू शकत नाही, असा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालयाने देतानाच, प्रत्येक गोष्टीकरता पत्नीने पतीची परवानगी मागायला हवी, असे मानायला पत्नी पतीची मालमत्ता नाही असेही नमूद केले. वैवाहिक नात्यामध्ये कटुता निर्माण झाली आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले की बरेचदा नात्यांबरोबरच मालमत्तेबाबतसुद्धा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशाच एका प्रकरणात, पतीने पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता पत्नीने परस्पर विकल्यास ती क्रुरता ठरते का? असा प्रश्न कलकत्ता उच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला होता.
या प्रकरणात पत्नीने पतीच्या संमतीशिवाय मालमत्तेची विक्री करणे यास जिल्हा न्यायालयाने क्रुरता ठरवून पतीस घटस्फोट मंजूर केला होता. त्याविरोधातील उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. यावेळी कलकत्ता उच्च न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवली, ती अशी-
१. संबंधित मालमत्ता पतीच्या पैशाने खरेदी केल्याचा पुरावा नाही, मात्र पत्नीने तिला कोणतेही उत्पन्न नसल्याचे मान्य केल्याने, मालमत्ता पतीच्या पैशाने खरेदी केल्याचे मानले तरी मालमत्ता पत्नीच्याच नावावर आहे हे नाकरता येणार नाही.
२. प्रत्येक गोष्टीकरता पत्नीने पतीची परवानगी मागायला हवी असे मानायला पत्नी पतीची मालमत्ता नाही.
३. पतीला त्याच्या नावावरील मालमत्ता विकण्यास पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नसल्यास, त्याच न्यायाने पत्नीने पत्नीच्या नावावरील मालमत्ता पतीच्या संमतीशिवाय विकण्यास क्रुरता मानता येणार नाही.
४. मालमत्ता विक्रीतून आलेले सर्व पैसे बॅंक खात्यातून काढून स्वत:कडे ठेवण्यासदेखिल क्रुरता म्हणता येणार नाही… ही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवून अपील मान्य केले.
या प्रकरणातून आपण विवाह आणि मालमत्ता या दोन्ही बाबतीत महत्त्वाचा बोध घेणे आवश्यक आहे. आपल्याकडच्या बेनामी कायद्यानुसार एका व्यक्तीच्या पैशाने दुसर्या व्यक्तीच्या नावावर मालमत्ता घेणे बेनामी व्यवहार म्हणून प्रतिबंधित आहे. मात्र काही नात्यातील अशा व्यवहारांना बेनामी व्यवहार कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे. पती-पत्नी हे असेच एक नाते आहे. साहजिकच पती किंवा पत्नी स्वत:च्या पैशांनी जोडीदाराच्या नावावर मालमत्ता विकत घेऊ शकतात. आपल्या नात्यात वाद निर्माण झाल्यास किंवा कटुता निर्माण झाल्यास आपला जोडीदार त्या मालमत्तेचा एकमेव मालक असल्याने, त्या मालमत्तेच्या विक्रीकरता आपल्या पूर्वसंमतीची कायद्याने आवश्यकता नाही. तसेच असे व्यवहार करण्यापूर्वीच मालकीचा अधिकार वापरून जोडीदार ती मालमत्ता परस्पर विकून टाकू शकतो, याची कल्पना पती आणि पत्नीला असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : मुलींच्या ‘कौतुक-दिवसा’ची अशीही एक कथा!
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो संमती आणि क्रुरतेचा. अशा प्रकरणात मालमत्तेच्या एकमेव मालकाला मालत्तेची विक्री करताना कोणाच्याही संमतीची आवश्यकता नाही हे कायदेशीर तत्व मान्य करावेच लागेल. आणि हे कायदेशीर तत्व एकदा मान्य केले की विक्रीपूर्वी संमती घेतली नाही आणि विक्रीचे सर्व पैसे स्वत: ठेवले याला कायद्याने क्रुरता ठरवता येणारच नाही.
या सगळ्याचा एकत्रित विचार करता, अगदी लग्नाचा जोडीदार जरी झाला तरीसुद्धा भावनेच्या भरात कोणतेही व्यवहार करू नयेत. आणि आपल्या पैशाने घेत असलेल्या मालमत्तेत आपल्याला भविष्यात हक्क हवा असेल तर त्या मालमत्तेत आपलेसुद्धा नाव घालावे अशाच निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. भविष्यात आपल्याला मालमत्तेत हक्क हवा असेल तर या निष्कर्षाप्रमाणे वागणे क्रमप्राप्त आहे.