Pune Porsche Accident Letter: मागील काही दिवस हे पोर्श अपघात प्रकरण देशभरात चर्चेत आहे, मूळ अपघातानंतर झालेल्या सारवासारवीच्या प्रयत्नांमुळे या प्रकरणाला दरदिवशी अमानुष वळणं प्राप्त होतायत. आज काय तर म्हणे आरोपीने रॅप व्हिडीओ बनवला, उद्या काय तर आरोपीला पिझ्झा बर्गर खाऊ घातला, परवा काय अग्रवाल कुटुंबाने पत्रकारांसमोर अरेरावी केली, मग आरोपीची आई कॅमेरासमोर येऊन डोळ्यातून टिपूसही न ढाळता रडायला लागली.. हे सगळं घडत असताना ज्यांनी आपली अवघी विशीतली दोन मुलं गमावलीत त्यांच्या मनाचं काय होत असेल हा प्रश्न न राहवून मन खात राहतो. हेच प्रश्न आरोपीच्या पालकांना विचारण्यासाठी हा पत्रप्रपंच..

प्रति,

लाडोबाची आई,

“आईचं काळीज असतंच असं, लेकराने केलेल्या चुका पदरात घेऊन त्याला हसत हसत माफ करणारं”, जगातल्या कुठल्याही आईची थोरवी सांगू शकेल असं हे वाक्य, तुम्ही जास्तच मनावर घेतल्याचं दिसतंय. आपल्या लाडोबाने केलेली चूक लपवण्यासाठी चालू असलेला तुम्हा दाम्पत्याचा प्रयत्न म्हणजे पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकारच म्हणता येईल. इतकी थेट विधानं करण्याचं कारण म्हणजे मागील काही काळात समोर येत असणारे व्हिडीओ. पुण्यात कल्याणीनगरमध्ये तुमच्या लेकाने गाडी चालवताना दाखवलेला बेदरकारपणा आज दोन कुटुंबांच्या घरात अंधार करून गेलाय. अर्थात त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं असण्याचं कारण नाही, कारण ती तुमची मुलं नव्हती ना? अपघात प्रकरणात तुमच्या विरुद्ध सुरू असणारा तपास अद्याप निष्कर्षांपर्यंत पोहोचला नाही त्यामुळे अजूनतरी तुम्हाला त्याप्रकरणी दोष देणार नाही, पण कॅमेऱ्यासमोर येऊन डोळ्यातून टिपूसही न गाळता रडत तुम्ही लेकासाठी केलेली दयेची याचना ही लज्जास्पद आहे. आई म्हणून स्वतःच्या लेकाच्या जीवाची भीक मागताना तुम्ही हा विचार कसा केला नाही की, तुमच्या असंतुलित मुलामुळे ‘माझं बाळ सुरक्षित ठेव’ अशी प्रार्थना करण्याचा हक्क सुद्धा तुम्ही दोन कुटुंबाकडून हिरावून घेतलायत.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
vivek oberoi shares his life changing moment
बॉलीवूडमध्ये काम नव्हतं, आईसमोर प्रचंड रडलो अन्…; विवेक ओबेरॉयचं संपूर्ण आयुष्य ‘त्या’ दिवसापासून बदललं, तो क्षण कोणता?

तुमच्या पुत्रप्रेमापोटी कदाचित तुम्ही इतक्या बधिर झाला आहात की, अवघ्या विशीतल्या मुलांना गमावलेल्या आईचा टाहो तुमच्यापर्यंत पोहोचतही नाहीये. असं म्हणतात ‘आँख की जगह आँख’ असा कायदा केला तर सगळं जगच आंधळं होईल, पण तुमच्या लाडोबावरील प्रेमापायी तुम्ही तसंही डोळ्यावर पट्टी बांधून फिरताय. तुमच्या या सोयीच्या आंधळेपणामुळे जर इतरांची जग बघण्याची संधी हिरावून घेतली जाणार असेल तर खरोखरच ‘आँख की जगह आँख’ हा कायदा अंमलात आणायला हवा, कदाचित तेव्हा तरी तुमचे डोळे उघडतील!

बरं, आई म्हणून तुम्हीच हे सगळं करायला हवं असं काही म्हणणं नाही. मुलाची जबाबदारी ही आई- वडील दोघांची असते पण असं म्हणतात स्त्रीला इतरांचं दुःख समजून घेण्याचं वरदान असतं, म्हणून तुमच्यापर्यंत हे म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न. अश्विनीच्या आईने पण कदाचित तुमच्या इतकेच किंबहुना तुमच्याहून अधिक कष्ट घेऊन त्यांच्या मुलीला वाढवलं असावं. लेकीला घरापासून लांब ठेवताना त्यांचा जीव किती तुटला असेल याचा अंदाज आता तुमचे लाडोबा काही दिवस तुरुंगात बंद असताना तुम्हालाही येत असेलच. आज तुमचा मुलगा कोठडीत आहे, तो परत यावा म्हणून तुम्ही जीवाचा आटापिटा करताय पण आश्विनीच्या आईने आटापिटा सोडा अगदी स्वतःचा जीव त्यागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यांच्या लेकीचं, हसू, मिठी, प्रेम पुन्हा अनुभवता येणार नाहीये.

ज्या अनिशला तुमच्या लेकाने चिरडलं ना, त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह अंतिम संस्काराला नेण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागले होते. तुमचा मुलगा तुमच्या श्रीमंत नवऱ्याच्या कृपेने दोघांचा जीव घेऊनही त्या तुलनेत बराच खुशालीत आहे नाही का? मग एवढं सगळं असताना रडण्याचं नाटक कशासाठी?

एवढं लिहूनही सहानुभूतीची तशी अपेक्षा तुमच्याकडून नाहीच, पण निदान स्वतःचा विचार तरी करा. एक गोष्ट ऐकली होती लहानपणी. एक मुलगा (तुमच्या मुलापेक्षा लहानच असावा) दुकानातून चॉकलेट गोळ्या चोरून आणतो आणि आईला दाखवतो. त्याची आई त्याला रागे भरण्याऐवजी तुमच्याप्रमाणेच ‘आपलंच बाळ’ आहे म्हणून हसून विषय सोडून देते. मुलाला वाटतं यात काही चुकीचं नाही. मग तो वरच्यावर गोष्टी चोरू लागतो. सुरुवातीला हव्यास आणि मग सवय म्हणून त्याच्या या चोऱ्या वाढतच जातात. मोठा झाल्यावर तो खूप कुख्यात चोर होतो. एका गंभीर प्रकरणात त्याला अटक होते आणि मग न्यायालयात (किमान गोष्टीत तरी योग्य निर्णय घेणाऱ्या) त्याला जन्मठेप सुनावली जाते. शिक्षा भोगायला जाण्याआधी तो न्याय‍धीशांकडे, “फक्त एकदा आपल्या आईला भेटू दे” अशी मागणी करतो. माणुसकी म्हणून त्याची ही विनंती मान्य केली जाते, ठरलेल्या दिवशी तो आईला भेटतो. तुमच्यासारखीच पुत्रप्रेमाने झपाटलेली आई आपल्या लाडक्या लेकाला भेटायला जाते आणि तो लेक तिचा कान कडकडून चावतो. पोलिसांनाही धक्का बसतो, त्यावर उत्तर देताना तो म्हणतो की, “माझ्या आईने जर मी पहिल्यांदा चोरी केली तेव्हाच माझा कान पिळला असता तर आज कदाचित माझ्या आयुष्यात हे वळण आलंच नसतं.” त्यामुळे उद्या तुम्ही आटापिटा करून वाचवलेला तुमचाच लेक तुमच्यावर हा आरोप करू नये म्हणजे झालं.

Video: अश्विनी कोस्टाच्या आईचा मन सुन्न करणारा प्रश्न

हे ही वाचा<< “मला हरव, तुझ्याशी लग्न करेन”, म्हणणारी १०८ किलोची ‘सिंहीण’; गूगल डूडलवर झळकणाऱ्या बानूची पडद्यामागची गोष्ट!

या प्रकरणात न्याय देण्याचं काम हे न्यायालयाचं आहे. लेकाचा जीव वाचावा म्हणून तुम्ही प्रयत्न करणं ही कितीही चुकीची असली तरी तुमची निवड आहे. आता तुम्हाला विनंती इतकीच की, निदान न्यायाने वागण्याचा प्रयत्न करा आणि तो ही जमत नसेल ना, तर कॅमेरासमोर येऊन रडण्याचं ढोंग करून गमावलेल्या जीवांचा अनादर तरी करू नका.

– एक आई

Story img Loader