गोकर्ण, कृष्णबिज किंवा मग रेन लिली यांसारख्या साध्याशा फुलवेलींनी आपण आपली बाग सहज फुलवू शकतो. आजकाल आधारकांचे (स्टॅन्ड) बरेच प्रकार उपलब्ध आहेत. त्यातले सोयीचे असे निवडून आपण या वेलींना आधार देऊ शकतो. विविध आकार देऊ शकतो. छोटे मांडव किंवा मग एखाद्या कुंडीत ही छानशी रचना करू शकतो.

बागकामाचा छंद आनंद तर देतोच, पण त्याहीपेक्षा एक कृतार्थतेची जाणीव देतो. ज्या व्यक्तीला हिरव्या मायेचा सोस असतो, जी झाडा पानांच्या संगतीत रमते, तिचं मन सदैव चैतन्यपूर्ण असतं. बागेत लावलेली आपली वानस प्रजा आपल्या जगण्यात रोज नवा आनंद भरत असते. ऋतूबदलाची जाणीव देत असते. उन्हाळ्यातलं माझं आवडतं काम म्हणजे रेन लिलीचे कंद नव्या कुंड्यांमध्ये लावणं. जवळ जवळ आठ महिने इतका दीर्घ आराम केल्यावर जमिनीखाली कंदांची संख्या वाढलेली असते. पावसाळ्याआधी त्यांना वेगळं करणं आवश्यक असतं. रंगानुसार वैविध्य राखणं, त्यांना छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये लावणं हे काम मला मनापासून आवडतं. एकदा पावसाळ्यापूर्वी ही तयारी झाली की मग उरतो तो फक्त आनंद आणि आनंद. पावसाचे ढग आकाशात गर्दी करू लागले, वातावरणात बदल झाला, पाऊस जर खरंच एकदोन दिवसांत हमखास बरसणार असेल तर रेन लिलीकडून संकेत मिळू लागतात. तिच्या हिरव्या पानांमधून भरीव हिरवे देठ वर येतात. पाच पाकळ्यांची इवली नाजूक कळी आकार घेते. कळ्यांचे असे नाजूक ताटवे बघणं हाही एक आनंदच असतो. माहेरवाशिणीचे स्वागत करायला जश्या तिच्या सख्या दारी उभ्या राहाव्यात तद्वतच् या कळ्या आपल्या तजेलदार रंगांचा साज लेऊन उभ्या असतात. पहिल्या वहिल्या सरींची गळाभेट झाल्यावर त्या अशा काही खुलतात की बागेचा नूरच पालटून जातो. हे छोटे छोटे क्षण विलक्षण सुखावतात.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

हेही वाचा : वयाच्या आठव्या वर्षी लग्न अन् भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक वर्षाहून अधिक तुरुंगवास; पाहा ‘या’ शूर महिलेची कहाणी

मग पुढे चार महिने रेन लिली भरभरून फुलते. फुलांनी बहरते, वाऱ्यावर हेलकावे घेत फुलणारी तिची फुलं मला ट्युलिप किंवा डफोडिल्सच्या फुलांपेक्षाही मोहक वाटतात. डेझी, डेफोडिल्स्, ट्युलिप, कॉसमॉस चित्रकारांच्या कुंचल्यातून अल्लद उतरतात. काय कारण असावं माहीत नाही, पण रेनलिलीचं सोंदर्य मात्र अजून अस्पर्शच आहे. ही तर निसर्ग दूत आहे. का, तर एरवी वर्षभर कधी बे -मौसम बारीश होणार असेल तर ही आवर्जून खबर देते. हिचे हिरवे भरीव कोंब, पाठोपाठ कळ्या जमिनीतून वर येऊन डोकावू लागतात. निसर्ग घटकांमधील ही संवेदनशीलता आपल्याला थक्क करते. बाग सजवायला महागडी रोपं आणण्यापेक्षा ही अशी साधीशी निवडसुद्धा खूप उपयुक्त ठरते. थोडी कल्पकता वापरून आपण विविध आकार प्रकारांच्या कुंड्यांमध्ये रेनलिलीचे बल्ब लावू शकतो. फारशी देखभालही लागत नाही. पुरेसं पाणी आणि कंपोस्ट खत दिलं की ती मजेत वाढते. पावसात फुलाफुली फुलते तर एरवी आपल्या गवतासारख्या भरीव पात्यांनी बाग हिरवीगार राखते.

मध्यंतरी मी कर्नाटकात लेपाक्षी मंदिर बघायला गेले होते. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराबाहेर अतिशय कल्पकतेने पांढरी रेन लिली लावली होती. एका रंगात सर्वदूर पसरलेली ती रेन लिली पाहताना मूळ मंदिराच्या सात्विकतेत भरच पडत होती. एरवी क्रोटोन, अकेलिफा, गोल्डन डुरांटा यांसारखी तीच ती झुडपं पाहून या जुन्या मंदिराभोवती भोवती नकळतच एक एकसुरीपणा आलेला असतो. लेपाक्षी मंदिर मात्र वेगळंच भासत होतं. आतल्या नक्षीकामाचं सोंदर्य बाहेरच्या बागेतील या पुष्प रांगोळीमुळे शतपटींनी वाढलं होतं.

रेन लिली प्रमाणेच मॉर्निंग ग्लाेरीची फुलंही फार देखणी दिसतात. विविध रंगात मिळणारी ही वनस्पती वर्षभर बागेची शोभा वाढवते. कमी देखभालीत, सहज लावता येणारी ही वेल सहजी मांडवावर, जाळीवर आधाराच्या सहाय्याने उत्तम वाढते. बागेच्या सोंदर्यात भरच घालते. हिचे विविध रंग बघायला मिळतात. हिच्या काळसर बियांवरून हिला संस्कृतात कृष्णबीज असं सुरेख नाव आहे.

हेही वाचा : “पापी माणसांच्या पोटी मुलगी जन्माला येते”, असं म्हणणाऱ्यांच्या घरात मुलगी जन्माला आली, अन्….

भारताबाहेर हिचा वापर खाद्यान्न म्हणूनही होतो. बियांपासून हीची लागवड करता येते. दुबईच्या मिरॅकल गार्डनमध्ये हिचा भरपूर वापर केला गेलाय. बाग सजविताना या वेलीच्या पानं, फुलं, कळ्या, देठं यांच्या सौंदर्याचा सूक्ष्म विचार दिसून येतो. एकच एक प्रकारची फुलं ही किती सोंदर्यपूर्ण असू शकतात याचा प्रत्यय या बागेत फिरताना ठायी ठायी येतो. अशीच एक नाजूक वेल म्हणजे गोकर्ण. विविध रंगात फुलणारी गोकर्ण बियांपासून सहज लावता येते. रंगांच्या निवडीला भरपूर वाव असतो. बनारसला गेले असताना कालभैरवाच्या दर्शनाला गेले होते. तिथे मंदिराबाहेर नीलकंठी म्हणून निळ्या गोकर्ण फुलांच्या भरीव, लांबच लांब माळा विकायला होत्या. संध्याकाळ झाली होती त्यामुळे हारांमधील फुलं थोडी मलूल वाटत होती, पण त्याचा गर्द निळा रंग महादेवाच्या विषप्राषित कंठाची आठवण देत होता.

गोकर्ण, कृष्णबिज किंवा मग रेन लिली यांसारख्या साध्याशा फुलवेलींनी आपण आपली बाग सहज फुलवू शकतो. आजकाल आधारकांचे (स्टॅन्ड) बरेच प्रकार उपलब्ध आहेत. त्यातले सोयीचे असे निवडून आपण या वेलींना आधार देऊ शकतो. विविध आकार देऊ शकतो. छोटे मांडव किंवा मग एखाद्या कुंडीत ही छानशी रचना करू शकतो. बागकामाच्या प्रयोगांत वरील वेलींचा उपयोग करत नवीन प्रयोग करायला तुम्ही आता सज्ज झाला असालचं, तर तुम्हा सगळ्यांना बांधकामाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आसमंत हे श्रीकांत इंगळहळीकरांचं पुस्तक सुचवते. हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे.
mythreye.kjkelkar@gmail.com