राणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती गोरीगोमटी, सोनेरी केसांची, छान छान कपडे परिधान करणारी, नाजूक-साजूक अशी बाहुलीसारखी दिसणारी एक स्त्री. तिच्याकडे पाहिलं की फक्त पाहतंच राहवं असंच वाटतं. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या देखील तशाच होत्या. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झालं. १९५२ मध्ये महाराणी या पदावर बसल्यानंतर जवळपास ७० वर्षांचा काळ त्यांनी पाहिला. त्यांचा रुबाब, कपडे, चालण्याची स्टाइल, बोलणे याची नेहमीच चर्चा असायची. कपडे, शूज ते अगदी ज्वेलरीपर्यंत सर्व काही अगदी परफेक्टचं असायचं. उद्या कधी, कुठे काय घालायचं, कोणत्या कार्यक्रमाला काय जास्त शोभून दिसले हे जणू काही ठरलेलंच असायचं आणि हे ठरवण्यासाठी तिने एक खास विश्वासू व्यक्तीही ठेवली होती. त्या विश्वासू व्यक्तीचं नाव आहे अँजेला केली….

आता तुम्ही म्हणालं त्यात काय एवढं… राणी म्हटलं की इतका थाट माट आलाच. तिनेही तो केला तर कुठे बिघडलं. पण तसं नाही अँजेला केली ही गेल्या अनेक वर्षांपासून एलिझाबेथ यांचे ड्रेस डिझाईन करत आहे. विशेष म्हणजे तिच्याकडे राणीच्या ड्रेसबद्दल, राणीबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल सांगण्यासारखे इतकं होतं की तिने चक्क एक पुस्तक लिहून काढलं. अँजेलाला पर्सनल अॅडव्हायझर टू हर मॅजेस्टी (द क्विन्स वॉर्डरोब) असेही म्हटले जाते. याचा अर्थ ती राणीच्या कपड्यांची क्यूरेटर आणि डिझायनर आहे. इतकंच नव्हे तर राणीची ती सर्वात जवळची विश्वासू आणि मैत्रिणदेखील होती.

ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच

अँजेला केलीने ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय केलेले वर्णन….

ऑक्टोबर १९९२ ची गोष्ट, मी ब्रिटनच्या राजघराण्यात काम करण्यापूर्वी जर्मनीतील ब्रिटीश राजदूत सर क्रिस्टोफर मॅलबी यांच्याकडे घरकाम करायची. एकदा एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप त्यांच्या अधिकृत कामासाठी जर्मनीत आल्या होत्या. त्यांनी मॅलबी यांच्या घरी भेट दिली आणि योगायोगाने मलाही त्या तिथेच भेटल्या. त्यावेळी मी पुन्हा एकदा ब्रिटनला जाण्याचा विचार करत होते आणि देवाने मला आयती संधी दिली. या भेटीनंतर वर्षभराने मला महाराणी एलिझाबेथ यांची त्यांची ड्रेस डिझायनर म्हणून नोकरीची संधी दिली आणि मी देखील ती संधी स्वीकारली.

त्यावेळी कदाचित राणीला माझ्यातील हजरजबाबीपणा, समजूतदारपणा भावला असावा आणि म्हणूनच तिने मला कामासाठी संधी दिली असे मला अनेकदा वाटायचे. मी तिकडे नोकरी करायला सुरुवात केल्यानंतर तीन वर्षांनी माझी वरिष्ठ ड्रेस डिझायनर म्हणून बढती करण्यात आली. यानंतर २००२ मध्ये मी सिनिअर ड्रेस डिझायनर आणि पर्सनल असिस्टंटही झाले. राणीची पर्सनल असिस्टंट झाल्यावर मला सुरुवातीला फार भारी वाटायचे.

मी लिव्हरपूलमधील एका सर्वसामान्य कुटुंबात वाढले. माझे वडील थॉमस हे क्रेन ड्रायव्हर होते आणि आई टेरेसा ही नर्स म्हणून काम करायचे. मला फॅशनमधला उ की चू कळत नव्हते. त्याच्यासाठी शिक्षण घ्यावे लागते याची कल्पनाही मला नव्हती. पण माझ्या आईने मला बाहुल्यांसाठी कपडे कसे शिवायचे ते कसे बनवायचे हे शिकवले आणि हेच माझ्या आयुष्यभर कामी आले.

मला नेहमीच वाटायचे की कधीतरी मला राणीचे कपडे डिझाईन करायचे आहेत, तिच्यासाठी एखाद्या कार्यक्रमात का होईना पण मला ते करायचे होते. पण सुदैवाने मला आयुष्यभर ते करता आले. त्यासाठी मी खूप त्याग केला आहे.

राणीचे कपडे डिझाईन करता करता मी स्वत:चा कपड्याचा ब्रॅण्डही सुरु केला. केली अँड पोर्डम असे त्याचे नाव. यात माझ्यासोबत अॅलिसन पोर्डम हादेखील सहभागी आहे. यात आमची टीम विविध कपडे डिझाईन करते, त्याचे डिझाईन बनवते. हे सर्व सुरु करण्यामागेही राणीचा खूप मोठा वाटा आहे. आम्ही राणीसाठी कपडे डिझाइन करत असतानाच त्यातील एक ते दोन कपडे तिला फारच आवडले. त्यानंतरच आम्हाला ही कल्पना सुचली आणि एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट झाली.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी माझ्यासाठी इतके काही केले असताना आता मला तिच्यासाठी काहीतरी करायचे होते. त्याचवेळी मला पुस्तकाची कल्पना सुचली. त्यातच योगायोगाने २०१२ मध्ये राणीला ६० वर्षे पूर्ण होत होती आणि त्यानिमित्ताने माझे Dressing The Queen: The Jubilee Wardrobe हे पुस्तक प्रकाशित झाले. यात राणीसह चाहत्यांना तिच्या पोषाखबद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला. तसेच तिच्या काही अविस्मरणीय पोषाखांचा फोटोही यात पाहता आला.

यानंतर २०१९ मध्ये मी राणी आणि तिच्या फॅशनबद्दल आणखी एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव होते The Other Side of the Coin: The Queen, the Dresser and the Wardrobe. माझे हे पुस्तक प्रचंड गाजले. यात मी बकिंगहॅम पॅलेसमधील राणीचे आयुष्य, तिचे जीवन आणि इतर अनेक किस्से उघड केले होते. यात एक किस्सा म्हणजे एलिझाबेथ परिधान करत असलेल्या हिऱ्यांचे पॉलिश हे जिन आणि पाण्याने केलेले असायचे. विशेष म्हणजे मी अनेकदा ते खरेदी करताना घासाघीस करायचे आणि राणीला उत्तम हिरे मिळवून द्यायचे.

मी राणीच्या फारच जवळची होते. त्यांच्या ‘इनर सर्कल’चा भाग म्हणून सर्वजण माझ्याकडे पाहायचे. पण मी मात्र राणीला कायमच ‘युअर मॅजेस्टी’ अशीच हाक मारायचे. मी तिच्या कुटुंबातील सदस्य नसले तरी अशी सदस्य होते जिला राणीला स्पर्श करता यायचा. मला राणीची ‘गेटकिपर’ असेही म्हटले जायचे. मी दररोज तिला पाहायचे. तिच्या अनेक सहलीत सहभागी व्हायचे. विंडसर कॅसलच्या मैदानावर जायचे.

मला याआधीही राणी म्हणून ती आवडायची, पण आता तिच्याबद्दल जास्त मोह वाटतो. मला तिला जवळून बघता आलं, तिच्याशी बोलता आलं याचा मला फारच कौतुक आहे. ती ब्रिटनची महाराणी असली तरी माझ्यासोबत ती सर्वसामान्य स्त्री प्रमाणेच वागायची. आम्ही तासनतास कपडे, मेकअप, दागिने यावर चर्चा करायचो. अनेकदा तर आम्ही हा दागिना या पोशाखावर जास्त उठून दिसेल का असे प्रश्नही एकमेकांना विचारायचो. मी कधीही माझी मर्यादा ओलांडली नाही…पण तिच्या निधनानंतर आता कायमची एक पोकळी निर्माण झाली आहे.

मी तयार केलेले अनेक कपडे तसेच कपाटात पडलेले मला दिसतात. ते कधी वापरात येतील की नाही याची मला कल्पना नाही. पण एका राणीच्या सहवासात मी माझ्या आयुष्यातील घालवलेली ती ३० ते ३५ वर्ष आणि त्यातील क्षण नी क्षण मला कायम स्मरणात राहील… यापुढे कोणताही कपडा डिझाइन करताना मला तिचा चेहरा गोरागोमटा चेहरा, निळशार डोळे डोळ्यासमोर येईल आणि ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय बाहुलीसारखी नटलेली दिसेल हे मात्र नक्की….

Story img Loader