डॉ. लिली जोशी

१९ ते २४ या वयात झालेली प्रसूती ही आई आणि बाळ, दोघांच्याही तब्येतीला उत्तम असते. २५ ते ३० या अवधीत (हवी असल्यास) आणखी मुलं होऊ द्यावीत. तिशीच्या आत कुटुंब पूणं झालं पाहिजे, असं स्त्रीरोगतज्ञांचं म्हणणं असतं. मात्र आजूबाजूला पाहिलं तर परिस्थिती वेगळीच दिसते. पस्तिशी उलटलेले, केस पिकलेले, सुटलेलं पोट लपवू पहाणारे नवमातापिता हे दृश्य आता नवीन नाही.

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण

उशिरा मूल होण्याचा निर्णय त्यांनीच घेतलेला असतो तो वेगवेगळ्या कारणांसाठी. शिक्षण दीर्घकाळ चालू राहतं. लग्नाला उशीर होतो. पालकत्वाची जबाबदारी घ्यायलाच नको वाटतं. करिअर स्थिरावलेलं नसतं. आर्थिक स्थिती अजून मजबूत व्हावी, असं वाटतं वगैरे. कारणं कोणतीही असोत, ‘आता होऊन जाऊं देत’ असं वाटतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो हे खरं. मग त्यात अडचणीही अनेक येतात. वंध्यत्व, कृत्रिम गर्भधारणेची गरज, गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचं बाळ वगैरे. आईचे वय जसं वाढत जातं तशी बाळात मंगोलिझम, ऑटिझम इत्यादी दोष आढळण्याची शक्यताही जास्त असते. मोठ्या वयाच्या या आईला गर्भवती असताना उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉइडचे विकार, खूप सारी हॉर्मोन्स घेतल्याने वाढलेलं वजन, या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. या तक्रारी प्रसूतीनंतरही चालू राहण्याची शक्यता असते.

हेही वाचा… ‘अल्फाबेट ग्रॅनी’… ९६ व्या वर्षी शिकायला सुरूवात आणि परीक्षेत पहिला नंबर!

उशिरा मूल होणारे आईबाबा या सगळ्या अडचणींवर मात करून बाळाचं संगोपन करण्यासाठी अटीतटीनं झगडतात. कारण ‘बहुत विचारान्ती आणि प्रयत्नांती’ झालेलं हे मूल अर्थात ‘प्रेशस बेबी’ असतं. कृत्रिम गर्भधारणा असल्यास जुळी मुलं होण्याचं प्रमाणही वाढतं. अशा मुलांचं संगोपन ही गोष्ट काही सरळसोपी नसते. वयानुसार उत्साह, सुदृढता, लवचिकपणा, खेळकरपणा कमी होत जातो आणि बाळ वाढवताना तर या गोष्टी पुरेपूर लागतात. रात्रीची जागरणं, बाळाची दुखणी, शाळेतल्या छोट्यामोठ्या अडचणींसाठी धावावं लागणं, याचा प्रौढ आईबाबांना त्रास वाटू शकतो. त्यांच्या मुलांच्या मित्रांचे आईबाप तुलनेनं तरुण असल्यानं ते ही कामं सहजपणे पार पाडतात. मुलांशी दंगामस्ती करतात, सायकल शिकवतात, पोहायला घेऊन जातात, कडेखांद्यावर बसवून प्राणीसंग्रहालयात घेऊन जातात, त्यांच्या शाळांच्या सर्व उपक्रमांत उत्साहानं भाग घेतात. इथे प्रौढ आईबाबा कमी पडतात. त्यांना त्यांचे स्वत:चेच आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात.

पस्तिशी उलटलेल्या आईबाबांची वरची पिढी, म्हणजे त्यांचे आईवडीलही अधिक वयस्कर झाल्यानं नातवंडांच्या संगोपनात त्यांची जेवढी मदत झाली असती, आधार मिळाला असता, तेवढा मिळणं कठीण होतं. मुलं जसजशी मोठी होत जातात, तसतसं आजूबाजूच्या बदलत्या समाजाचं प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्वात पडू लागतं. त्यांच्या वागण्याबोलण्यात फरक होऊ लागतो. हे बदल तरुण आईबाबांच्या लक्षात पटकन येतात. त्यांच्या आणि मुलांच्या वयातलं अंतर त्या मानानं कमी असतं, त्यामुळे त्या बदलांना असे तरुण पालक जुळवूनही घेतात. पण चाळिशी उलटलेल्या पालकांना हे बदल पचवणं कठीण जातं. मतभेदांना सुरुवात बरीच लवकर होते.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: झुळुझुळु पाणी, गाते आनंदगाणी

वर म्हटल्याप्रमाणे कारणं कोणतीही असोत, तुम्ही मुलाला उशिरा जन्म द्यायचं ठरवलं असेल तर या सर्व बाबींचा साधक बाधक विचार अगोदरच करा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्वत:ची प्रकृती. ती जास्तीत जास्त ठणठणीत कशी राहील, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. नियमित व्यायाम, सुयोग्य आहार, पूरक व्हिटॅमिन्स, वजनावर कंट्रोल, वेळेवर डॉक्टरी तपासण्या आणि सल्ला, या गोष्टींना तर काही दुसरा पर्याय नाही. त्या केल्याच पाहिजेत. तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर त्या पुरेपूर आटोक्यात ठेवा.

बाळाच्या संगोपनासाठी कोणाची मदत लागेल हा विचार आधीपासून करून त्याची व्यवस्था करा. खूप वाट बघून झालेलं हे मूल, त्याला तुमचं प्रेम भरभरून द्या. अनुभवानं आलेल्या समजूतदारपणाचा, शांतपणाचा बाळाला वाढवताना तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या वेळपर्यंत करिअरमध्ये स्थिरावल्यामुळे बाळाच्या भविष्याची आर्थिक तरतूदही तुम्ही करू शकता. तुमच्या प्रौढत्वाचा फायदा मुलांपर्यंत पोचवू शकता. अशी मुलंही उत्तम वाढतात, शारीरिक आणि बौद्धिक प्रगती साधतात, ही गोष्ट नक्कीच दिलासा देणारी आहे.

drlilyjoshi@gmail.com

Story img Loader