रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाचा त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत असल्यामुळे रिक्षांमधील चालकाच्यासमोरील आरसे त्वरित हटविण्यात यावेत, असा आग्रही विनंतीअर्ज एका एनजीओने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाहतूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. वाहनांना रिअर व्ह्यू आरसे असतात. ऐन गर्दीमध्ये किंवा अन्य वेळीही दोन वाहनांतील सुरक्षित अंतर राखणे सोयीचे व्हावे आणि प्रवासीसुरक्षा असे दोन हेतू त्यामागे असतात. मात्र चारचाकी वाहनांव्यतिरिक्त रिक्षासारख्या वाहनांमध्ये चालकाच्या समोरच्या बाजूसही एक आरसा अनेकदा असतो, या आरशाची आवश्यकता नाही. रिक्षांना असलेले साईड व्ह्यू आरसे चालकांसाठी पुरेसे आहेत. असे असतानाही चालकासमोर बसवलेल्या रिअर व्ह्यू आरशातून काही रिक्षावाले रिक्षेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना वारंवार न्याहाळत असतात, म्हणूनच या आरशांवर एनजीओंनी आक्षेप घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा