संपदा सोवनी

अगदी फुलांच्या पाकळ्यांसारखे टपोरे दिसणारे ओठ हा सध्याचा लोकप्रिय फॅशन ट्रेंड झाला आहे. पूर्वीच्या काळी ‘पातळ जिवणी’ (अर्थात पातळ, नाजुक ओठ) हे अनेक समाजांत सौंदर्याचं लक्षण मानलं जायचं. तसे उल्लेख मराठी साहित्यातसुद्धा ठिकठिकाणी तुम्हाला सापडतील. यावरून एक मजेशीर गोष्ट आठवतेय. २००३ मध्ये सलमान खान अभिनित ‘तेरे नाम’ हा चित्रपट पुष्कळ गाजला होता. त्या वेळी चित्रपटाची नायिका भूमिका चावला हिला ‘जाड ओठांची’ असं म्हणून ‘ट्रोल’ करण्यात आलं होतं! काळाबरोबर फॅशन बदलते, तसा सध्या आहे टपोऱ्या, जाड ओठांचा जमाना! ‘क्रेडिट गोज् टू’- किम कार्डाशियन- कायली जेन्नर भगिनी, की आणखी कुणी?… असो! एक गोष्ट मात्र खरी, की अनेक तरुणी फुलासारख्या, टपोऱ्या ओठांसाठी विशेष प्रयत्न करू लागल्या आहेत. यात इंजेक्शनद्वारे ‘लिप फिलर’ करून घेण्यासारखे उपचार केले जातात. परंतु सामान्यांना त्यापेक्षा परवडू शकणारा व सोपा वाटणारा उपाय वापरला जातोय, तो ‘लिप प्लंपर’ हा. हे उत्पादन लिप बाम किंवा लिपस्टिकसारखं दिसतं. ते काम कसं करतं- अर्थात ओठांना टपोरे (प्लंपी) कसं बनवतं, हे जाणून घेण्याजोगं आहे.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
pink powder on los angeles
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…

‘लिप प्लंपर’ नव्हे; ‘लिप इरिटेटर’!

लिप प्लंपरमध्ये सौम्य ‘इरिटंटस्’ असतात. त्यामुळे प्लंपर ओठांवर लावलं, की तिथे थोडं चुरचुरल्यासारखं होतं. प्लंपरमधल्या इरिटंटस् ओठांमध्ये असलेल्या रक्तवाहिन्या काहीशा प्रसरण पावतात आणि रक्ताचा ओघ ओठांच्या त्वचेच्या वरच्या थराच्या दिशेनं होतो. या प्रक्रियेत ओठांना अगदी थोडी सूज येते आणि त्यामुळे ओठ पूर्वीपेक्षा मोठे आणि फुलांच्या पाकळ्यांसारखे टपोरे दिसायला लागतात. अर्थात सर्वांनाच लिप प्लंपर वापरून सारखेच रिझल्टस् मिळतील असं नसतं. काही जणांवर त्याचा लगेच परिणाम दिसतो, तर काहींचे ओठ प्लंपर वापरूनही नेहमीसारखेच दिसू शकतात. शिवाय लिप प्लंपरनं ‘प्लंपी’ दिसणारे ओठ काही वेळापुरतेच तसे दिसतात. त्याचा परिणाम कायम किंवा दिवसभर टिकत नाही. त्यामुळे काही वेळानं प्लंपर पुन्हा वापरावं लागू शकतं.

हल्ली ‘इरेटेटर’ पदार्थ न वापरलेले लिप प्लंपर्सही मिळू लागले आहेत. त्यांत ओठांमधला ओलावा (मॉइश्चर) वाढवणारे पदार्थ वापरलेले असतात. ते तुलनेनं अधिक चांगले समजले जातात. परंतु त्यांच्या आणि इरिटेटर्स असलेल्या प्लंपरच्या रिझल्टस् मध्ये फरक असतो.

काळजी काय घ्यावी?

लिप प्लंपरमधल्या कोणत्या इरिटेटर पदार्थाची तुम्हाला ॲलर्जी आहे का, हे आधी तपासावं. म्हणजे लिप प्लंपर लावल्यावर ओठांवर खूपच चुरचुरतं, जळजळतं आहे का? तसं असेल, तर तो प्लंपर न वापरणंच चांगलं. तुमची त्वचा अधिक संवेदनशील (सेन्सिटिव्ह स्किन) असेल, तरीही लिप प्लंपर वापरणं टाळलेलं बरं.

प्रकार अनेक –

लिप बाम, टिंटेड (रंगीत) लिप ग्लॉस, लिप ऑईल, लिप मॉइश्चरायझर, लिप सनस्क्रीन अशा विविध प्रकारांत लिप प्लंपर उत्पादनं मिळतात.

खरंतर ओठांची चांगली काळजी घेतली, तर ओठ साध्या उपायांनीही चांगले दिसू शकतात. उदा. पुरेसं पाणी पिणं, ओठांना रोज बाहेर पडताना आणि रात्री झोपताना चांगल्या दर्जाचा लिप बाम लावणं, ओठांवरची मृत त्वचा लिप स्क्रबसारखी सौम्य उत्पादनं वापरून वेळोवेळी काढून टाकणं, लिपस्टिक लावल्यानंतर झोपण्यापूर्वी ती सौम्य उत्पादन वापरून काढून टाकणं, इत्यादी केल्यास ओठांची चांगली निगा राखली जाईल. मग कदाचित तुम्हाला लिप प्लंपर वापरण्याची वेगळी गरज उरणार नाही.

तरीही लिप प्लंपर वापरायचंच असेल, तर आधी त्याची चाचणी घेऊन पाहा आणि ओठांना, त्याबाजूच्या त्वचेला काही त्रास होत नसेल, तर असा चांगल्या दर्जाचा लिप प्लंपर कधीतरी वापरायला हरकत नसावी.

Story img Loader