लग्न म्हणजे नक्की काय? फक्त देवाणघेवाण, बंधन, व्यवहार, शारीरिक संबंधाचं लायसन्स की आयुष्यभराची सौहार्दपूर्ण प्रेमाची, विश्वासाची साथ? ही खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. आपण खूप सहजपणे म्हणतो, की दोन व्यक्ती विवाह बंधनात अडकल्या…
आणखी वाचा : अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
यात दोन गोष्टी आल्या. एक तर बंधन आणि दुसरं अडकणं. हे बंधन आणि अडकणं जोपर्यंत स्वखुशीनं मनाजोगतं आहे, त्यात ओतप्रोत प्रेम, विश्वास आणि आनंद आहे, तोपर्यंत पतिपत्नीचं नातं सुरक्षित आहे; पण हे समीकरण नेहमी इतकं सोपं सरळसोट असेलच असं नाही. सतत क्षणभंगुर आनंदाच्या शोधात असणाऱ्या अस्थिर व्यक्तींच्या आयुष्यात समोर येणाऱ्या प्रलोभनाला टाळणं ही फार अवघड आणि आव्हानात्मक बाब आहे. पती आणि पत्नी या दोघांच्याही आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतात. एकमेकांबद्दल असलेली ओढ आणि आकर्षण कमी कमी होत गेलं, की बाह्याकर्षण प्रबळ होऊ शकतं आणि नेमकी तीच वेळ असते स्वतःला सावरण्याची.
आणखी वाचा : वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…
इरा आणि अनिश यांच्या लग्नाला सात वर्षं झाली त्या वेळी त्यांना एक तीन वर्षांची मुलगी होती. नोकरी, घर आणि मुलगी यांचं करताना इरा दमून जात असे. लग्नानंतरच्या तीन-चार वर्षांत असणारा तिचा जोश, उत्साह आणि अनिशला दिला जाणारा वेळ या सगळ्यात साहजिकच बदल होत गेले. त्याच काळात अनिशला कामानिमित्त त्याच्या ऑफिसमधील एका स्त्री सहकर्मीसोबत सतत बाहेरगावी जावं लागत होतं. त्याला तिच्याबद्दल जबरदस्त आकर्षण वाटू लागलं आणि एका क्षणी त्याला मोह आवरला नाही…
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलींना वडिलांबद्दल आकर्षण वाटणारा ‘इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स’?
ही बाब प्रामाणिकपणे इराजवळ कबूल करून कदाचित प्रकरण तिथल्या तिथे थांबलं असतं, पण त्यानं तसं केलं नाही. त्याला वैवाहिक आयुष्यातील स्थिरताही हवी होती आणि हे विवाहबाह्य संबंधही! काही दिवसांतच इराला कुणकुण लागली, पण तिचा अनिशवर दृढ विश्वास होता. आपण विनाकारण संशय नको घ्यायला म्हणून ती गप्प राहिली. त्यानंतर अनिशची हिंमत वाढत गेली आणि त्याचे आणखी एका तरुणीशी संबंध प्रस्थापित झाले. इराला त्याच्या दोन्ही संबंधांबद्दल जेव्हा खात्रीशीररीत्या समजलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. आपल्या नात्यातील विश्वासाला तडा गेला आणि त्यानं ही बाब आपल्यापासून लपवून ठेवली हे अर्थातच तिला अजिबातच सहन झालं नाही आणि तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.
आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!
“इरा, तुला माहितेय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी चुकलो, मान्य करतो. मला माफ कर.” अनिश गयावया करत होता. “खरंच प्रेम करतोस तू माझ्यावर? तसं असतं तर प्रथम आकर्षण वाटलं तेव्हाच तू माझ्याशी बोलला असतास. मी तर म्हणेन की आकर्षण वाटणं यातही काहीच गैर नाही अनिश. इतके तास सोबत काम केल्यावर ती एक नैसर्गिक भावना आहे. तुला आठवतं, माझ्या ऑफिसमधील केदारबद्दल मी तुला सांगितलं होतं. मला खूप आवडायचा तो. देखणा, ‘हॉट’ आणि कामातही एकदम चोख! अनेकदा आम्ही एकत्र कॉफी प्यायला गेलो होतो, पण ते तितकंच! त्याबद्दल मी सांगितलं होतं तुला. तुझ्याशी बोलल्यानंतर मला माझ्या मनाशी प्रामाणिक राहाणं खूप सोपं गेलं रे! एखादी व्यक्ती आवडणं यात काहीच गैर नाही; पण त्यात जेव्हा विषयवासना प्रवेश करते तेव्हा ते अत्यंत चूक ठरतं. तिथपासून तुमच्या आपल्या नात्याला खिंडार पडायला सुरुवात होते. सहकर्मी आणि आयुष्यभराचा सहचर यात फरक आहे ना, अनिश? तीच तीच चूक तू पुन्हा करतोय म्हणजे विवाहबाह्य संबंध तुला खूप ‘थ्रिलिंग’ वाटू लागले आहेत. अशा स्थितीत मला आपलं नातं लटकत, लोंबकळत पुढे न्यायचं नाहीये”
आणखी वाचा : पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?
मंडळी, आपल्या विचारांशी ठाम नसलेली आणि आहे त्या सुंदर नात्याची पर्वा न करणारी अनिशसारखी व्यक्ती कुठल्याच नात्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. पती असो की पत्नी, त्यांना आयुष्याच्या अनेक निसरड्या वळणांवर मोहाचे क्षण हे येणारच. एकमेकांबद्दल असलेले प्रेम, ओढ, विश्वास, मोकळा संवाद आणि जबाबदारीची जाणीव या सूत्रांवर अशा निसरड्या वाटा नक्कीच पार करता येतात. विवाह संस्कृती दोन (भिन्नलिंगी) व्यक्तींस एकत्र जगण्याची सुसंस्कृत मर्यादा प्रदान करते. ती मर्यादा ओलांडली, की मग संबंध विवाहबाह्य होतात. एका उत्तम वैवाहिक नात्यात ती सुसंस्कृत मर्यादा असायलाच हवी.
adaparnadeshpande@gmail.com