पालक खूप मनापासून मुलांना शिकवतात, आपल्या पायावर उभं करतात आणि अनेकदा आपल्या कुवतीबाहेर जाऊन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हे मुलगे आणि मुली दोघांनाही लागू आहे, पण आज आपण मुलींबद्दल बोलत आहोत. मुली कमवायला लागल्यानंतर अर्थातच लग्नाचा विषय निघतो. ‘कुणी बॉयफ्रेंड असेल तर सांग बरं का,’ असं थेट विचारलं जातं. हे म्हणत असताना मनात धाकधूकही असते, की जर खरंच
तिनं तिच्या मनानं निवडला असेल तर?
एक मन म्हणतं, की हरकत नाही, पण आतून वाटत असतं, की मुलगा किमान ‘आपल्यातला’ आणि उच्चशिक्षित असावा. उत्तम पगार असावा. माणसं चांगली असावीत. कुठेतरी मनात विश्वास असतो (आणि आशा असते) की ही आपली मुलगी आहे, आपल्या संस्कारात वाढली आहे तेव्हा बहुतेक तरी आपल्या म्हणण्याबाहेर जाणार नाही. अशा वेळेला जर मुलीनं पसंत केलेला मुलगा त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा असेल तर आनंदीआनंद. पण तसा नसेल तर घरात वादळ निर्माण होतं.

आणखी वाचा : महिलांचा राजकारणातला सहभाग वाढणार तरी कधी? 

kokodama plant loksatta news
निसर्गलिपी : कमी खर्चात, जागेत सजणारं कोकोडेमा
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
morning sickness nausea vomiting of pregnancy
‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ?
garden, home, Kokedema technique, chatura
निसर्गलिप : कोकोडेमा तंत्राने घरात फुलवा बाग…
alyse ogletree, Breast Milk , newborn baby
अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे
children afraid of father parenting tips
समुपदेशन : बाबांची भीती वाटतेय?
Cambridge Union Society elects British Indian student Anoushka Kale as president
विसाव्या वर्षी मिळवला अध्यक्षपदाचा मान
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?

मुलीनं आधी आपल्याला विश्वासात घेतलं नाही या विचाराने दुखावलेले पालक मग त्यांच्या निवडीच्या फुटपट्ट्या घेऊन बसतात. त्यात काहीच चूक नाही. ते कायम मुलीचं हितच बघत असतात. मुलगी शिकलेली आणि कमावती असेल तर तिच्या निर्णयाशी ठाम असणार, आपण तिला फक्त विरोधासाठी विरोध नाही करू शकत हे आजच्या पालकांना चांगलं ठाऊक आहे. आपल्या स्वतंत्र विचारांच्या मुलीला आपला नकार नेमका कोणत्या मुद्द्यावर आहे ते ‘लॉजिकली’ सांगावं लागतं. इतर सर्व निकषांवर मुलगा खरा ठरत असेल तर केवळ ‘जात’ या मुद्द्यावरचा विरोध फार काळ टिकू शकत नाही, हे आजचं वास्तव आहे. मुलगा खरंच चांगला असेल तर जातीभेद विरघळून जातो. मुलगी सुखात असल्यावर पालक बाकी मनाविरुद्ध असलेल्या गोष्टी विचारपूर्वक मागे सारतात. छोट्या मोठ्या कमतरता भरून काढण्यास मनापासून मदत करतात. पुढे सगळं छान होतं.
जर मुलगी उच्चशिक्षित, पण मुलगा अत्यंत कमी शिकलेला, जेमजेम अर्थार्जन करणारा, त्यातही व्यसनी असेल, त्याला वाईट सवयी असतील, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक असेल तर मात्र पालक मुलीच्या वेड्या हट्टापायी हवालदिल होतात (खरंतर मुलींनी ही वेळ पालकांवर आणूच नये). असे प्रसंग पालकांची कठोर परीक्षा घेणारे ठरतात. मुलीचं आयुष्य पणाला लागलंय ही भावना काळीज चिरणारी असते. कितीही समजावून सांगितलं तरीही मुलगी ऐकतच नसेल तर बऱ्याचदा पालक संतापाच्या भरात टोकाची भूमिका घेतात. नको ते बोलून जातात, ‘आजपासून तू आम्हाला मेलीस’, ‘तुला काय पाहिजे तो निर्णय घे! मग पुन्हा रडत माघारी आमच्याकडे येऊ नकोस!’ असं बोलून जातात. ती चुकतेय हे कळत असतं, पण त्या परिस्थितीत जिवाचं बरं-वाईट होऊन मुलगी हातची जाऊ देण्यापेक्षा तिला विश्वासात घेणं जास्त महत्त्वाचं नाही का?

आणखी वाचा : गृहिणींसाठी टिप्स, स्वतःसह कुटुंबालाही ठेवा निरोगी; थंडीमध्ये प्या, हेल्दी ड्रिंक्स!

पालकांनीसुद्धा आततायीपणा केला तर नेमकं काय चुकतंय हे मुलीला कसं समजणार? अशी वेळ आलीच तर जबरदस्तीनं मुलीचं लग्न दुसऱ्या कुणासोबत तर नाही लावू शकत ना? (आजच्या काळात ते शक्य नाही आणि योग्यही नाही) मुलीनं आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध तिच्या मतानं लग्न केलं म्हणजे आता पुढे सगळी जबाबदारी फक्त तिची! ही भूमिका पालक नाही घेऊ शकत.
अशा वेळी शहाणे पालक काय भूमिका घेतात? मुलीनं इतका चुकीचा निर्णय घेईपर्यंत आपल्या लक्षात कसं नाही आलं? तिला वाढवताना आपलं काय चुकलं? हा स्वत:ला दोष देणारा नकारार्थी विचार तर करतातच, पण मुलीला सांगतात, “बेटा, आज आंधळ्या प्रेमापायी तुला कळत नाहीये की तू चुकते आहेस. या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे. पण तो मुलगा बदलेल आणि तुमचं आयुष्य उत्तम होईल असा तुला विश्वास वाटतोय, तर करा लग्न. ईश्वर न करो, पण पुढे जाऊन अडचणीत आलीस तर विश्वास ठेव, आम्ही सतत तुझ्या पाठीशी आहोत. कधीही काहीही संकट आलं तर आधी आमच्यापाशी बोल. अन्याय आणि हाल सहन करू नकोस. आपला निर्णय चुकला असं वाटलं तर मोकळेपणानं बोल. कुठलीही गोष्ट आयुष्यापेक्षा जास्त मोलाची नाही.” आपल्या पोटच्या पोरीला हे बोलणं नक्कीच सोपं नाही, पण ती चुकतेय म्हणून तिला वाऱ्यावर तर नाही सोडू शकत ना? इथे आपला ‘इगो’ कुरवाळत नाही बसू शकत.

आणखी वाचा : वेश्याव्यवसायात ढकललं… समाजानं झिडकारलं… पण आज कर्तृत्व पाहून सन्मानित केलं!

पालकांनी लावून दिलेली सगळी लग्नं शंभर टक्के यशस्वी होतात असं आहे का? आणि एक लग्न अयशस्वी झालं म्हणजे आयुष्य संपत नाही ना? आपली मुलगी ‘असणं’ आणि आनंदात असणं सगळ्यात महत्त्वाचं! बाकी गौण!

adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader