पालक खूप मनापासून मुलांना शिकवतात, आपल्या पायावर उभं करतात आणि अनेकदा आपल्या कुवतीबाहेर जाऊन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हे मुलगे आणि मुली दोघांनाही लागू आहे, पण आज आपण मुलींबद्दल बोलत आहोत. मुली कमवायला लागल्यानंतर अर्थातच लग्नाचा विषय निघतो. ‘कुणी बॉयफ्रेंड असेल तर सांग बरं का,’ असं थेट विचारलं जातं. हे म्हणत असताना मनात धाकधूकही असते, की जर खरंच
तिनं तिच्या मनानं निवडला असेल तर?
एक मन म्हणतं, की हरकत नाही, पण आतून वाटत असतं, की मुलगा किमान ‘आपल्यातला’ आणि उच्चशिक्षित असावा. उत्तम पगार असावा. माणसं चांगली असावीत. कुठेतरी मनात विश्वास असतो (आणि आशा असते) की ही आपली मुलगी आहे, आपल्या संस्कारात वाढली आहे तेव्हा बहुतेक तरी आपल्या म्हणण्याबाहेर जाणार नाही. अशा वेळेला जर मुलीनं पसंत केलेला मुलगा त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा असेल तर आनंदीआनंद. पण तसा नसेल तर घरात वादळ निर्माण होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा