दोन दिवसांसाठी माहेरी आलेली नीता एकदम शांत शांत होती. साधनाताई म्हणजे नीताची आई जरा काळजीत पडली होती. “काय झालं बेटा? तू इतकी नाराज का वाटतेय? ती माणसं चांगली आहेत ना?”

“माणसं चांगली आहेत असं आत्यानं सांगितलं आणि तुम्ही लगेच माझं लग्न ठरवून टाकलं. मला आणि संग्रामला एकमेकांना जाणून घ्यायला पुरेसा वेळही मिळाला नाही.”

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
Japanese man celebrates sixth marriage anniversary
मुलींचे नकार पचवून वैतागल्याने शेवटी ‘बाहुली’शी केलं लग्न! अजब प्रेमाची गजब कहाणी; पाहा VIDEO
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

“म्हणजे? तो वाईट वागला का तुझ्याशी?”

“सुखी संसारासाठी फक्त तितकं पुरेसं असतं का? मी म्हणजे रात्री ग्लोव्हज- हेल्मेट घालून बुलेटवर फिरणारी …मैत्रिणीला भेटायला म्हणून काश्मीरला जाणारी, धमाल-मस्ती आवडणारी, आणि हा दुर्मुखलेलं तोंड घेऊन घरात बसणारा. जवळचे असे मित्रही नाहीत त्याला. तो फारच बोअरिंग आहे गं! त्याला सिनेमाची, पार्टी करण्याची, खरेदीची, सहज म्हणून फिरत जाऊन आईस्क्रीम खाण्याची, साधं गाणं ऐकण्याचीदेखील आवड नाही. बरं सुट्टीच्या दिवशी घरी बसून ओटीटीवर एखादी सीरियल बघू म्हटलं तर ते फालतू असतं म्हणे. नवरात्रात सगळे गरबा खेळत होते, याला म्हटलं चल, तर म्हणाला असले बायकी कार्यक्रम मला नाही आवडत. पुरणाचं जेवण झाल्यावर भावोजींनी विड्याची पानं आणली. तर म्हणाला, मला अजिबात नाही आवडत. अरे गंभीर माणसा, मग तुला आयुष्यात आवडतं तरी काय? असा कसा कोरडा फट्ट माणूस गं हा?” मनात साचलेलं सगळं नीता फाडफाड बोलून गेली.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: वात आणणारा वात

साधनाताईंनी काही क्षण अवधी घेतला आणि म्हणाल्या, “तुझं लग्न घाईत ठरलं हे खरं. तुझ्याशी तो वाईट वागत नाही किंवा तुला त्रास देत नाही ही सगळ्यात जमेची बाजू. बाकी बोअरिंग असण्याचं म्हणशील तर आमच्या लग्नानंतर तुझे बाबा काय कमी बोअरिंग होते का?”

“चल गं, बाबा किती चील आहेत. कसलं एन्जॉय करतात.”

“ते आता तुम्ही बघताय तसं. आधी असे इतके जिंदादिल नव्हते ते. तू आत्ता वर्णन केलंस ना, तसेच होते. हळूहळू माझ्यासोबत राहून सगळ्या गोष्टींत आनंद कसा घ्यायचा ते अनुभवत गेले. मला आवडतं म्हणून बाहेर जाऊ लागलो आम्ही. कधी पावसात न भिजलेला माणूस माझ्यासाठी लोणावळ्याला आला आणि आता बघ किती पाऊस आवडतो त्यांना. प्रेमानं जिंकलं आम्ही एकमेकांना. मला कंपूत बसून कॅरम खेळायला अजिबात आवडत नव्हतं, पण बाबांना आवडतं म्हणून मी भाग घेऊ लागले आणि मलाही आवडायला लागलं. आपल्या माणसावर प्रेम असलं की त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेणं आपोआप जमतं. तू त्याला थोडा वेळ दे. थोडं त्याच्या कलानं घे. त्याच्या आवडीच्या गोष्टीत रस घे, तोही नक्की तुझी आवड जपू लागेल बघ. मला सांग, त्याला खूप आवड कशाची आहे?”

“पहाटे लवकर उठून सायकलिंग करायची. पण मला अजिबात आवडत नाही.”

“मग तू एक काम कर. तूही लवकर उठण्याची तयारी ठेव. एक सायकल घे आणि त्याच्यासोबत सकाळी जात जा. त्याला सांग की तुला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडतं म्हणून तू हे मुद्दाम ठरवलं आहे. मग बघ… तोही तुझ्या आनंदासाठी बदलेल. तो मनाने वाईट नाही ना, मग बाकी बरोबर होईल. काळजी नको करूस. आईची ही मात्रा एकदम लागू पडली आणि नीताच्या कृष्ण-धवल वैवाहिक आयुष्यात अनेक रंग भरले गेले.

मोनिका आणि तिचा नवरा लग्नानंतर फिरायला उटीला गेले होते. तिची मैत्रीण विद्यानं तिला फोन केला. “हॅलो मोनिका! मी तुला दोन दिवस मुद्दाम फोन नाही केला. म्हटलं, लव्ह बर्ड्स फिरायला गेले आहेत, त्यांना फोन करून अजिबात त्रास द्यायचा नाही.” नुकतंच लग्न झालेल्या मोनिकाला विद्या चिडवत होती.

हेही वाचा… समुपदेशन: निर्णय चुकण्याचं अपराध शल्य

“कशाचे लव्ह बर्ड्स गं? इतका बोअरिंग आहे हा माणूस! इतक्या लांब उटीला आलोय तर हॉटेलच्या खोलीत बसून क्रिकेटची मॅच बघत बसतो. गेले दोन दिवस आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही. साइटस् बघायला, बाजारात किंवा इथला प्रसिद्ध ‘flower शो’ बघायलासुद्धा जायची त्याला इच्छा नाही. लग्नाआधी मी आवडीनिवडी विचारल्या तर ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे म्हणे! इथे इतक्या सुरेख बागा आहेत, तिथेही जायची याची इच्छा नाही. नुसतं मरगळ आल्यासारखं रूममध्ये बसून असतो तो. मीच एकटी खाली उतरून थोडी फिरून आले.”

“अगं, तुला घेऊन मस्त रूमवर उबदार पांघरुणात राहायचंय त्याला. तू काय बाहेर जायचं म्हणतेस?”

“उगाच काही तरी बडबडू नकोस! बायकोसोबत राहून राहून किती काळ घालवेल कुणी? खरंच कंटाळा आलाय मला. अजून चार दिवसांनी परतीचं तिकीट आहे. मला तर आत्ता या क्षणी निघावंसं वाटतंय. या माणसासोबत कसं आयुष्य घालवू मी? काळजी वाटतेय गं मला.”

“इतक्या लगेच तुझं मत नको बनवूस गं. तुला आठवतं? लग्नाआधी त्यानं तुला सिनेमाला नेलं होतं, पाणीपुरी खायलाही गेला होतात की तुम्ही! तू त्याला कुठला खेळ आवडतो विचारलं होतंस. तो म्हणाला होता की क्रिकेट मॅच असली की तो वेडा होतो. त्याला इतर काहीही सुचत नाही. म्हणून तो आत्ता तेच करतोय. काळजी नको करूस.” विद्यानं मोनिकाची समजू काढली खरी, पण तीदेखील जरा काळजीतच पडली होती. मोनिका म्हणजे सळसळता उत्साह आणि आनंदाचा झरा. भटकंती करणे, फोटो काढणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले पदार्थ खाणे याची आवड असलेली. तिचा नवरा हनिमूनला असा कसा वागतो? लग्नाला दहा दिवसही नाही झाले आणि याचं वागणं इतकं कंटाळवाणं कसं? या गोष्टीवरून त्यांचे संबंध बिघडायला नकोत. विद्यानं ठरवलं की दोघे परत आले की मोनिकाच्या नवऱ्याशी निवांत बोलायचं. आपली मैत्रीण नक्की आनंदी होईल.

असे अनेक पुरुष असतात ज्यांना बायकोच्या कोणत्याच गोष्टीत रसच नसतो. अशा वेळी त्यांच्या बायकोची फार घुसमट होते. पण एकमेकांवर प्रेम असेल तर हळूहळू नवरे मंडळी बदलतात. बायकोच्या प्रेमाखातर तिच्या इच्छेचा मान ठेवू लागतात. एखादा अडेलतट्टू मात्र शेवटपर्यंत अरसिकच राहतो. त्या वेळी मात्र त्याच्या बायकोला स्वतः आनंदी जगण्याची कला आत्मसात करावीच लागते. आपल्याकडे अशा स्वानंदी भरपूर बघायला मिळतात.

adaparnadeshpande@gmail.com