वंदना सुधीर कुलकर्णी
अनयच्या मनात वेगळेच विचार पिंगा घालत होते.
“प्रेम नेमकं कशाला म्हणायचं?”
“मैत्री कुठे संपते आणि प्रेम कुठे सुरू होतं?”
जेमतेम आठवड्याच्या मैत्रीत सेक्स? कितीतरी जण तर ‘वन नाईट स्टॅण्ड’ चाही अनुभव घेत असतात. तेव्हा काय भावना असतात त्यांच्या नेमक्या? की भावनांची गुंतवणूक नसतेच काही? नुसताच शरीराचा व्यवहार?
अनयला वाटलं, हा विषय मुग्धाच जास्त चांगला समजावून सांगेल. म्हणून त्याने मनातील सर्व प्रश्न मुग्धाकडे वळवले. मुग्धा म्हणाली, “आपण प्रेम हा शब्द सर्रास वापरतो. तो आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या माध्यमांना तर तोटाच नाही. कादंबऱ्यापासून सिनेमांपर्यंत आणि गाण्यांपासून कवितांपर्यंत सगळीकडे प्रेमच प्रेम ओथंबून वाहात असतं. पण ते प्रत्यक्ष नात्यांमध्ये मात्र कुठे गायब होतं कोण जाणे! भांडणं, वाद नि रुसवे, फुगवेच जास्त… प्रेम शब्दात नेमक्या कोणत्या भावना अभिप्रेत आहेत हे तर बोललंही जात नाही.”
आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान?
“त्या दिवशीच्या वर्कशॉपमध्ये प्रथमच समजलं की, मुळात माणसाच्या मेंदूमध्ये अनेक भावना असतात… जितक्या नकारात्मक तितक्याच सकारात्मकही! नकारात्मक भावना जितक्या सहज व्यक्त होताना दिसतात, जसा राग, द्वेष, वैताग, चिडचिड, आक्रमकता वगैरे. तितक्या सकारात्मक भावना, जसा लोभ, आस्था, कौतुक, आनंद, सहिष्णुता, समाधान वगैरे… व्यक्त करण्यात आपण कंजूसपणा करतो. एखाद्या गोष्टीला आपण जितक्या सहज नावं ठेवतो किंवा त्याचे/तिचे दोष दाखवतो, तितक्या सहज आपण गुणांचे कौतुक मात्र करत नाही.”
आणखी वाचा : फोर मोअर शॉर्ट्स प्लीज – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…
“अगं मुग्धा, पण तू मैत्री आणि प्रेम यामधला फरक सांगत होतीस ना?” अनयने मुग्धाची गाडी रुळावरून घसरणार नाही याची काळजी घेतली.
“मैत्रीमध्ये आपण सहज असतो, आपल्या मैत्रीत एक मोकळेपणा आणि सहजभाव असतो.”
“मैत्रीच्या पुढची पायरी असते सख्य.”
“हे सख्य काय असतं म्हणे?”, सम्याला हा शब्दच नवीन होता!
“मुग्धाला मधूनमधून बाउन्सर टाकण्याची खोडच आहे. सगळ्यांना समजेल अशा भाषेत बोलावं ना. मगाचाच तुझा तो सहजभाव की काय?”
“अरे, आता आपला १०-१२ जणांचा ग्रुप आहे की नाही? आपल्या सगळ्यांची एकमेकांशी छान मैत्री आहे. पण म्हणून आपण आपलं सगळंच सगळ्यांबरोबर शेअर करतो असं नाही ना? जसं ट्रेकमध्ये घडलेली घटना पम्याने फक्त अनय आणि नंतर माझ्याशी शेअर केली. मनातलं मोकळेपणाने बोलण्याचा कम्फर्ट, विश्वास, ज्याला/जिला ज्याच्या किंवा जिच्याबरोबर वाटतो, आपलं सिक्रेट या व्यक्तीपाशी सिक्रेटच राहील अशी खात्री वाटते, त्याच्या किंवा तिच्याबरोबर मैत्रीचं नातं पुढची पायरी गाठतं. जसं कृष्ण हा द्रौपदीचा सखा होता…”
आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!
“मग पुढची पायरी कोणती?” अनयची उत्सुकता वाढली होती.
“मुग्धा म्हणाली, “कधी कधी या सख्याबद्दल किंवा सखीबद्दल इमोशनल कनेक्शन जाणवायला लागतं. अशा वेळी हल्लीचं बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड नातं निर्माण होतं, पण ते प्रियकर, प्रेयसीचं नातं बनण्यासाठी शारीरिक ओढ वाटायला लागते. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडमधलं केवळ शारीरिक आकर्षण नव्हे. प्रियकर प्रेयसी नात्याची परिणती नवरा, बायको नात्यात होऊ शकते जर ते दोघं एकमेकांना कमिटेड राहिले तर!”
आणखी वाचा : Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!
“म्हणजे मैत्रीच्या नात्याने होणारी सुरुवात अशा लग्नाच्या नात्यात झाली तर लग्नानंतरही ते एकमेकांचे मित्र-मैत्रीण, सखा-सखी, प्रियकर-प्रेयसी राहू शकतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सेक्सच्युअल शेअरिंगबरोबरच छान इमोशनल, इंटलेक्च्युअल शेअरिंग आणि बॉण्डिंगही होत राहील, राइट?… म्हणजे मुग्धाच्या भाषेत कम्पॅनियनशिप, हो ना गं मुग्धा!”
“अरे हा अन्या पण गेला होता की काय त्या ‘प्री मॅरिटल वर्कशॉप’ला? हा अन्या ना एकदम छुपा रुस्तम आहे हं! हा, पत्ता लागू देत नाही…” पम्याने प्रथमच तोंड उघडलं…
आणखी वाचा : ‘ती’ दिवाळी पहाट
मुग्धा म्हणाली, “बरोब्बर! म्हणजे अनय म्हणतो ते बरोबर! पम्या म्हणतो आहे ते चूक… म्हणजे अनय काही आला नव्हता वर्कशॉपमध्ये.”
“आलं का सगळ्यांच्या लक्षात आता मैत्री, सख्य, प्रेम (फक्त हार्ट अॅण्ड अॅरोवालं नव्हे हं!) आणि आकर्षण यामधला फरक?”
“ओ प्रोफेसर बाई, आता पुरे हं! समजलं,” असं मुग्धाला सांगत रेवा म्हणाली, “आता जरा वेगळ्या विषयावर बोलूया हं अनय.”
सम्या आणि पम्याने ताबडतोब ‘येस’ म्हणत, संमती दाखवणारी मान हलवली.
(क्रमशः)
vankulk57@yahoo.co.in