“अनिल, तुझा डबा भरून ठेवला आहे, आणि पाण्याची बाटलीही सोबत ठेवली आहे. ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर डिश भरून ठेवली आहे. उप्पीठ जसं असेल तसं खा. वरून मीठ घेऊ नकोस. आणि दुपारी जेवण करताना पोळी भाजी खाण्यापूर्वी सॅलड खा. मित्रांसोबत उगाच सारखा चहा पित बसू नकोस. साधारण पाच वाजता अर्धा कप शुगरलेस टी किंवा ग्रीन टी घे. आणि हो, आज मंगळवार आहे त्यामुळे कपाटातून ज्यावर मंगळवार असं लिहिलंय तोच कपड्यांचा सेट घाल. बाकी उचक- पाचक करत बसू नकोस. मग सगळं मला आवरत बसावं लागत. संध्याकाळी घरी आल्यानंतर तुला खाण्यासाठी सफरचंद ठेवले आहे तेच खा. उगाच फरसाण खात बसू नकोस.”
आणखी वाचा : विवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं!
“आता झाल्या का तुझ्या सूचना देऊन?, तुझ्या कंपनीची कॅब आली आहे तू निघ आता.” अनिल कावला होता. अनिता गेल्यावर त्याला जरा हायसं वाटलं. ‘का तिला स्पष्टपणे बोलू शकत नाही आपण?’ त्याला प्रश्नच पडला.
एवढी काळजी घेणारी बायको मिळाली म्हणजे खरं तर अनिलनं खुश असायला हवं होतं. त्याच्या सर्व गोष्टींमध्ये ती बारकाईने लक्ष घालत होती, पण सहन करणं आणि बोलता न येणं यात त्याची घुसमट होत होती. त्याची व्यथा घेऊन तो माझ्याकडे आला होता.
आणखी वाचा : ॲनिमिया स्त्रियांचा कायमचा सोबती
“मॅडम, प्रत्येक गोष्टीत तिची घुसखोरी मला खूप त्रासदायक होत आहे. मी सकाळी कधी उठायचं, कोणता व्यायाम करायचा, काय खायचं, केव्हा खायचं, कोणते कपडे घालायचे, कोणत्या मित्रांशी आणि कोणत्या नातेवाईकांशी किती संबंध ठेवायचे, कोणत्या समारंभाला जायचं, कोणत्या नाही जायचं, कोणतं गिफ्ट द्यायचं हे सगळं तिचं ठरवते आणि तिच्या म्हणण्यानुसार मला वागावं लागत. मला माझं वैयक्तिक आयुष्य काही राहिलेलंच नाही. एखाद्या दिवशी मित्रांसोबत बाहेर एन्जॉय करायचीही मला परवानगी. तिचं हे सगळं वागणं मला असह्य होत आहे, तिच्या वागण्याचं मला ओझं होतंय मी काय करू?”
आणखी वाचा : नातेसंबंध : सासू-सासरे सोबत नकोत?
अनिल आज त्याच्या ऑफिसमध्ये न जाता माझ्याकडे आला होता. तो माझ्यासमोर बसलेला असतानाच त्याला अनिताचे कॉल येत होते, पण तो उचलत नव्हता, मी त्याला फोन घ्यायला सांगितला.
अनिलने नाराजीनेच फोन उचलला. “अरे, अजून ऑफिस मध्ये पोहोचला नाहीस का? तुझ्या कॉल ची वाट पहात होते.”
“नाही पोहोचलो.”
“तुला इतका वेळ कसा लागला, तब्येत बरी आहे ना तुझी? काही अडचण नाही ना? मला लगेच व्हिडीओ कॉल कर.”
आता मात्र अनिलचा कंट्रोल सुटला आणि तो ओरडलाच तिच्यावर.
आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?
“अनु मी लहान मुलगा नाहीये. आणि काही अडचणी आल्या तरी कसं फेस करायचं ते मला कळतं. तुझं सगळं ऐकायला मी बांधील नाहीये. सतत मला असं वाग, तसं वागू नकोस हे सांगून, मला बैल बनवलं आहेस तू. माझे सगळे मित्र मला बायकोचा नंदीबैल म्हणून चिडवायला लागले आहेत. सुरुवातीला मला बरं वाटत होतं, पण आता मला माझा मोकळा श्वास घेऊ देत. प्रत्येक वेळी तू सांगशील तसंच मी वागायला पाहिजे का? माझ्या काही आवडी निवडी आहेत की नाही?”
“अनिल, अरे चिडतोस कशासाठी? हे सगळं मी तुझ्या काळजीपोटीच करते आहे ना?”
“इतकी काळजी नकोय करायला. मी नवरा आहे तुझा नवरा. तुझ्याशी लग्न करून मी चूक केली आहे, असं वाटायला लागलंय. माझं सगळं स्वातंत्र्य गमावून बसलोय मी. मला नाही रहायचं तुझ्या सोबत. म्हणूनच मी मार्ग शोधायला आलोय.”
आणखी वाचा : ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार
असं म्हणून रागारागाने अनिलने फोन बंद केला, तिचा पुन्हा फोन येईल म्हणून स्विच ऑफ करून ठेवला. त्याचा संताप अनावर झाला होता. मी त्याला शांत केलं आणि अनितालाही फोन करून माझ्याकडे बोलवून घेतलं.
स्वतःची चूक काय हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. नवऱ्याची खूप काळजी घेणारी, घरातील सगळं व्यवस्थित सांभाळून मग करिअर करणारी म्हणून सासरी, माहेरी तिचं कौतुकच होत होतं, मग सोबतच रहायला नको, लग्न करून चूक केली, असं अनिलला का वाटावं हेच तिला समजत नव्हतं म्हणूनच तिला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होते.
आणखी वाचा : ‘वजेशियल’ – ‘त्या’ ठिकाणचं ‘फेशियल’!
“अनिता, तुला वाटतंय की तुझी काहीच चूक नाही, पण तू अनिलला ओव्हर प्रोटेक्शन देत आहेस. तुला वाटतं तसंच त्यानं वागावं ही त्याच्यावर बळजबरी होत आहे. त्याचेही स्वतः चे असे काही स्वतंत्र विचार, आवडीनिवडी आहेत. त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं तू केलेला विचार तुझ्या दृष्टीने योग्य असला तरी मनापासून त्याला ते पटलं नसेल, त्यानं मनापासून ते स्वीकारलं नसेल तर ते त्याच्यावर लादणं होतं, घरातही आपला बॉस आहे आणि त्याचंच ऐकायला हवं असं फीलिंग अनिलंला येत गेलं. काही ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्यावर तुझी मतं त्याच्या चांगल्यासाठी लादणं योग्य असलं तरीही तू त्याचा अतिरेक केलास आणि त्याला त्याच्या विचारांना सतत दाबून ठेवावं लागलं. जवळच्या नात्यांमध्येही ठराविक स्पेस असणं गरजेचं असतं. प्रत्येकाला स्वतः चा आत्मसन्मान असतो आणि तो दुखावला गेला तर त्याचा मानसिक ताण वाढत जातो. एक ठराविक वयानंतर मुलांना कोणते कपडे घालायचे हे आईवडिलांनी सांगितलेलं मुलांना आवडत नाही कारण त्यांना त्यांचे स्वतंत्र विचार असतात.
आणखी वाचा : स्नायू व पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणारे आसन
लग्नापूर्वी स्वतःचे सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची सवय असणाऱ्या अनिलला तू बंदिस्त करून ठेवलंस. सुरुवातीला तू त्याच्यावर किती प्रेम करतेस हे जाणून तो सर्व तुझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकत गेला, पण नंतर तुझे प्रेमाचे बंध त्याला काचू लागले. एवढ्या दिवसांची सवय मोडणे त्यालाही अवघड होतं. त्याच्या मित्रांकडंही तू त्याला जाऊ देत नव्हतीस, त्यामुळं तेथेही त्याचं हसू होत होतं. तुला त्यानं अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळं नात्याचं ओझं तुझ्याच खांद्यावर आहे आणि तुला तुझ्याच पद्धतीने ते निभवायचं आहे असा तुझा समज असल्याने तू अनिलला किती दुखावत आहेस, हे तुझ्या लक्षातच आलेलं नाही. आता तरी तुझी आग्रही भूमिका सोड आणि त्याच्या मनाचा, त्याच्या स्वातंत्र्याचा विचार कर. दोघांनाही नात्यामधून आनंद आणि सुख मिळायला हवं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी स्वतंत्र स्पेस हवी असतेच हे लक्षात घे”. अनिताला तिची चूक कळली होती. अनिलनेही त्याचा राग सोडून तिचीही बाजू समजावून घ्यावी हे त्यालाही सांगितलं. अनिलच्या मनातलं वादळ शांत झालं होतं.
दोघांची ऐवीतेवी रजा झालीच होती, पण आजची सुट्टी एकत्र एन्जॉय करू, असं म्हणत दोघही आनंदाने माझ्याकडून बाहेर पडले.
smitajoshi606@gmail.com