आपला ग्रुप, अर्थात कट्टा म्हणजे हल्लीच्या तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा गट. जग फार वेगाने बदलते आहे आणि या बदलत्या जगात आपला निभाव लागण्यासाठी तरुणांना बदलावे लागत आहे. विवाह हा त्यांच्या आयुष्यात येणारा एक टप्पा आहे. माध्यमांचा जबरदस्त प्रभाव आणि घराबाहेर घालवलेल्या अनेक तासांमुळे बाहेरच्या वातावरणाचा होणारा परिणाम यामुळे पालक आणि तरुण मुलामुलींच्या विवाहविषयक विचारात बरेच अंतर पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : जीन्सचा खिसा हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही…

हल्लीची मुलं प्रेमात पडताना जात, पत्रिका अशा पालकांसाठी संवेदनशील विषयांबद्दल आग्रही नाहीत, पण याचा अर्थ जोडीदार निवड किंवा एकूणच वैवाहिक आयुष्य याबद्दल ते फार विवेकी विचार करत आहेत असंही नाही. वरवरच्या गोष्टींचीच भुरळ अधिक पडताना दिसते. बहुतेकांचे आयुष्य करिअर, पैसे, अधिकाधिक चंगळवादी राहाणी याभोवती फिरताना दिसते. त्यामुळे नातेसंबंध हा विषय केंद्रस्थानी दिसत नाही. त्यामुळे तो रोजच्या जीवनात सहसा प्राधान्यक्रमावर नसतो. त्यामुळे वैवाहिक सहजीवन निर्माण करणं, त्यातील भावनिक बंध दृढ करत नेणं, ते फुलवणं यासाठी आवर्जून प्रयत्न होताना दिसत नाहीत.

आणखी वाचा : समुपदेशन : बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड नात्यातला तोल

दुसरीकडे, बदललेल्या कौटुंबिक जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये जुळवून घेण्याच्या क्षमता कमी झाल्या आहेत. त्यात व्यावसायिक जीवनातील राजकारण, स्पर्धा, मोठ्या शहरात करावा लागणारा आव्हानात्मक प्रवास यामध्ये टिकून राहणं शरीर, मन आणि बुद्धी या सगळ्याचाच कस पाहणारं असतं. त्यामुळे माणसं घरी पोचतात तेव्हा इतकी दमलेली, कंटाळलेली, कावलेली असतात, की घरच्या माणसांबरोबर तडजोड करण्याची त्यांच्यामध्ये ताकदच उरलेली नसते. त्यात घरच्या माणसांना गृहीत धरण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे, वड्याचे तेल वांग्यावर निघणे, चिडचिड होणे, दोषारोप होणे हे घडताना दिसत राहाते. तसे झाल्यास वाद, भांडणं अटळ. याची परिणती भांडणं वाढत जाणं किंवा अबोला यामध्ये झाली की परस्परांमध्ये प्रेमळ संवाद, बंध दृढ करणार लैंगिक नातं हे अवघड बनून बसतं. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिवाय वैवाहिक नात्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य, त्यासाठी वैयक्तिक जीवनात कराव्या लागणाऱ्या तडजोडी, कमिटमेंट हे सारं मुलामुलींना नको वाटत असतं.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

वैवाहिक जीवनातील आनंद गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड मैत्रीत, एकनिष्ठ कोर्टशिपमध्ये, फार फार तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये मिळत असेल तर विवाहबंधनात अडका, कौटुंबिक तडजोडी करा, अनेकांच्या स्वभावांशी जुळवून घ्या. हे अनेकांना ताण ओढवून घेणारं वाटतं. शिवाय आर्थिक स्थैर्य, नोकरीतील अनिश्चितता, करिअरमध्ये स्थिरावणं, स्वतःची राहाण्याची जागा असणं, काही जणांच्या बाबतीत कौटुंबिक जबाबदाऱ्या, असे मनसिक असुरक्षिततेचे अनेक विषय असतातच. लग्न, जोडीदार निवडीचे निकष याबाबतीत पालक आणि मुलांमध्ये कितीही मतभेद असले तरी सगळ्याच गोष्टींचं ‘साजरीकरण’ करण्याच्या आजच्या युगात, लाखो रुपये खर्च करून लग्नाचा ‘इव्हेंट’ बनवण्याच्या बाबतीत मात्र सहसा एकमत असतं! या ‘इव्हेंट’ची जबाबदारी अनेक एजन्सीजना देताना, आपलं वैवाहिक नातं सांभाळण्याची, निभावण्याची संपूर्ण जबाबदारी मात्र याचं कोणतंही शिक्षण, प्रशिक्षण न दिलेल्या त्या नवदाम्पत्यावर टाकलेली असते. वर, आम्ही नाही का निभावून नेलं? पाण्यात पडलं की येतं पोहता, असे आश्वासक(?) सल्लेही दिलेले असतात. आणि गेलंच पाणी नाकातोंडात तर आम्ही (?) आहोतच की सल्ले द्यायला, असा सगळा अविचारी, अदूरदर्शी मामला असतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

मुळात आपण लग्न का करतोय, असं खर्चीक लग्न का करतोय याची विवेकनिष्ठ उत्तरं कुणाकडेच नसतात. ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!’ पण लग्न मोडलेलीही कुणालाच नको असतात… त्याचं खापर कुणाला आपल्या डोक्यावर घ्यायचं नसतं. मध्यास्थांबरोबर बैठका, आधी दोन्हीकडचे आईवडील, मग नातेवाईक, यांनी समजवण्याचे, पटवण्याचे प्रयत्न…असे सर्व सोपस्कार होऊन ‘आम्ही आता हात टेकले बाबा’, असे हात वर करून झाले की, घ्या बाबा आता काही व्यावसायिक सल्ला, असा एक उपचार उरतो. वैवाहिक दाम्पत्याचा लढा आता वेगळे वळण घेतो. तरुण, तरुणींचे लग्न करण्याचे उद्दिष्ट जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळात वैवाहिक बेबनाव वाढणार हे उघड आहे. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर आव्हानं अटळ आहेत. मुळात आपल्या आयुष्याच्या प्रवासाची दिशा स्पष्ट होत नाही तोपर्यंत विवाह या विषयाची स्पष्टता येणं अवघडच.
vankulk57@yahoo.co.in
(मालिका समाप्त)