‘‘असं कसं हो या गाण्यात म्हटलं आहे की, ‘दिल्या घरी तू सुखी राहा!’ म्हणजे मुलींनी काहीही झालं तरी सुखी राहण्याचा प्रयत्न करत राहायचा का ? आणि तिला सासरी खूप त्रास असेल तरीही ‘सुखीच राहा’?’’ कल्याणी ताईंचा आवेश बघून माधवराव हसले. ‘‘अगं, जुन्या काळात लिहिलेलं गाणं आहे ते ! तेव्हाची मानसिकता वेगळी होती. आता तसं राहिलं नाही. एक तर मुली खूप खंबीर आहेत, शिवाय माहेरची मंडळी बरीच जागरूकपणे लक्ष ठेवून असतात. तू नाही का सतत आपल्या मधूची विचारपूस करत असतेस, तिला गरज लागली तर आपण मदतही करतोच न…’’

आणखी वाचा : Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

‘पण मी तेवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलंय बरं ! उगाच नसत्या चौकशा नाही करत. त्यांना मदत लागली, इथे यावं वाटलं किंवा आजारपणात चार दिवस आपल्याला तिथे बोलावलं, तर तेवढं करून वेगळं व्हायचं ! जास्त खोलात जायचं नाही. तिच्या नणंदेला काय आहेर केला? घरात सासू-सासरे पैसे देतात की नाही, कामाला किती मदतनीस लावायच्या, पैसे कुठे आणि किती गुंतवायचे, त्यांच्या नातेवाईकांशी हिनं किती संबंध ठेवायचे हे त्यांचं त्यांना बघू दे. निर्णय ते घेतील. आपण उगाचचे सल्ले का द्यायचे?’’ कल्याणी ताईंनी मत व्यक्त केलं ‘‘अगदी बरोबर. पण ती तुझी मैत्रीण रेखा… किती प्रचंड दखल देते गं मुलीच्या संसारात ! सतत कान भरत असते मुलीचे.’’

आणखी वाचा : सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

‘‘अहो, अशाने मग सरसकट सगळ्या मुलींच्या आया बदनाम होतात. मुलीची आईच तिचा संसार मोडते असं म्हणतात चक्क! कुणा आईला वाटतं तिचा संसार मोडावा असं ? सासरी आपल्या मुलीची नीट कदर केली जात आहे नं? तिला आर्थिक स्वातंत्र्य आहे नं? फार काबाडकष्ट तर नाहीत नं? तिच्या आजारपणात नीट काळजी घेतात की नाही? याबद्दल आई-वडिलांना मुलीची काळजी असणं अगदी स्वाभाविक आहे. पण सतत मुलगी आणि जावयाला हे करा, ते करू नका असल्या टोचण्या देऊ नयेत. लग्न झालेली मुलगी काही लहान बाळ असते का ? स्वतंत्र विचारांची व्यक्ती असते ती. आपणच संस्कार करून शिकवून मोठं केलं असतं ना तिला ? मग तिचे निर्णय ती घेईल ना व्यवस्थित ! सासरची मंडळी आणि नवरा नीट वागतोय ना, इतकं फक्त आपण बघत राहावं. बाकी त्यांचं ते बघतील बाई !’’

आणखी वाचा : लोकलमध्ये चढली उर्फी, उर्फ ‘ती’ …याला म्हणतात बोल्ड बाई!

‘‘तुझं बरोबर, पण अगदी त्या अजित शैला वहिनी सारखंपण नको. जावई परगावी नोकरी करणारा… स्वभावाने खूप गरीब मुलीचा पगार सासूच्या ताब्यात… घरात सतत पाहुणे. स्वयंपाकाला बाई लावायची नाही म्हणजे नाही हा सासूचा दुराग्रह. मुलगी आजारी पडली, आईला फोन केला, पण यांनी म्हणावं तसं लक्षच दिलं नाही. शेवटी तिची प्रकृती खूपच ढासळली, तेव्हा सासरच्यांनी तिला चक्क माहेरी आणून सोडलं . त्यावेळी मुलीने तिचे सासरी आतापर्यंतचे होणारे हाल बोलून दाखवले. शेवटी अजित दादाने मनावर घेऊन तिला जावयाच्या गावी नोकरी मिळून दिली आणि पोरगी घरच्या जाचातून सुटली. वास्तविक जावयाने स्वतः हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण त्याच्यात हिंमत नव्हती. अशा वेळी मुलीच्या आईवडिलांनी जरा आधीपासूनच लक्ष द्यायची गरज होती की नाही? मुलगी सासरी गेली की जबाबदारी संपली असं मुळीच नसतं. ती माणसं ज्यांच्या सोबत तिचं आयुष्य जाणार त्यांची शहानिशा करायलाच लागते. मग लोक त्याला लुडबुड म्हणोत की काहीही म्हणोत!’’ माधवराव भडाभडा बोलून गेले आणि कल्याणी ताई कौतुकाने त्यांच्याकडे बघत होत्या. इतक्यात मुलीचा फोन आला, ‘‘आई, सासूबाईंना साठाव्या वाढदिवसाला काहीतरी छान घ्यावं म्हणतेय. काय घेऊ?’’
‘‘मागे बोलताना त्या म्हणाल्या होत्या, की त्यांना कानात चंद्रबाळी घालायची फार वर्षांपासून इच्छा आहे …तर तेच घे.’’ तिकडून मुलगी आनंदाने म्हणाली, ‘‘ओह वाव! Thank you मम्मा!’’
adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader