नीलिमा किराणे

‘स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावातले मूलभूत फरक आणि नाती’ या विषयावरचं वर्कशॉप चालू होतं. विवाहित, अविवाहित, विवाहेच्छू, जोडपी, हौशी, एकेकटे इत्यादी विविध प्रकारचे लोक सहभागी झाले होते. फॅसिलिटेटर म्हणाला, “पुरुषांना दुसऱ्याकडे मदत मागण्यात कमीपणा वाटतो. आपल्या समस्या आपणच सोडवण्यात त्यांचा आत्मसन्मान असतो. त्यामुळे अगदीच अशक्य होईल तेव्हाच ते दुसऱ्याची मदत घेतात. याउलट स्त्रिया आपली समस्या सहज शेअर करू शकतात, सहज मदत मागतात. त्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. हा फरक नैसर्गिक आहे. अर्थात, काही अपवाद असतातच.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

“समजा प्रवासात रस्ता चुकला, इंटरनेटला रेंज नाहीये तर बहुतेक पुरुष रस्त्यावरच्या पाट्या – साईनबोर्डस् बघत गाडी पुढे नेत राहतील, थांबून सहसा रस्ता विचारणार नाहीत. मग पेट्रोल जळालं, उशीर झाला तरी चालेल. याउलट बाई ड्रायव्हिंग करत असेल, तर ती मात्र पटकन थांबून, रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला रस्ता विचारेल. वेळ आणि पेट्रोल दोन्ही वाचेल. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का?”
प्रेक्षकांमध्ये हलकी चर्चा आणि हसणं सुरू झालं. बहुतेकांना हा अनुभव होताच.“हो, आमच्यात यावरून बरेचदा भांडण होतं.” एकानं सांगितलं.“आमच्यात तर दर वेळी वाढीव जोराने भांडणं होतात. जरा लांब कुठे जायचं असेल तर यावरून एखादं भांडण होणारच हे आम्ही हल्ली गृहीतच धरून चालतो.” आणखी एकजण म्हणाला.

“मग काय करणार? ‘कुणाला तरी रस्ता विचारू या’ म्हटलं, तर हा गाडी थांबवत नाहीच, पण वेगसुद्धा कमी न करता म्हणतो, ‘लगेच कशाला विचारायचं? आपल्याला डोकं नाही का?’ आता रस्ता चुकलोय, उशीर होतोय, तर डोक्याचं काय? उलट हा पाट्या बघत ड्राइव्ह करत असतो तेव्हा अपघात होईल अशी मला भीती वाटते.” त्याची जोडीदारीण म्हणाली तसे सगळे हसले. सरसावून आपल्यातली भांडणं शेअर करू लागले.

हेही वाचा: आहारवेद : मासिक पाळीतील अतिरक्तस्रावावर उपयुक्त आवळा

“थोडक्यात मित्रहो, तुम्ही भांडणाची जय्यत तयारी करूनच प्रवासाला निघता आणि दर वेळी त्याच विषयावर, ‘माझंच कसं बरोबर आहे’ हे पटवत तोच वाद घालता. ग्रेट. पण आता आपल्याला माहिती झालंय, की स्त्रिया आणि पुरुषांच्या मूळ स्वभाव – डिफॉल्ट नेचरमधला हा फरक कायमच राहणार आहे. त्यामुळे ते मान्य करून, ‘तरीही भांडणाऐवजी आपल्याला दुसरा काही चॉइस आहे का?’ ते शोधायचंय. नुसत्या एकमेकांबद्दल तक्रारी करत बसू नका. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दृष्टिकोनातून बघा त्याकडे.” फॅसिलिटेटर लोकांना रुळावर आणत म्हणाला.

लोकं विचारात पडली. या विषयावर भांडण होणारच हे इतकं गृहीत धरलं जात होतं, की किती वर्षं आपण त्याच विषयावर तेचतेच भांडत राहणार? असा प्रश्न पडलाच नव्हता. हा फरक नैसर्गिक असू शकेल हे तर नवीनच कळत होतं. यापूर्वीची ‘तुझंच चुकतंय’ वाली अनेक भांडणं आणि त्यात गेलेला निरर्थक वेळ आठवून जरा वेळ शांतता. मग एकजण म्हणाला, “मला मदत घ्यायला लाज वाटत असली तरी त्यामुळे पेट्रोल वाया जाणं किंवा उशीर होणं दोन्ही बरोबर नाही हे पटलं. तर यापुढे, एकीकडे पाटया बघतानाच, माणूस दिसला तर मी गाडी थांबवेन, रस्ता विचारायचं काम ती करेल, कारण तिला त्यात कमीपणा वाटत नाही. मी शांत राहीन. आमचा वेळ आणि पेट्रोल वाचेल.”
“…आणि ‘डोकं आहे की नाही?’ हा वाद पण थांबेल.” एकानं पुढे जोडलं. हसत हसत लोकांनी टाळ्या वाजवल्या.

हेही वाचा: चॉइस तर आपलाच : मन चिंता करू लागलं तर?

“किती साध्या सोप्या असतात गोष्टी. ‘माझंच बरोबर, तुझं चूकच’ यात अडकलं की अवघड होतं. भांडणाची सवय होऊन जाते, नव्याने विचार होत नाही. त्याच त्याच मुद्दयांवर रोज तीच भांडणं करायची की स्वभावातले फरक मान्य करून मधला रस्ता शोधायचा? एकमेकांचे वीकनेस टार्गेट करत भांडायचं की त्यातली स्ट्रेन्थ शोधायची? हा चॉइस आपलाच असतो. नाही का?” गटातल्या मॅनेजमेंटवाल्या एका मुलीनं पटकन समरी काढून समोर ठेवली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

Story img Loader